Top Post Ad

शिवरायांच्या स्वराज्यात मुस्लिमांचे योगदान

 मध्ययुगीन काळात सतराव्या शतकात दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला, त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आहे. ही स्थापना काही सहजासहजी झाली नाही. यासाठी त्यांना बलाढ्य मुगल साम्राज्याशी लढा देतांनाच स्वकियांचे बंड मोडून काढावे लागले. धूर्त फिरंग्यांना जेरीस आणून त्यांच्या साम्राज्यवादी धोरणास प्रतिबंध करावे लागले. तर जातीच्या कारणावरून राज्यरोहणास दरबारातील मोरोपंत पिंगळ्यासह सर्व ब्राह्मण सरदारांच्या प्रचंड विरोधात भीक न घालता राज्याभिषेक सोहळा साजरा करून स्वराज्याची स्थापना करावी लागली. 

सागरी संरक्षण- शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी पायदळ, घोडदळ, नावीक दल आणि जबरदस्त तोफखान्यासह एक कणखर व शिस्तबद्ध सेना उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हैसूरच्या टीपू सुलतान खेरीज भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्यकर्त्यांने सागरी सहरद्दीकडे लक्ष पुरविल्याचे दिसून येत नाही. राज्यकर्त्यांतील दूरदृष्टीचा अभाव. आपापसातील संघर्ष  आणि कर्मठ धर्मबंधनात जखडल्यामुळेच तसेच विलासी रंगात, रंगल्यामुळे सागरी सामर्थ्यांचा उपयोग करून घेण्यास असमर्थ ठरले. शिवाय त्या काळात सागरी सत्तेसाठी लढा देण्यास अनुकूल परिस्थिती नव्हती. धार्मिक बंधने, विधिनिषेधाच्या रुढी-परंपरेमुळे महाराष्ट्रीय सागरी सत्तेकडे मुळीच ओढा नव्हता. त्या काळात हिंदू धर्म संहितेनुसार सागरी पर्यटन, उल्लंघन निषिद्ध मानला जात असे. परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने आरमाराचे मर्म ओळखले होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सागरावर सत्ता गाजविण्याचा निर्धार करून, स्वराज्याच्या कार्यात आडकाठी निर्माण करणाऱया अयोग्य हिंदूसंहिता व रुढी परंपरा मोडून इ. स. 1660 ते 1662 च्या दरम्यान स्वतंत्र मराठा आरमार बांधणीस सुरुवात केली. चित्रगुप्त बखरी प्रमाणे छत्रपतींच्या नौदलात 640 लहान मोठी जहाजे होती. त्यांची आकाराप्रमाणे वर्गवारी करून 1) गुराबा, 2) गलबते, 3) होड्या, 4) महागिऱया, 5) तारवे, 6) पालगुज, 7) तरांडे, 8) मुबारे, 9) शिबाडे, 10) पाडाव, 11) मचवे, 12) तिरकटी, 13) पाल, अशी नावे ठेवण्यात आली होती. या नाविक दलात एकंदर पाच हजार नौ सैनिक नेमण्यात आले होते. प्रत्येक जहाजावर तोफखाना चढवून आरमार सज्ज झाल्यानंतर प्रथम दर्यासारंग (मुसलमान), व मायनाक (भंडारी) अशा दोन निष्णातांना नवदल अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या काळात नौदल प्रमुखास `सरखेल' असे म्हणत असत. या नाविक दलाच्या उभारणीस दहा लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. अशी माहिती सभासद बखरीत पृ क्र. 61 वर मिळते. 

