महाराष्ट्र रामेश्वर भट, कृ.भा. कुलकर्णी, नथुराम गोडसेचा ? की
संत तुकोबा, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा ?
शाळेत असताना डार्वीनचा सिद्धांत शिकण्यात आला. त्यातले माकडापासून माणूस बनला हे काही मला पटत नव्हतं, पण सद्या भारतातील काही धर्मांध उन्मादी लोकांकडे पाहता डार्वीन पटतोय आणि, ही माणसं अजूनही ‘मर्कटा’वस्थेतच आहेत हे लक्षात येतं. उत्क्रांतीनंतर माकडाचा माणूस झाला पण भारतात धर्मांधांच्या उचापतींनी माणसांचा माकड होताना दिसत आहे. (माकडाची माफी मागून, तो तर माणसापेक्षाही बरा, तो एकाच न्यायाने मशिद व मंदीरांवर उड्या मारतो, शिवाय आग लावत फिरत नाही, ‘खतरे मे’चा भोंगाही वाजवत नाही)
खरंतर भारतात धार्मिक उन्माद माजवून लोकांचे लक्ष खऱ्या प्रश्नांकडून दुसरीकडे वळविण्याचे षडयंत्र काही नवे नाही. जून 1928 मध्ये शहीद भगत सिंग यांनी ‘किर्ती’ या नियतकालीकात ‘ धार्मिक दंगे व त्यांचा उपाय’ असा एक लेख लिहिला होता, बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्याही लिखानात अशा धार्मिक उन्मादाचे संदर्भ मिळतात, जुनं साहित्य, वृत्तपत्रं चाळली तरीही ही गोष्ट लक्षात येते. सद्या देशात महागाई, बेरोजगारी असे विविध प्रश्न असतानाही धार्मिक उन्मादांना खतपाणी घातले जात आहे, आणि त्यात देशातील सत्ताधारी भाजपाची टोळी अग्रेसर आहे. स्वत: अशाच धार्मिक उन्मादातून प्रधानमंत्री पदापर्यंत मजल मारलेली असल्याने नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने विरोध करतील ? त्यामुळे त्यांचं गप्प बसणं हेच योग्य, नाही तर विरोधकांना “ मोदींच्या उलट्या बोंबा’ म्हणण्याची संधी मिळाली असती. असो.
देशात मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश याठिकाणी बुलडोझर चढवून गरीबांच्या वस्त्या जमीन दोस्त करण्यात आल्या, पण यात मुस्लिमांबरोबर हिंदुंचीही पिसाई झाली. त्यानंतर काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमधील हिंदुची तीन देवळं पाडल्याची कोल्हेकुई करण्यात आली, प्रत्यक्षात ही देवळं भाजपाच्या ताब्यातील नगर परिषदेनेच रितसर पाडली होती. या सर्वांमुळे भाजपाची व त्या त्या राज्यांची छीं थु झाली. हजारवेळा लोकांनी तोंडावर थुंकल्यानंतरही भाजपाला काहीच लाज लज्जा शरम हया वाटत नाही, उलट तीच थुंकी चाटून आपले राजकारण करण्याचा कोडगेपणा या पक्षात आणि या पक्षाच्या पाठराखण करणाऱ्या संघ, परिषद, दल आदी संघटनांत खचाखच भरलेला असल्याने त्यांच्या वर्तनात काहीच बदल दिसत नाही. महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या धर्मांध राजकारणाचे भोंगे वाजू लागणे हीच खरी चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील माणूस नेहमीच आपल्या विद्वतेचा आणि मराठी असल्याचा अभिमान बाळगत असतो पण आता देशात सुरु असलेल्या धर्मांध प्रदुषणात महारष्ट्राचाही सहभाग दिसणे निश्चीतच भूषणावह नाही. महाराष्ट्राच्या होणाऱ्या छीं थु ला हे धर्मांधच जबाबदार !
महाराष्ट्र दिन निमित्ताने हा प्रश्न पडत आहे की हा महाराष्ट्र नेमका कोणाचा आहे ? या महाराष्ट्रात संत तुकोबा, शिवाजी महाराज, महामानव ज्योतिराव फुले, छ. शाहु महाराज, बाबासाहेब डॉ. आंबेडकर हे जन्माला आले, त्यांनी समस्त जनतेला माणूसकीचा धर्म सांगितला, त्यांचा हा महाराष्ट्र आहे की, तुकारामांना त्रास देणारा व त्यांचे अभंग नदीत बुडविण्याची शिक्षा देणारा रामेश्वर भट, छत्रपतींवर हल्ला करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे या अविचारी नराधमांचा आहे ? महाराष्ट्र द्वेषाची भूमी बनविली जात आहे काय ? येणाऱ्या काळात महाराष्ट्राची ओळख गोडसे आदी नराधमांच्या नावाने होणार काय ?
