कांशी तेरी नेक कमाई, हमने बेचके खाई !.


भारतीय राजकारणात जातीला आणि त्यांच्या समूहाला जे नांव दिल्या जाते तेच त्याचे हुकमी पत्ते असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्मातून जे तडपदार तरुण गोळा केले त्यांना त्यांनी नांव दिले होते मावळे.हेच मावळे शिवाजी महाराजाच्या नेतृत्वात संघटीत झाले.स्वकियाशी ३२ आणि परकीयाशी १२ लढाया लढून त्यांनी रयतेचे राज्य स्थापन करून स्वराज निर्माण केले, महात्मा जोतीराव फुलेंनी सर्व ब्राम्हण सोडून सर्व समाजाला ब्राम्हणेतर म्हणून संघटित केले आणि सत्यशोधक समाज निर्माण केला.देशातील पहिली असंघटीत बांधकाम व गिरणी कामगार संघटना बांधली. त्यांना कामगार म्हणून मान्यता मिळवून रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे सारखा तडपदार वैचारिक संघर्ष करणारा नेता दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक समाजाला प्रबुद्ध मानव बनविले आणि सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक परिवर्तन घडवून राजकीय परिवर्तन घडविण्याची ताकद मागासवर्गीय समाजात निर्माण केली.त्यांना भारतीय म्हणूनच देशभरात मागासवर्गीय समाजाचे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडून जातात. पण ते गुलामी स्विकारतात त्याला नाईलाज आहे. उत्तर भारतात मागासवर्गीय समाजात जनजागृती करून बहुजन समाजाला जागे केले म्हणून ही घोषणा बहुजन समाजाच्या घराघरात दिली जाते "कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई !" २०१२ पासून २०२२ ला विधानसभा लोकसभा निवडणुकीत ती क्रांतीकारी घोषणा अर्थपूर्ण बदली कांशी तेरी नेक कमाई, हमने बेचके खाई!.अशी झाली.

कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ ला झाला.(मृत्यू ९ ऑक्टोंबर २००६) ते भारतीय राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील विशेष तज्ञ म्हणून ओळखल्या जात होते.त्यांनी भारतीय वर्णव्यवस्था मोडून काढण्यासाठी सर्व मागासवर्गीय समाजात प्रचंड प्रबोधन करून जनजागृती केली.बहुजन समाज ही देशात ओळख निर्माण केली राजकीय परिवर्तन केले.दलित शोषित संघर्ष समिती डीएसफोर च्यामुळे उतरभारतात मागासवर्गीय समाजाची ओळख बहुजन समाज झाली. १९७१ ला त्यांनी अखिल भारतीय पिछडा और अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ म्हणजे All India Backward and Minority Communities Employees Federation (BAMCEF) ची स्थापना केली.पण एकदाही कामगार कर्मचारी यांच्या कोणत्या ही समस्या साठी आंदोलन केले नाही. आरक्षण,प्रमोशन,भत्ते यासाठी आजही बामसेफ आंदोलन करीत नाही. इतर जनजागृती साठी खूप काही करते पण राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या तोडीचे कामगार,कर्मचारी अधिकारी अल्पसंख्याक साठी कोणतेही ठोस काम नाही,म्हणूनच आरक्षण प्रमोशनच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे.राजकीय पक्ष निर्माण केला पण ट्रेंड युनियन कामगार संघटने कडे पूर्ण दुर्लक्ष केले.मात्र गोरगरीब मागासवर्गीय समाजात बहुजन समाजात प्रबोधन केले म्हणून कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई असे म्हटल्या जात होते.केवळ सत्ताधारी बनण्यासाठी क्रांतीकारी वैचारिक विचारधारेचा बळी दिला म्हणूनच कांशी तेरी नेक कमाई, हमने बेचके खाई!.असे लिहावे लागते.

१४ एप्रिल १९८४ बहुजन समाज पार्टी BSP ची स्थापना केली.सर्व समस्यांची गुरुकिल्ली हि सत्ता असते सत्ता सर्व कुलुपाची चाबी असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते १९८२ प्रबोधन करून संघर्ष करीत संघटित झाली,म्हणूनच २००७ ला उतर प्रदेशात पूर्ण बहुमताने निवडून आली होती आणि देशात एक नवा प्रेरणादायी इतिहास लिहला गेला होता.देशातील पहिला मागासवर्गीय महिला व देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली.आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय मागासवर्गीय महिला नेता ठरली होती.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यावर.जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती "बाबा तेरा मिशन अदूर बी एस पी करेगी पुरा !." तीच बसपा २०१२ च्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्य चीत झाली.तेव्हा कांशी तेरी नेक कमाई, हमने बेचके खाई!.ही घोषणा पुढे आली. त्यामुळे देशातील मागासवर्गीय समाज आपल्या १९३२ च्या परिस्थिती वर आला.

ज्या हिंदुत्वाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता त्याच जाग्यावर मायावती येऊन थांबल्या आहेत.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणारे हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय समाजात अल्पसंख्याक पीडित शोषित आदिवाशी समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ होती नी आहे.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा वर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते.केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही. जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?."गरीब छोडो,श्रीमंत जोडो" हे स्विकारल्या मुळे, "जाती तोडो समाज जोडो" कही हम भूल न जाये महापुरुषोका मार्ग (सिंद्धांत) हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने मातीमोल करून ठेवले.त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२ ,२०१७,आणि आता २०२२ च्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले. म्हणूनच नाईलाजाने हे लिहावे लागते कांशी तेरी नेक कमाई, हमने बेचके खाई!.

मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून पैसा व बुद्धी प्रशासकीय अनुभव समाजास मिळवुन दिला. त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली होती.त्याची सुरुवात ही सायकलवरून झाली. ते कार्यकर्त्याना नेहमी सांगत होते की सायकल ही माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने असे धाडस केलेले नाही.कांशीरामजी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली. तेव्हा पासून लिहल्या व सांगितल्या जाते कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई. 

मान्यवर कांशीरामजीने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भ्रष्टाचार कसे करू शकतात. आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात. कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला होता.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते. तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समाजातील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो. कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा असर आज कमी झालेला वाटत असला तरी हाच मागासवर्गीय समाज देशभरातील विविध क्षेत्रात विविध पक्षात सत्तेत भागीदार झालेला आहे.त्याला पुन्हा बहुजन समाज पक्षात आणणे ही काळाची गरज आहे. मागासवर्गीय बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व ही मान्यवर कांशीराम यांची जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी ही यु रचनाच करू शकते, पण बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारधारा स्विकारली तर सर्वजण हिताय म्हटले तर मनुवादी हिंदुत्व बहुजनांचे डोके ठिकाण्यावर ठेवणार नाहीत. हे लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा म्हणावे लागेल. "कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई!" या घोषणेचा अर्थच बदलून गेल्यामुळे आज देशातील सर्वात मोठ्या राज्यात क्रांतिकारी विचारधारा असलेली बसपा कुठे गेली हे समजत नाही.म्हणूनच उघडपणे लिहल्या व बोलल्या जाते.कांशी तेरी नेक कमाई, हमने बेचके खाई!.मान्यवर कांशीराम यांच्या जयंती दिना निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रमाण आणि विचाराने आचरणाने बहुजन असतील त्यांना हार्दिक शुभेच्छा. 


सागर रामभाऊ तायडे,

भांडूप मुंबई - ९९२०४०३८५९

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1