मराठा आरमाराचा मुसलमान सेनानी - शिवाजी महाराजांनी आपल्या जातीतील अथवा आपल्या मर्जीतील अथवा नात्यातील अथवा वशील्यातील एखाद्या व्यक्तीस न नेमता, एका मुसलमानाला मराठा आरमाराचा प्रमुख अधिकारी म्हणून का नेमले? यावर स्वतंत्र संशोधन करता येईल, एवढा हा विस्तृत आणि सखोल भाग आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात दर्यासारंगसारखा एकच नव्हे तर, अनेक मुसलमान होते. त्यातून त्यांच्या योग्यतेनुसार कसोटीला उतरलेल्या मुसलमान सरदारांना नाविक दलात महत्त्वाच्या जागी नेण्यात आले होते. विशेष म्हणजे जहाजावरील खलाशापासून ते गोलंदाजापर्यंत व गोलंदाजापासून ते आरमाराच्या सर्वोच्च पदाधिकाऱयापर्यंत अनेक मुसलमानांना महाराजांनी नियुक्त केले होते. याविषयी इतिहासकार एस.टी. दास म्हणतात, ``शिवाजी महाराजांच्यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि सागरी किल्ल्याचे प्रमुख हे सर्व मुसलमान होते.'' शिवकालीन पोर्तुगीज शिवचरित्र लेखक कॉस्मा डा-गार्दा म्हणतो, ``शिवाजी महाराजांच्या नौदलातील अधिकांश कॅप्टन मुसलमान होते.'' "Most of the Captains of Shivaji's fleet were Muslims"  या संदर्भात सुरेंद्रनाथ सेन म्हणतात, ``शिवाजी महाराजांच्या नौसेनेत दर्यासारंग हा एकमेव मुसलमान नौसेनानी होता, असे नव्हे तर, दर्यावर्दी दौलतखान हा दुसरा नावाजलेला व निष्ठावंत मुसलमान नौदलप्रमुख होता.'' 

मराठा नौदलात, दौलतखान- दौलतखान व सिद्धी मिस्त्री यांचे हवसणच्या सिद्दी सरदाराबरोबर सूत्र जुळले नाही म्हणून या दोघांनी त्यांची चाकरी सोडून दिली. परंतु शिवाजी महाराजांनी या दोघांतील गुण ओळखून त्यांना आपल्या नाविक दलात सामील करून घेतले. थोड्याच कालावधीत त्यांची स्वराज्यावरील निष्ठा, योग्यता व कर्तबगारी पाहून आपल्या नौसेनेत सर्वोच्च पदावर नेमले.  

पुढे मराठा आरमार सर्व युद्ध साधनसामुग्रीने सुसज्ज झाल्यानंतर अरबी समुद्रात गस्त घालू लागले. तसे जंजिऱयाचा किल्लेदार सुंबळ, सिद्दी कासिम, ब्रिटिश, प्रेंच, डच व पोर्तुगीज, फिरंगी व्यापाऱयांना दौलत खानाची दहशत वाटू लागली. बसनूरवर स्वारी-ऐतिहासिक पुराव्यावरून असे दिसून येते की, बसनूर (बार्सिलोर)वर स्वारीही शिवाजी महाराजांच्या आरमाराची पहिली यशस्वी स्वारी होती. बसनूर हे दक्षिणेतील एक महत्त्वाची व्यापारपेठ होती. शिवाप्पा नाईक जंगम हा तेथील नगर सेठ होता. महाराजांनी त्यास पत्र पाठवून कळविले की, आपणाकडे वकील पाठवितो. आम्ही आपल्या शहराच्या रक्षणाची हमी घेतो. आम्हास वार्षिक खंडणी देत जावी. तेव्हा शिवाप्पाने उद्धटपणाने उत्तर दिले की, `` तुमच्यात दम असेल तर यावे आणि खंडणी वसूल करावी!'' या नगर सावकारास धडा शिकवावा आणि तेथील पोर्तुगीज व्यापाऱयांवर वचक बसावा या दुहेरी उद्देशाने आरमारास सज्ज राहण्याचा इशारा दिला. एके दिवशी पहाटे, शहर गाढ झोपेत असताना अचानक शहरावर हल्ला चढविला. या हल्ल्यात बरेच हिरे-माणिक, जड-जवाहिरे, सोने-नाणे आणि मोठी संपत्ती हाती लागली. महाराजांनीं स्वयं बार्सिलोर शिवाय आरमाराने कधीही मोहिमा केल्या नाहीत. मात्र बार्सिलोर शहर मोहिमेप्रसंगी ते जहाजात बसून गेले व तसेच जलमार्गाने परत आले. या जलप्रवासाने त्यांना फार त्रास झाला. म्हणून त्यांनी पुन्हा जलप्रवास केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण कल्पना शक्तीपुढे आणि नौदलातील मुसलमान सेनानी दर्यावर्दी दौलतखान, सिद्धी मिस्त्री, दर्या सारंग आणि नौसैनिकांच्या पराक्रमामुळे ही पहिलीच मोहीम यशस्वी झाली होती. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडलेला स्वराज्याचा नौसेनानी दौलतखान म्हणजे सागरी युद्धाची दिशा बदलून, वादळातून वाट काढणारा निष्णात दर्यावर्दी होता. तो एक शिस्तप्रिय फौजी जनरल होता. त्याची आपल्या आरमारावर जबरदस्त कमांड होती. त्यांच्या पराक्रमामुळे हताश झालेल्या फिरंग्यांना दौलतखान यांच्या मार्गातील मोठी धोंड वाटत असे, कारण त्याने इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि शत्रुपक्षावर जबरदस्त धाक बसविली होती. या धाकापोटी फिरंगी व्यापारी आपली जहाजे सुरक्षित जावी म्हणून शिवाजी महाराजांना वार्षिक खंडणी देत होते. तसेच खाडी युद्धात फिरंग्यांकडून दौलतखान जबर जखमी होऊन त्याचा पराभव झाला या वार्तेने त्यांच्या आनंदाला तर उधाण आले होते. असे तारीख 24 जुलै 1678 रोजी कॅप्टन अंडर्स्टन याने मुंबईला लिहिलेल्या पत्रावरून दिसून येते आहे. 