किरीट सोमय्यांवर हल्ला झाला तेव्हा त्यांना कायदा आणि सुव्यवसथा आठवली? जामिया विद्यापिठात विद्यार्थ्यांवर स्वत: पोलीसांनी हल्ला केला, जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर पोलीसांसमक्ष गुंडांनी हल्ला केला तेव्हा किरीट यांनी तोंडात काय घेतलं होतं ? नवणीत राणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस मुळव्याध चाळवल्याप्रमाणे बोंबलू लागले, पण याच फडणवीसांनी भीमा- कोरोगाव प्रकरणी काय केले ? देशातल्या अनेक विचारवंत, कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यावर देशद्रोह दाखल करण्यात आले तेव्हा फडणवीसांची अक्कल कुठे शेण खायला गेली होती ? हातून सत्ता गेल्यानंतर ती परत मिळविण्यासाठी धडपड करण्याचे राजकारण समजू शकते. पण राजकारणासाठी समाजकरण बिघडू देणे हे अयोग्य आहे.
सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन केवळ भोंग्याबाबतच नाही अन्य अनेक बाबतीतही करावे लागेल, त्याबाबत कुणी बोलत नाही. या देशातील संविधान हे सुप्रिम कोर्टाच्याही पुढे आहे, याच संविधानाने देशातील सर्व धर्मांच्या, सर्व जाती-पंथांच्या, सर्व लिंगाच्या लोकांना न्यायाने वागविण्यास सांगितले आहे. 'त्याला उघडा म्हणा नाही तर आम्हीही नागडे होतो' असे म्हणणे हा न्याय नाही तर बदला आहे.
महाराष्ट्र दिनी सर्वांना सदिच्छा देताना एकच विनंती आहे की, सुपारीबाजांच्या धर्मांध भोंगेगिरीला साथ देवू नका, शक्य झाल्यास ते जेथे सापडतील तेथे त्यांना तुकोबा, छ.शिवाजी महाराज, म. फुले, छ.शाहू महाराज, बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या जोड्यांचा प्रसाद द्या. अगदीच काही नाही तर प्रबोधनकार ठाकरेंचे जोडे वापरले तरी चालतील !
तसेही अन्य कुठल्याही भोंग्यांपेक्षा रेल्वे इंजिनच्या भोंग्याचा आवाज अधिक कर्कश असतो !
- संदीप बंधुराज
---------------------
*राज ठाकरे मोदींच्या पावलावर झूठ बोलो बोलते रहो*
सगळ्या इतिहासाचा बट्ट्याबोळ केला निदान तारखाचा तरी अभ्यास केला असता तर बरं होतं.
1869...शिव समाधीचा शोध - महात्मा फुले
1870...10 दिवसांची शिव जयंती सुरू... महात्मा फुले (हडपसर पोलीस ठाण्यात नोंद, पुरावा म्हणून बघू शकता )
टिळकांचा जन्म 1856.. म्हणजे टिळक त्यावेळेस फक्त 14 वर्षांचे होतें.
महात्मा फुले मृत्यू - 1891
1892 - टिळकांनी सार्वजनिक गणेशउत्सव सुरू केला.
1892... भारतात पहिली हिंदू मुस्लिम दंगल...टिळक सूत्रधार (पुराव्यासाठी *मी जयंत टिळक* पुस्तकं वाचावे. टिळकाचे नातू )
टिळकांनी शिव स्मारकासाठी साठी लोकांकडून पैसा गोळा गेला, पण त्यांच्या हयातीत ते कामं झालं नाही...
पैश्याचा हिशोब दिला नाही.
टिळकांचा मृत्यू- 1920
शिव समाधी बांधली गेली - 1936
टिळकांच्या मृत्यू नंतर 16 वर्षांनी.
न. ची. केळकर शिव स्मारक समितीचे अध्यक्ष त्यांनी पून्हा पैसा गोळा केला आणि समाधी बांधली.
राज ठाकरे स्वतः च्या आजोबांची पुस्तके तर वाचत नाहीत, पण खरा इतिहास तरी समजून घ्यायचा.
मोदी खोटं बोलून यशस्वी झाले म्हणून हेही सर्रास खोटं बोलायला लागलेत.
निदान तारखाचा तरी ताळ मेळ जुळतोय का?
आता टिळकांचा जन्माच्या आणि मृत्युंच्या तारखा बदलणार का?
झूठ बोलो... बोलते रहो.
- प्रमोद शिंदे इतिहास अभ्यासक
9967013336
1 टिप्पण्या
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा