Top Post Ad

पँथर चळवळीचे योगदान

 मराठवाडा विद्यापिठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही मागणी 1977 साली जोर धरू लागली होती. त्यावेळी मी 11वी साठी मिलिंद महाविद्यालयात औरंगाबाद येथे प्रवेश घेतला. अतिशय छोट्याश्या खेड्यातून भव्य शहरात आलो होतो. पुढे या आंदोलनातील मोर्चामध्ये भाग घेणे नित्यांचेच झाले. भडकलगेट वर संध्याकाळी वामनदादा कर्डक व इतर शाहीरांची गाणे या आंदोलनात जिव ओतत होते. 1978 साली शरद पवारांच्या सरकारने नामांतराचा ठराव विधिमंडळांत संमत केला आणि मराठवाडा मध्ये दंगल उसळली त्यात जर्नादन मवाळे, पोचिराम कांबळे इतर अनेक ज्ञात अज्ञात शहिद झाले. दंगलीची भिषणता भयंकर होती. दलिवस्त्या जाळल्या होत्या. काही गावांमध्ये दलित वस्त्या मोठ्या असल्यामुळे त्यांच्यात भेद करण्यात आला म्हणजे मातंग बांधवांना सागण्यात आले. तुमच्याशी आमचा वाद नाही जयभीमवाल्यांबरोबर आहे तुम्हास आम्ही काहीच करणार नाहीत तसेच चर्मकार बांधवानाही असेच सांगितले गेले, एकेकांना एकटे पाडूण वस्त्या पेटवल्या गेल्या आणि सरकारने या ठरावाची अंमलबजावणी करणे थांबवले पुढे याच मागणीसाठी आंदोलन सुरू राहीले. त्यात सहभागी होण्याशिवाय गत्यांतर नव्हते. दलित युवक आघाडी, युक्रांद, भारतीय दलित पॅर्थर, डावे पक्ष, संघटना पुरोगामी पक्ष संघटना या आंदोलनात होते हा ईतिहास आहे.  

दलित साहित्य संमेलन -  या दंगलीच्या पार्श्वभुमीवर औरंगाबाद येथे तिसरे दलित साहित्य संमेलन भरविण्यात आले. खरतर अतिशय प्रतिकूल अशा वातावरणात हे संमेलन झाले. गं.बा. सरदार, बाबुराव बागूल, कमलेश्वर, डॉ. बाबा आढाव, घनश्याम तळवळकर असे अनेक विद्वान उपस्थित होते. या सांस्कृतीक साहित्यिक चर्चेने मराठवाड्यांची दंगलीची  चिकित्सा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यांसारख्या विद्वानाच्या नावाला विरोध व्हावा त्यासाठी लोकांना जाळण्यात यावे या वास्तवाने सर्व लोक आतुनबाहेरुन हादरून गेले होते. या संमेलनात पोचिराम कांबळे यांच्या पत्नीचा सत्कार तथा सांत्वण करण्याचा कार्यक्रम झाला होता. डॉ. बाबा आढाव यांचे हस्ते या माउलीला साडी चोळी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बोललेले शब्द सर्वांच्या कानात एखाद्या तिरा सारखे घुसले होते. या साडी चोळीने माझे सांत्वन होणार नाही. तुम्ही सर्वांनी लढून या विद्यापिठाला ज्या दिवशी   बाबासाहेबांचे नाव दिसेल त्या दिवशीच माझे सांत्वन होईल. या वाक्यांने उपस्थितीतांच्या अंगात विज कडाडावी तसा भास झाला. पुढे अनेक कवी, कथाकार, नाटककार यांनी या आंदोलनावर लिहीले. हा प्रश्न जगभर गाजला, त्यासाठी नंतर झालेल्या आंदोलनातही अनेकांना उध्वस्त व्हावे लागले. त्याला महाराष्ट्र साक्षिदार आहे.  

नामांतरवादी कृती समिती-  विद्यापिठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यास जो विरोध झाला. त्यातून जी मानसिकता दिसली ती मानसशास्त्रज्ञानाही अंचबित करणारी होती. फुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडावे याने सर्वच स्त्ंाभित झाले. यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित या आंदोलनात उडी घेतली. या नामांतरवादी कृती समतीचे अध्यक्ष हे दलित्तेतर राहिले त्यात अॅड. अंकुश भालेकर, डॉ. बाबा आढाव, प्रा. बापुराव जगताप, प्रा. मोतीराज राठोड, प्रा. मोतीराम राठोड अशी अनेक नावे सांगता येतील. नामांतर आंदोलनाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा वैचारिक घुसळणीचा प्रयोग झाला त्यात माझेसारखे अनेक तरुण तयार होत होते. आम्हाला वैचारिक परिपक्वता येण्यासाठी हा काळ फारच महत्वाचा ठरला नामांतरवादी कृतीसमिती ही व्यापक असल्यामुळे त्यांनी केलेले काम हे ऐतिहासिक असे म्हणावे लागले. मराठवाडा पेटलेला असतांना अॅड. भालेकर स्वत: मराठवाड्यातील अंबड तालुक्यातील होते. मी. स्वत: काही दिवस त्यांच्या गावी त्याचे घरीही राहिलेलो आहे. म्हणजे कृतीसमिती ही व्यापक राहिलेली आहे. औरंगाबाद मध्ये जे नेहमी या आंदोलनात बरोबर असायचे त्याची यादी खूप मोठी आहे. सर्वांची नावे येथे घेता येणार नाहीत. पण प्रा. अविनाश डोळस, प्रा. प्रकाश शिरसाठ, भिमराव जाधव, प्रा. मोतीराज राठोड, शांताराम पंदेरे, मंगल खिवंसरा, अॅड. विष्णू ढोबळे, अॅड. प्रविण वाघ, सुभाष लोमटे, आसाराम गुरुजी, निशिकांत भालेराव, श्रीराम जाधव, अॅड. उदय चौधरी, प्रा. आदीनाथ रंगोले, खुशाल कांबळे, डॉ. गायकवाड असे अनेक नावे डोळ्यासमोर येतात. या सर्वांनी समितीबरोबर काम केलेले आहे. 