मराठा नौदलाची अनेकांनी धास्ती घेतली होती  शिवाजी महाराजांच्या आरमाराने राजापूर, बसणूर, वेंगुर्ले, खारे, गोवा, गोकर्ण आणि मालवण एवढा मोठा सागरी प्रदेश आपल्या अंमलाखाजी आणला होता. त्यामुळे साहजिकच सागरावर सत्ता गाजविणाऱया सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, प्रेंच, डच यांना मराठा नौदलाची भीती वाटत होती. मराठा नाविक दलाची अनेकांनी धास्ती घेतली होती. स्वराज्याच्या नौसेनेतील सेनानी दर्यासारंग, दौलतखान, दाऊदखान, इब्राहिमखान, सुलतानखान आणि सिद्दी मिस्त्री अशा अनेक मुसलमानांनी गाजविलेल्या शौर्यामुळे मराठा आरमाराचे नाव अनेकांच्या तोंडी झाले होते. या मुसलमान नाविक अधिकाऱयांमुळे सहसा मराठा नौदलाच्या विरोधात कोणी जात नव्हते. अनेक सागरी मोहिमांत शिवरायांच्या या मुसलमान अधिकाऱयांनी आपले स्वतचे रक्त सांडून विजय प्राप्त केले आणि मराठा आरमारावर स्वराज्याचे निशाण फडकविले.छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ नौदलातच नव्हे तर राज्य शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मुस्लीमांना प्राधान्य दिले हाते. कारण शिवाजी महाराजांचा विश्वास मुसलमानांवर होता. तर, मुसलमानांची निष्ठा शिवाजी महाराजांवर होती. म्हणून सह्याद्रीचा माथा असो अथवा समुद्रातील लाटा असो, स्वराज्याच्या उभारणीत आपले रक्त सांडणाऱया मुसलमानांचा उल्लेखनीय सहभाग होता, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. 

मुसाखान - सदस्य-`फुले-शाहू-आंबेडकर विचार' मुस्लीम मंच, सोलापूर 

-------------------------------

शिवजन्मोत्सव 19 फ़ेब्रुवारीला का साजरा करावा ?

महाराष्ट्र शासनाने इतिहास संशोधन करून 2001 मध्ये अध्यादेश काढून 19 फ़ेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवरायांची जन्मतारीख निश्चित केली.या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे,"कालनिर्णय" वाले जयंत साळगावकर,निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे.या मंडळींनी तत्कालीन काळात शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी असे वक्तव्य केले.

तिथी प्रमाणे शिवजंयती का साजरी करू नये ?

कारण वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय तिथी प्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते.

