ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे राजकारण तापणार
ठाणे : ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. महेश आहेर यांची अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्त पदी बढती झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. प्रशासनाने ही अर्हता सत्य असल्याचा निर्वाळा देत बढतीच्या माध्यमातून या वादावरही अखेर पडदा टाकला आहे. अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या रिक्त झालेल्या जागेवर श्री. गोदापुरे यांना बढती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे करनिर्धारक आणि संकलक, सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन, आणि परिमंडळ ३ चा कार्यभार देण्यात आला आहे.
मनीष जोशी यांना घनकचरा व्यवस्थापन, सचिव, आरोग्य विभाग, एलबीटी, स्थावर मालमत्ता आणि परिमंडळ १ ची जबाबदारी देण्यात आली आहे. मारुती खोडके यांच्याकडे मुख्यालय, मागासवर्गीय कक्ष, कार्मिक विभाग, अग्निशमन विभाग, नागरी सुविधा कक्ष, उद्यान वृक्षप्राधिकारण, जाहिरात विभाग जनसंपर्क कक्ष राजेश कवळे यांच्याकडे जकात, ज्ञानेश्वर ढेरे यांना माहिती व तंत्रज्ञान, परवाना आणि कार्यशाळेचा पदभार सोपवण्यात आला आहे. वर्षा दीक्षित यांच्याकडे समाजविकास आणि महिला व बालकल्याण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.अनघा कदम यांची शिक्षण विभाग, भांडारपाल, प्रदषणू नियंत्रण विभागाच्या उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. मिनल पालांडे यांना क्रीडा विभागाच्या उपायुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांना परिमंडळ २चा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे
ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्त हे एकत्रितपणे मनमानी कारभार करत असून सर्व प्रकारच्या अनधिकृत -अवैध आणि अनियमित गोष्टींना पाठीशी घालत आहे. नुकत्याच झालेल्या बढती आणि बदल्यांमध्ये अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. नुकतेच अतिक्रमण विभागात वादग्रस्त अधिकाऱ्याची नेमणूक करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना एकप्रकारे पाठबळ देण्याचे काम आयुक्त आणि सत्ताधारी मिळून करत असल्याचा थेट आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
ठाणे हे सांस्कृतिक शहर असून या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. अनधिकृत बांधकामांचे शहर असा उल्लेख ठाणेकर कदापि सहन करणार नाहीत. आयुक्तांचा बोलविता धनी कोण आहे? महेश आहेर यांच्या बाबत सफाई कामगारांपासून अनधिकृत बांधकामांविरुद्ध तक्रारी करणाऱ्या अनेक नागरिकांचे आक्षेप असूनही त्यांची नियुक्ती अतिक्रमण विभागात आकाराने संतापजनक आहे. याबाबत कोणती गोल्डन गॅंग कार्यरत आहे याचा भांडाफोड योग्य वेळी केला जाईल तसेच पुढील काळात वॉर अंगेंस्ट इल्लीगल कन्स्ट्रक्शन ही मोहीम लोकसहभागातून सुरू केली जाईल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तसेच ही नियुक्ती आयुक्तांनी रद्द करावी, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली आहे.
पदोन्नतीकरीता खोटे दस्तावेज सादर केले
आधी सहाय्यक आयुक्त पदावरुन तत्काळ पदमुक्त करावे
0 टिप्पण्या