कोरोना महामारी , सरकार आणि आपण

         सध्या कोरोनानंतर ओमायक्रानने जगभरातील माणसांच्या मनावर भययुक्त राज्य करणं सुरू केलंय. हजारो पिढ्यांपुर्वी अनेक रोगांचे थैमान होते.काही आजेपणजे कधी मरीआईच्या गोष्टी सांगायचे.म्हणायचे , मरीआई आली की बैलगाड्यांनी प्रेतं पुरायला नेत असत. पण त्यांनी तत्कालीन राज्यकर्त्यांनी लाकडाउन, जमावबंदी केल्याची गोष्ट कधी सांगितली नाही.


 आता विषाणू आला की लगेच आपला लाकडाउनशी परिचय होतो.कारण आता राज्यकर्ते अतिहुशार आहेत. पुर्विच्या राज्यकर्त्यांना जणू जनतेची पर्वा नव्हती.आपल्या प्रधानमंत्र्यांनी सुरूवातीला कोरोनाला हरविण्यासाठी जे उपाय, उपचार सुचविले ते अतिशय विनोदी होते. टाळ्या वाजवा, भांडी वाजवा आणि दीवे विझवा हे ते उपचार, उपाय होते. प्रधानमंत्री आज जनतेला संबोधित करणार म्हटले की भारताची जनता टीव्ही कडे डोळे लावून बसायची.आणि मग जनतेला क्रमवारीने  वरील उपचारांविषयी माहिती मिळायची.  प्रधानमंत्री गंभीरपणे बोलायचे आणि भयग्रस्त जनता ते मन लावुन ऐकायची . माझ्या शेजारचे लोक बाहेर टाळ्या वाजवायचे भांडी वाजवायचे मला मौज वाटायची. आम्ही फक्त बघायचो . लोकांनी दिवे विझविले  आम्ही त्यावेळी सर्व दिवे सुरु केले . सर्वत्र अंधार होता.आमच्या घरात बाहेर उजेड होता . नंतर काही लोक आम्ही फार मोठा गुन्हा केलाय अशा नजरेने आमच्याकडे बघू लागली . तोपर्यंत कोरोना गाव खेड्यात आणि अगदी आमच्या गल्लीत येऊन ठेपला होता . ज्यांनी टाळ्या पिटल्या भांडी वाजविली आणि दिवे मालविले त्यापैकी काहींना कोरोना झालाय ? थोडक्यात कोरोना विषाणू अंधाराला घाबरत नाही . आणि टाळ्या , भांड्यांच्या आवाजाने पळुन गेला,जात नाही . किंवा आम्ही भांडी वाजविली नाही, टाळ्या पिटल्या नाही , दिवे विझविले नाही म्हणून आमच्यावर कोपला नाही . ही माझ्या गल्लीतील गोष्ट आहे.  वरीलपैकी उपाय करणाऱ्या देशभरातील अनेकांना कोरोना झालाय . ह्याचा अर्थ काय ? अर्थ एवढाच आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे  एम बी बी एस (एम डी) डाक्टर नाहीत . हे देशातील अनेकांना समजलं नाही . ‌प्रधानमंत्र्याची मन की बात , जनता को संबोधित करेंगे ही विधान म्हणजे ह्या देशातील आजपर्यंतचा सगळ्यात मोठा विनोद आहे .


 राज्यकर्त्यांनी सांगुन ठेवल्याप्रमाने पहिली लाट ,दुसरी लाट आणि आता तिसरी लाट आलिय . देशाने जगाने, आजपर्यंत अनेक जीवघेणे आजार पाहिलेत . एड्स अजूनही आहे , चिकनगुनिया अजुनही कमी अधिक  आहेत. टीबी (क्षय) अजुनही आहे . हिवताप, मलेरिया, बर्डफ्ल्यू अजुनही आहे. कॅन्सर अजुनही आहे. हे सारे आजार अजुनही आहेत.  आता लोकांना ह्या आजारांची आणि अशा रूग्णांची सवय झालीय . आपल्याला  ह्यातुन मुक्ती नाही .म्हणजे कुणालाही हे आजार होऊ शकतात आणि ते योग्य वेळी उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात . किंवा नियंत्रणात राहु शकतात असा लोकांचा विश्वास झालाय .पण कोरोना हा तसा जागावेळा आजार आहे. ह्याचे विषाणू अतिशय आज्ञाधारक आहेत. ह्या विषाणूनां स्वतःची मते नाहीत . हे अनेकदा आज्ञेची वाट बघतात . सरकार म्हणेल तेव्हा ते येतात आणि सरकार म्हणेल तिथे जातात .

