Top Post Ad

इतिहास लपवणारे तेच लोक आहेत

 दोन हजार वर्षांपुर्वी सातवाहन सम्राज्ञी नागणिका राणीने जुन्नरच्या नाणेघाट लेणीत धम्मलिपीत शिलालेख कोरलाय व त्या लेखात महाराष्ट्राचा उल्लेख महारठी म्हणुन करण्यात आलाय.तसेच हेनसांग या परदेशी प्रवाश्याने सुद्धा भारताचा उल्लेख करताना त्याच्या लेखात  सुद्धा महाराष्ट्रात महार आणि रठ्ठ  या दोन  समुदायचा उल्लेख केला आहे, जसेकी भारताचा इतिहास लपवन्यासाठी काल्पनिक इतिहास उभा केला गेला, तसेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कालखंडा अगोदरचा इतिहास जाणून बुजून सांगितलं जात नाही किंवा लोकांना कळून दिला जात नाही हे इतिहास लपवणारे तेच लोक आहेत ज्यांनी कधी काळी महाराजांना अपशब्द बोलून त्यांचा राज्याभिषेक नाकारलेला, 

महाराष्ट्र या शब्दाचा विसर्ग करताना कपटी लोक जाणून बुजून महान+राष्ट्र = महाराष्ट्र असा करतात,पण आपण जर लिपी इतिहासावर भर दिली तर ही शब्दाचा विसर्ग करण्याची पद्धत केवळ आपल्याला नागरी या लिपीचा  उदय झाल्या नंतर दिसते आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातील प्राचीन पाली लिपी,भाषेतील  शब्दाचा विसर्ग न होता त्याचा खोल अर्थ आढळून येतो असे आपल्याला आतापर्यंतच्या मिळालेल्या बौद्ध पुरातन लेण्यातील  शिलालेखानवरून दिसून येते, जसेकी (महाराष्ट्राचा) अर्थ (महानराष्ट्र) असा नसून, महार आणि रठ्ठ या दोन क्षत्रिय नागवंशी समुदायचे वास्तव असलेला किंवा त्यांच्या आधीपत्या खाली असलेला प्रदेश महारठ्ठ किंवा महारठी असा आढळून येतो.

 तसेच हा महार आणि रठ्ठ नागवंश गौतम बुद्धांच्या कालखंडा पूर्वी पासून बुद्ध धम्माचा व संघाचा अनुयायी होता असे आपल्याला जुन्नर मध्ये मिळालेल्या एका बौद्ध लेणीवरून दिसून येते,ही लेणी सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या कालखंडा आधीची आहे असे आपल्याला दिसून आले आहे.जसेकी सिंधू घाटी मध्ये गौतम बुद्धांच्या पूर्वीचा स्तूप आढळून आला आहे व त्रिरत्नाची नक्षी असलेला एक शिलालेख.आणि त्याच बरोबर 6 भुजांचे धम्म चक्र,म्हणजेच छटांगिक मार्ग दर्शवणारे धम्म चक्र आढळून आले आहे, तसेच बौद्ध धम्मातील मुख्य पिंपळाचे वृक्ष पान आढळून आले आहे त्याच बरोबर ध्यान मुद्रेत बसलेली डोक्यावर त्रिरत्न असेलेली व सभोवताली वण्यजीव असलेला एक शिलालेख आढळला आहे, आणि तसेच ध्यानमुद्रेतील डोळे व चिवर ओढलेली एक मूर्ती आढळून आली आहे त्याला अमेरिकी पुरातत्वज्ञ प्रिस्ट किंग असे म्हणतात पण कदाचित त्रिपिटका मध्ये उल्लेख असलेल्या 28 बुद्धांपैकी एक बुद्ध असावे ते असे माझे विचार आहेत.    

या वरून आपल्याला स्पष्ट दिसून येते कि सिंधू बौद्ध सभ्यता नष्ट न होता ती गौतम बुद्धांच्या आठव्या धम्मचक्र  प्रवरतना नंतर अष्टांगिक मार्ग असलेल्या बौद्ध धम्माच्या रूपातच चालू राहिली होती. जसेकी आपल्याला माहित आहे कि अष्टांगिक मार्ग असेलेला बौद्ध धम्म नष्ट न होता त्याचे विकृतिकरन झालेले.ह्या महारठ्ठ (माहाराष्ट्राचा) इतिहास खूप पुरातन व जुना व तसेच धर्माच्या सुंदरतेने नटलेला आहे. भविष्यात इतिहासात खूप मोठा बदल घडून येणार आहे  व तसेच या भारतातील भउसंख्य धर्मांध लोकांन मध्ये वैचारिक क्रांती सुद्धा घडून येणार आहे.व भारताचा खरा इतिहास लोकांना कळणार आहे. 

त्यासाठी आपले एवढेच कार्य आहे कि आपल्याला तर्कशील बुद्धीचा वापर करून खरा इतिहास शोधण्याची व तो लोकांना सांगण्याची गरज आहे आज ना आपल्याकढे कोणते हस्तलिखित पुरावे आहे जे होते ते नालंदा व तसेच भारतातील पुरातन बौद्ध  विद्यालयान बरोबर जळून खाक झाले आणि जे आहे त्यात मनुवादी मिसळण केली गेली आहे त्यामुळे ह्या परिस्थितीत आपल्याला जर आपला खरा इतिहास शोधायचा असेल तर आपल्याला आपल्या तर्कशील बुद्धीचा वापर करूनच शोध घ्यावा किंवा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा कोणत्या सुद्धा गोष्टीवर आंधविश्वास न करता सत्याचा शोध घ्यावा तेव्हाच ह्या भारताला पूर्वीप्रमाणे त्याचे बौद्ध विचार मिळतील आणि पुन्हा भारताचा  सोन्याचा पक्षी म्हणून उल्लेख केला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com