उदाहरण म्हणजे 2000 साली शिवजयंती 23 मार्च ला होती तर 2001 साली 12 मार्च,2002 साली 31 मार्च,2003 साली  20 मार्च,2004 साली 09 मार्च आणि 2005 साली 28 मार्च रोजी•••••

आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की....टिळक, गांधी, नेहरू तसेच हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान विनायक सावरकर अशा अनेकांची जयंती सर्वत्र इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे का? आणि वैदिक ब्राह्मणी कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह ब्राह्मणी लोक का धरतात?

ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला या मागील मनुवादी षडयंत्र काय ?

तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती अगदी जोरदार पद्धतीने साजरी होईल कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते त्यामुळे वाद संपतो.

सरकारी बँका, कार्यालये, शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात.विचारांची देवाण घेवाण होते.

त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र बहुजनांचा खरा इतिहास जनतेला समजतो आणि खरा इतिहास समजला तर बहुजनसमाज वैचारीक दृष्ट्या जागृत होत जाईल ही मनुवाद्यांना भीती आहे म्हणून ठराविक ब्राह्मण शिवचरित्रात जयंतीचा वाद निर्माण करतात म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजनसमाजाची शक्ती खर्च व्हावी हा मनुवाद्यांचा डाव आहे. 

छत्रपती शिवाजी राजे तर विषेशवंद्य असे युगपुरुष आहेत. तिथीत अडकविण्या इतके राजे लहान नाहीत. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकराने तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. भटजीची रोजगार हमी चालावी आणि वादातच शिवराय व शिवभक्त संपावेत यासाठी भटजी तिथीचा आग्रह धरतात. 

तारीख तिथीचा वाद लावून मनुवाद्यांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष मनुवाद्यांनी अगदी जाणीवपूर्वक निर्माण केला.

आपण पाहूया वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय कालगणना म्हणजे नेमकं काय ?

वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रा नुसार कालगणा विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन कालगणना वैदिकांचे आहेत.

यातही बोंब अशी की या वैदिक ब्राह्मणी कालगणनेमध्ये भारतातच अनेक बदल आहेत.

उदाहरण विक्रम संवतच्या वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे तर गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे.

तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने पुढे आहे म्हणजे तामिळनाडूत 300 वी शिवजयंती असेल तर महाराष्ट्रात 299 वी शिवजयंती असेल. याचा अर्थ इतकाच की वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्र म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही.

दैनंदिन व्यवहारात सर्व सामान्य भारतीय वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात. जर वैदिक ब्राह्मणीधर्मशास्त्रीय तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी किती तारखेला जयंती येईल हे साळगांवकर सारख्या भटांच्या पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.

अर्थात आपल्याच महापूरूषांच्या जन्माचे दाखले अशा लोका कडून घ्यावे लागतील जे भटबामण आजही आपल्या मुलांची नावे शिवाजी- संभाजी ठेवत नाहीत•••••

जेव्हा पासून शिवजंयतीची सुरूवात 19 फेब्रुवारीला झाली तेव्हा पासून महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर देखील शिवजंयती साजरी होत आहे.

त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे.काही ब्राह्मणी मनुवाद्यांना मात्र शिवजयंतीच्या माध्यमातून स्वत:चे स्वार्थी धर्मकारण आणि राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात.वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात बहुजनां मध्ये संभ्रम निर्माण होतो अर्थात एकवाक्यता राहत नाही. वैचारिकांचे वैचारिक स्तरावर विभाजन होते.

बहुसंख्याक बहुजन अल्पसंख्यांक होतो आणि अल्पसंख्यांक वैदिक ब्राह्मण बहुसंख्याक होतो. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे म्हणून 19 फ़ेब्रुवारी 1630 ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्वीकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती 19 फ़ेब्रुवारी रोजीच मंगलमय वातावरणात साजरी केली पाहिजे.

#जय_जिजाऊ !

#जय_शिवराय !शिवजन्मोत्सव 19 फ़ेब्रुवारीला का साजरा करावा ?

महाराष्ट्र शासनाने इतिहास संशोधन करून 2001 मध्ये अध्यादेश काढून 19 फ़ेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवरायांची जन्मतारीख निश्चित केली.

या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे,"कालनिर्णय" वाले जयंत साळगावकर,निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे.या मंडळींनी तत्कालीन काळात शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी असे वक्तव्य केले.

#जय_शिवराय !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com