1998 च्या सहा डिसेंबर रोजी आपलं प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. अनेक मित्रमंडळीसह अनियतकालिक सुरु झाले, काही विशेषदिनांचे औचित्य साधून नियमित अंक प्रकाशित करण्यात येत होते. दरम्यानच्या काळात अनेक पुरोगामी विचारांची दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनियतकालिकं बंद झाली. तरीही मधल्या काळात आपलं प्रजासत्ताक अधून मधून प्रकाशित होत असे. मात्र नियमित प्रकाशनाकरिता रजिस्ट्रेशन अर्थात रितसर नोंदणी आवश्यक होती. चार ते पाच वेळा प्रयत्न करूनही प्रजासत्ताक नावाने नोंदणी होत नव्हती. अखेर 2010 साली प्रजासत्ताक जनता या नावाने अधिकृत नोंदणीचे पत्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हाती पडले.
आता दैनिक म्हणून नियमीतपणे प्रकाशन होत आहे. हे केवळ आपल्यासारख्या वाचक, हितचिंतक आणि मित्रमंडळीच्या सहकार्यने शक्य होत आहे. यापुढेही दैनिक प्रजासत्ताक जनता नियमितपणे प्रकाशित होण्याकरिता आपले सहकार्य असेल हीच अपेक्षा...
तरीही इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 98341 49302 98690 19077 यांच्याशी संपर्क साधावा
0 टिप्पण्या