सिने अभिनेता गगन मलिक अर्थात श्रमण अशोका यांच्यासह थाई भिक्खूसंघाची चैत्यभूमीला भेट

  

मुंबई- आंतरराष्ट्रीय थाई भिक्खु संघासोबत सिने अभिनेता गगन मलिक अर्थात श्रमण अशोका यांनी आज २ एप्रिल रोजी दादर चैत्त्यभूमीला भेट दिली. सिने अभिनेता गगन मलिक यांनी थाईलंड देशाच्या राजधानीचे  शहर, बैंकॉक येथील वॉट थोंग बुद्धिस्ट टेम्पल या ठिकाणी श्रामणेर दिक्षा घेतली.  चैत्यभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी भदन्त विनयबोधी,  भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि पदाधिकारी तसेच प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे व अनेक उपासक-उपासिका बहुसंख्येने उपस्थित  होते.

   बौद्ध धम्माचा संपूर्ण जगात प्रचार-प्रसार करण्यासाठी  सम्राट अशोकानी   बुद्धिस्ट मोनेस्ट्री (निवासी) 84 हजार स्तूप निर्माण केले. सम्राट अशोक यांचे बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अतुलनीय कार्य आहे. ज्यांनी ज्यांनी बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार केला ,त्या सर्व आदरणीय महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून ,वर्तमान काळात गगन मलिक यांनी संपूर्ण भारतात 84000 बुध्द मूर्तीचे वाटप करणे.  जगातील विभिन्न बौध्द देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्थापना करणे.  बुध्द धम्म प्रचारासाठी मोठी Buddhist Monastery मध्य भारतात स्थापन करणे.  भिक्खु प्रशिक्षण केंद्र सुरू करणे. बुध्द धम्म प्रचार साठी ईतर आवश्यक संसाधन निर्मिती करणे. आदी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.  या संकल्पाची सुरुवात बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्त्यभूमि दादर येथून करणार असल्याचे श्रमण अशोका यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या