सरकारने ज्या वेळी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली त्यावेळी कोरोना आलाय . सरकार म्हणालं होतं, लहान मुलांनाही त्याची बाधा होईल, आणि विषाणूनी आता आपला  मोर्चा मुलांकडेही  वळविला . हा एकमेव विषाणू आहे, जो सरकारच्या आज्ञेचं  पालन करतो . हा एकमेव विषाणू आहे जो लाकडाऊन झालं की लपून बसतो . भुतकाळ असे आज्ञाधारक विषाणू नव्हते. आता तर सरकारच्या सर्कशीत हे विषाणू सरकारच्या इशारयावर छान लपाछपी खेळतायत. कोरोना हा बहुरुपी आहे . त्याची अनेक रुपे आहेत . काळी बुरशी, डेल्टा ,ओमायक्रान  हे  सर्व  कोरोनाचे  प्रकार आहेत. आणि गंमत अशी की  ते नाकातच  राहाणं पसंत करतात. ह्यांना काबुत ठेवण्यासाठी प्रभावी हत्यार म्हणजे लाकडाऊन!

                   आपण ह्या सर्कशीतील प्रेक्षक आहोत. सरकारचा खेळ बिनबोभाट बघत बसणं ह्यापेक्षा आपण दुसरी भुमिकाच पार पाडत नाही.आपण कधी विचार केलाय का? कधी स्वतःला काही प्रश्न विचारले आहेत का? 

       


          अगदी सुरुवातीला दील्लीत कोरोनाचा रुग्न मिळाला असेल तर लाखांदूरात ( भंडारा ) लोकांचा थरकाप उडत असे. कुठुन बाहेरून एखाद पाहुणा आला असेल तर पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि रुग्णालय कर्मचारी त्याची झडती घेत असत. त्याला १४ दिवस कोरंटाईन ठेवत असत. आता कोरोना दील्ली पासून गल्लीत आलाय.  आता रुग्न  होम कोरंटाईन राहु लागले. त्याची दील्लीत दहशत असतांना  आता गल्लीत हजेरी झालीय.  घराच्या एका खोलीत रुग्न आणि बाजूला त्याचे कुटुंब राहु लागले. चौकशीला कुणी येत नाही. ह्याचा अर्थ कोरोना जीवघेणा आजार नाही. तो साथीने पसरणाराही आजार नाही. परंतु सरकार आणि मिडियाने त्याला नको तितका विकराल, भयावह असल्याचा देखावा निर्माण केला आहे. टीव्हीचं बटन दाबलं की चैनल कोणतंही असु द्यात  , तिथे फक्त कोरोनाचीच बातमी. बरेच लोक वारंवार बातम्या ऐकून अटॅकने मेले असतील. एवढी दहशत पसरविली गलीय. सुरुवातीला  नुसत्या बाधितांच्या बातम्या असायच्या. नंतर दुरुस्ती च्या बातम्या येऊ लागल्या. म्हणजे हा बरा होणारा आजार आहे. तर मग त्याचं इतकं भय पेरण्याचं  कारण काय? कारण व्हॅक्सीन निर्माणाचं काम अनवरत चालूच ठेवायचं आहे.आणि ते सरकारला विकायचं आहे. सरकारला ते घेऊन प्रत्येकाच्या भुजांमध्ये ठासायचे आहे.

           व्हॅक्सीन काय काम करतं ते अनेकांना सागता येत नाही. व्हॅक्सीन रोगप्रतिबंधक आहे का? ती रोगप्रतिकार शक्ती वाढविते का? ....ह्या प्रश्नांची निश्चित उत्तरं सापडत नाही. पहिला, दुसरा डोज घेनारांना कोरोनरोना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन डोज घेनारांना कोरोना झाला तर त्याची लक्षणे सौम्य असतात असा युक्तीवाद सरकार करतं.प्रश्न असा आहे की दोन डोज घेतल्यानंतर तो व्हायला नको. आणि होत असेल तर व्हॅक्सीन द्यायलाच नको.