दलित पँथरची पन्नास वर्षे-  दलित पँथर या संघटनेचे आंबेकरी चळवळीत फार मोठे योगदान आहे, असे माझे मत आहे. या वर्षी दलित पँथर या संघटनेला पन्नास वर्षे पूर्ण?होत आहेत. दलित पँथर फुटीचा इतिहास सर्वज्ञात आहे. परंतु नामांतर आंदोलनामध्ये पँथरचा मोठा वाटा आहे. पुढे भारतीय दलित पँथर या रूपाने आली. प्रा. अरूण कांबळे त्यावेळी त्याचे एक नेते होते. `पुलोद' च्या सरकारमध्ये भाई वैद्य हे गृहमंत्री होते. त्यांना अगदी विद्वत्तापूर्वक प्रश्न विचारून निरअुत्तर करणारे आजही ते आठवतात. गंगाधर गाडे, रामदास आठवलेसारखे दलित तरुणांमध्ये त्यावेळी हिरो असलेले हे लोकप्रिय तरुण नेते होते. हे नाकारता येणार नाही. जळगावला झालेल्या मराठी साहित्य संमेलनात मराठवाडा fिवद्यापीठला डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, असा ठराव पास करावा यासाठी मोर्चा दरवर्षीप्रमाणे काढण्यासाठी रामदास आठवले सकाळी 5 वाजता अमृतसर एक्सप्रेसने पोहचले होते. अगदी संमेलन स्थळाच्या बाहेरच्या चहाच्या टपरीवर बसून आम्ही सकाळी आंदोलनाची चर्चा केली होती. यशपाल सरवदे त्यांचे बरोबर होते. तेथे मी, हरी नरके, लक्ष्मण माने व इतर कार्यकर्ते होतेच. शंकरराव खरात अध्यक्ष असल्यामुळे मोर्चा?न काढता निवेदन द्यावे असे ठरले. कारण दिवंगत मधुकरराव चौधरी स्वागत अध्यक्ष होते. त्यांनी ठराव करण्याचे ठरवलेले होतेच. 

आज बराच काळ निघून गेल्यामुळे पँथरची चळवळ तीचे योगदान या विषयी चर्चा?जोर धरू लागली आहे. दलित पँथर सुवर्ण जयंती महोत्सव समिती निर्माण करण्यात आली आहे. वैचारिक घुसळण करणे हाच या समितीचा खरा उद्देश आहे. नवीन पिढीला ही चळवळ समजवून सांगणे, पँथरचे काय?चुकले वगैरेच्या विषयी काही न बोलता नवीन पिढीला काय देता येईल हा विचार समोर ठेवला आहे. त्यासाठी एक भूमिका ठरवून लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न आहे. 10 जानेवारी रोजी डॉ. आंबेडकर भवन दादर येथे शहिदांना अभिवादन सभा झाली त्यात शामदादा गायकवाड यांनी एक दिशादर्शक मांडणी करून समितीला दिशा दिलेली आहे. बुद्ध आणि धम्म हे डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या तात्विक विचारांचा आधार घेऊन लोकांसमोर गेले पाहिजे, स्टेट अॅड मॉनॉरिटिज या ग्रंथाचा आधार नैसर्गिक मित्रांना बरोबर घेवून जावे लागले अशी मांडणी त्यांनी केली. आज आंबेडकर चळवळ ज्या आर्वतात सापडलेली असे त्यासाठी हा प्रयत्न जाणिवपूर्वक  करावा लागेल असे ही वाटते. आंबेडकरी चळवळ ही सतत प्रवादी राहिलेली आहे. परंतु ती प्रवाहाविरुध्द वाहणारी असल्यामुळे प्रस्थापीत व्यवस्था हीच समोरची शत्रू आहे. त्याची जाणीव ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागेल एवढे नक्की    

अॅड. नाना अहिरे     9820855101
निमंत्रक -  डॉ. आंबेडकर राईटर असोसिएशन मुंबई  


दलित पँथरची पहिली छावणी



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. वास्तववादी चित्रण! सामाजिक प्रबोधन आणि पुरोगामी लोकांना एकत्र करुन पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com