Top Post Ad

ओबीसी जागा होतोय...!!

 


                  भटांनी आपल्या हातातील सर्व आयुधांचा पुर्ण क्षमतेने वापर करून महाराष्ट्र पेटवायचा खटाटोप गुढीपाडव्याच्या मुहुर्तापासुन सुरू केला. २ एप्रिल ते ४ मे असा पुर्ण महिना खर्ची घातला. तरीही महाराष्ट्र पेटला नाही, महाराष्ट्रात दंगली झाल्या नाहीत त्याचे समाज शास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण करणे आजच्या घडीला आवश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच...!!            भोंग्यांचे निमित्ताने हिंदू धर्मातील ६०% ओबीसी आणि मुस्लिम या दोघांना आपसात भिडवून त्यांच्या तरुण पिढीचं दंगलीत भरीत करुन सत्तेचा ढेकर देण्याची षंढयंत्रकारी योजना  राजकीय पक्षांनी तथा विषमतावादी संघटनांनी राबविण्याचे ठरविले आणि त्यानुसार सर्व खटाटोप सुरू होता...!! 

                      मी नेमका हिंदू धर्मातील ६०% ओबीसी हा वर्गच का नमूद केला त्याचे समाजशास्त्रीय विश्लेषण असे आहे की, हिंदू धर्मातीलआंबेडकरवादी समतावादी,संविधानवादी,आदिवासी, तथा उच्च वर्णातील प्रस्थापित सत्ताधारी हा वर्ग भटांच्या भुलथापांना बळी पडतं नाही मात्र ६०% ओबीसी हा सकाळी झोपेतून उठल्या पासुन तर रात्री अंथरुणात जाईपर्यंत नशीब, प्रारब्ध, कर्मकांड, दैव, पुण्य, पाप, गतजन्म,स्वर्ग, नरक या फे-यात अडकून तो वैचारिक दृष्ट्या भटांचा गुलाम झाला आहे, त्याचा विवेक,आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला नाही...!!   इतिहासाचा दाखला असा आहे की, वर्ण व्यवस्थेमध्ये जो शुद्र ठरविल्या गेला होता तोच आजचा ओबीसी होय..!!    हजारो वर्षाचा इतिहास साक्षी आहे की, भटांनी या शुद्राकडून पाहिजे ती सेवा करुन घेतली मात्र त्याला कुठलाच मोबदला दिला नाही, आणि दैवाच्या फे-यात अडकवून त्याचा मेंदू बधीर केला...!!    मेंदू बधीर झालेल्या समुहाला आपल्या फायद्यासाठी वापरुन घ्यायचे हा भटांचा सिरस्ता अनेक शतके सुरू आहे...!! 

   हिंदू धर्मातील मोठ्या समूहाने मेंदुचा वापरचं करु नये ,आम्ही सांगू तसेच वागावे म्हणूनच त्यांच्यावर शिक्षण बंदी लादण्यात आली आणि शिक्षण केवळ एकाच वर्गासाठी होते हाही आपल्या देशाचा इतिहास आहे... ! !   आम्ही सांगू तसेच वागावे हा भटांचा नियम ओबीसी हजारो वर्षे पाळत आला आहे आणि म्हणून ओबीसी बांधवांना मुठभर लोकांच्या सत्तेसाठी पाहिजे तसे वापरुन घेतले जाते आहे.७२ वर्षाच्या लोकशाही व्यवस्थेतील जातीय तथा धार्मिक दंगलीचा इतिहास त्याचा ठसठशीत पुरावा आहे...!!    म.ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नानंतर ओबीसी समुहात शिक्षणाने जी काही प्रगती साधता आली त्यामध्ये आजचा ओबीसी हा ब-या वाईटाचा विचार करु लागला,म्हणजेच त्याने मेंदुचा वापर करायला सुरुवात केली आहे आणि म्हणून त्याला भडकावून दिले, त्याला आमिष दाखवले तरीही तो दंगलीसाठी तयार झाला नाही म्हणून महाराष्ट्रात दंगली झाल्या नाहीत. हे वास्तव आहे...!! 

  आज ओबीसी समुह विचार करू लागला आहे, त्याचा मानववंश शास्त्रज्ञांनी जो अभ्यास मांडला आहे तो नेतृत्व करु शकत नाही, तो अनुयायी होऊ शकतो त्यानुसार जर ओबीसी विचार करू लागला आहे तर त्याचे प्रबोधन करणे, त्याला विवेकवादाचा परीचय करुन देणे, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची जबाबदारी ही आंबेडकरवादी समूहाने स्विकारली पाहिजे...!!    अनुभवाने होरपळलेला ओबीसी समुह भटांच्या कटकारस्थाननातून सुटका करुन घेऊ पहात आहे, त्याला विवेकवादाचा परीचय करुन देणारा सक्षम पर्याय दिसला तर तो निश्चित पणे त्याचा सहकारी, मित्र तथा अनुयायी होऊ शकतो,जग परिवर्तन शील आहे हा बुद्धाचा सिद्धांत इथं लक्षात घेतला पाहिजे ही बाब विशेष करुन पुढारपणं करणा-या आंबेडकरवादी समूहाने लक्षात घेतली पाहिजे...!! 

   सामाजिक पातळीवर हा होणार बदल अतिशय  प्रगतीपर आणि सकारात्मक आहे तथा मानवतावादी समुहासाठी ती अतिशय आनंदाची बाब आहे...!!    विषमता वाद्यांच्या सत्ताकाळात घडणाऱ्या या घटनांची विशेष बाब म्हणून नोंद घेतली तरच भविष्याचा अदमास घेता येईल...!!   समतावादी समुहासाठी ही संधी आहे, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र अशा विविध क्षेत्रातील वैचारिक आघाडीवर काम करणाऱ्या विचारवंत, बुद्धीजीवी वर्गाने आता मोठ्या प्रमाणावर कार्यरत होऊन जागा होणाऱ्या ओबीसी वर्गाचं प्रबोधन, तथा नेतृत्व केलं पाहिजे...!! 

       राजकीय पातळीवर श्रेय वादाच्या भुताने पछाडलेले राजकीय पक्ष तथा पुढारी कितीही म्हणोत की, आमच्या उपाययोजना मुळे दंगली टळल्या किंवा आम्ही थांबविल्या वास्तव सत्य असं आहे की, दंगली साठी वापरल्या जाणारा माल(ओबीसी तरुण.)उपलब्ध झालाच नाही, मग दंगल घडेल कशी, आणि कुणाच्या बळावर...???   त्यापैकी एकच बोलकं उदाहरण म्हणजे पुण्याच्या वसंत मोरे यांचं...!!   जागे झालेल्या ओबीसी बांधवांचं मनस्वी अभिनंदन.    समतावादी छावणीत जागं होणाऱ्या ओबीसी समुहाचे भरभरुन स्वागत व्हावं अशी अपेक्षा करतो...!! 

जयभीम. 

@.. भास्कर भोजने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com