मराठा बहुजन समाजाच्या तरुणाच्या धडावर डोके आहे पण त्यातील मेंदू हा भटाच्या नियंत्रणा खाली आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते.तिथीनुसार शिवजयंती सन्मान की अपमान?.राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य औरंगाबाद दौऱ्यावर असताना केले होते. त्याचा निषेध राष्ट्रवादी शिवसेनेने विधानसभा सभागृहात केलाच होता आणि रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा केले होते.सत्ताधारी शिवसेनेची विचारधारा आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रेम हे राजकारणासाठी दाखवून देण्याची अचूक वेळ होती.त्या भगतसिंह कोश्यारीचा राज्यभर शिवसैनिकांनी रस्तावर उतरून निषेध केला होता.तो कौतुकास्पद होता.म्हणजेच समर्थ रामदासस्वामी हा छत्रपती शिवाजी महाराजाचा गुरु नव्हताच हे शिवसेना पक्षप्रमुख,खासदार,आमदाशिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून पुरुरंदरे, बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला आहे.पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले.अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले.ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय? तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये, शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना होती. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा ब्राम्हणी कावा आहे.
इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर जानेवारी ऐवजी चैत्र (एप्रिल) महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे व तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात. ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. मग तिथी प्रमाणे वाद कायम का राहत?. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा प्राथमिक शाळा देखील चालत नाही.शिवाजीराजे जर,राष्ट्रपुरुष, युगपुरुष आहेत.तर तिथीत अडकविण्या इतके राजे लहान का करता?. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकर यांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.कारण तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. भटजीची रोजगार हमी आली व ती चालावी या करीतच हा वाद आहे, तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला.त्यामुळे कावळे आणि मावळे संघर्ष अटळ आहे. त्यात हे मराठी माणस व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठे अपोआप पुढाकर घेऊन वाद पेटवितात.हेच ब्राम्हणांना चांगले कळते.
शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर,बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का?.कारण तो समाज जागा असल्यामुळे ब्राह्मण हे धाडस करत नाहीत.मग शिवरायांचे मावळे कोण?.शिवचरित्रावर विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते.यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा होता व आज ही आहे. म्हणूनच बाळकडू पिलेले जेजे कावळे आहेत ते शिवजयंती निमित्ताने सत्यनारायण महापूजा ठेवतात.ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सन्मान करण्यासाठी नव्हे तर मनुस्मृती नुसार शूद्र राजाने शौर्य दाखवुन स्वराज निर्माण करून बहुजन समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून दिला यांचा बदला म्हणून अवतारी पुरुष बनविले.छत्रपती शिवाजी महाराजांना देवीचा आशीर्वाद होता त्यामुळेच त्यांनी लढाया जिंकल्या असा भ्रम निर्माण केल्या जातो.त्याकरिता सत्यनारायण महापूजा घातली जाते. पण हे करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कोणत्या गड किल्ल्यावर सत्यनारायण महापूजा घातल्याचा इतिहास आहे काय?.
मग तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी ही मंडळी महाराजांचा सन्मान करीत नसुन घोर अपमान करीत आहेत. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळत कसे नाही.हा इतिहास माहिती असणारे एक मराठा लाख मराठा म्हणणारे कुठे झोपेत त्यांना हा अपमान दिसत नाही काय?.भारत सरकार व राज्य सरकार हे भारतीय राज्य घटने नुसार म्हणजेच संविधानानुसार चालविल्या जाते.आज राज्यात सत्ताधारी पक्ष शिवसेना आहे.आणि शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत.त्यामुळेच शिव जयंती कशी साजरी झाली पाहिजे.शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली होती.तिच्या निर्णयानुसार कि मनुस्मृती नुसार?. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळले पाहिजे.आता तिथीनुसार शिवजयंती साजरी करतांना तीच शिवसेना समर्थ रामदासस्वामी छत्रपती शिवाजी महाराजांना बोट दाखवणारा फोटो होडींगवर लावून राज्यभर सत्यनारायण महापूजा घालत असेल तर शिवसेनेची विचारधारा आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रेम किती खरे किती खोटे स्पष्टपणे दिसून येते.आर एस एस प्रणित भाजपचा राज्यपाल त्या भगतसिंह कोश्यारीचा राज्यभर शिवसैनिकांनी रस्तावर उतरून निषेध केला होता.तो राजकारणाचा एक कुरघोडीचा डाव होता.असे स्पष्टपणे दिसून आले.
सागर रामभाऊ तायडे,
भांडुप मुंबई, 9920403859,

0 टिप्पण्या