             बऱ्याच लोकांना व्हॅक्सीनचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. पण पहिल्या आणि दुसऱ्या डोजनंतर व्हॅक्सीन कंपन्यांचं भवितव्य काय? त्याला लगेच उत्तर, बुस्टर डोज!  बरे हे डोज तीन ते सहा महिन्यांत निकामी ठरतात. मग काय कंपन्यांनी व्हॅक्सीन तयार करायची सरकारने ती विकत घ्यायची आणि जनतेला ठासायची. हे एकमेव काम सरकार करणार आहे का?             कोरोनाने काही उद्योगांना छान दिवस आलेत.  व्हॅक्सीनबरोबरच सॅनिटाजर आणि मास्कच्या धंद्यांना बऱ्यापैकी दिवस आलेत.प्रथम मास्क म्हणून रुमाल किंवा कुठलं कापड वापरायची परवानगी होती.त्याला मास्कचा दर्जा होता. आता मास्क म्हणून वरिलपैकी घरगुती प्रकार चालणार नाही. आता साधे मास्कही चालणार नाही. आता एन९५ मास्कच पाहिजे.

             आपल्या मौनामुळे आपल्या खिशातील पैसा लुटला जातो आहे. ही लुट थांबवायची असेल तर बोलते व्हा. विरोध करायला शिका. कारण सरकार जी व्हॅक्सीन देतं त्यासाठी आपल्या विविध करांचा पैसा आहे . हा पैसा अनावश्यक कंपन्यांवर उधळला जातोय. ह्यानंतर लहान मुलांनाही व्हॅक्सीन दीली जाणार . ३/६ महिन्यांनंतर त्यांची उपयोगीता संपणार. मग कंपन्यांनी ती व्हॅक्सीन तयार करायची सरकारने ती विकत घ्यायची आणि जनतेला ठासायची. हे चक्र करार पद्धतीवर अखंड चालू राहील. व्हॅक्सीन बनविणाऱ्या कंपन्या भविष्यात बंद पडणार नाहीत. आणि बंद पाडण्यासाठी त्या निर्माण झाल्या नाहीत. त्या सुरळीत चालण्यासाठी सरकार कंपनी मालकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, हे आजपर्यंत दिसून आले आहे. आज जी व्हॅक्सीन सरकार देतंय ती उद्या औषधालयात ( मेडिकल शॉप ) विकत मिळेल. कंपनी मालकांनी पहिला, दुसरा आणि तिसरा डोज बनवून कंपनी बंद पाडण्यासाठी सुरू केलेली नाही.  म्हणून सरकारने तशी सुरुवात केली आहे. आता  RTPCR  टेस्ट खाजगी पॅथाजीत ३०० रुपयांत तपासण्याची परवानगी दिलेली आहे. भविष्यात रुग्न डाॅक्टरकडे गेले तर डाॅक्टर कोरोना तपासणी करण्यास सांगतील.  मग डाॅक्टर आणि पॅथाजीवाले  छान धंदा करतील. त्यासाठी सरकार खतपाणी घालत आहे.

             ओमायक्रान विषाणू पसरविण्यास सरकार जबाबदार आहे. कारण विदेशातून आलेले प्रवासी त्यांच्या घरापर्यंत कसे पोहचले? सरकारने ह्या प्रवास्यांना तिथेच डांबुन ठेवले असते तर प्रकरण चिघळले नसते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाने कमी आणि त्याच्या धास्तीने किंवा चुकीच्या उपचार पद्धतीने अधिक माणसं मेलीत.  २००/३०० किमि पायी चालुन भुकेने, तहानेने अनेक माणसं मेलीत. त्यासाठी खरेतर सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता.

              लाकडाऊनच्या नावाखाली पोलीसांनी कित्येक निरपराधांना अमानुष मारहाण केली. लाकडाउनमुळे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाले.  कामधंद्यांना कुलुप लागले. नोकरदारांना पगार मिळाले. पण हातावर पोट असणाऱ्यांचे बेहाल झाले.  रस्त्याच्या कडेला चहापान,पोहे विकणारी माणसं बेकार झाली. ज्यांना हे सहन करण्याची ताकत उरली नाही त्यांनी आत्महत्या केलीय.  कित्येक व्यावसायिक आणि लहान मोठ्या धंदेवाईकांनी , मजुरांनी आत्महत्या केली. कौटुंबिक कलह वाढले. नाती तुटली, माणसं दुरावली. हाताला काम नाही म्हणून पैसा नाही. पैसा नाही म्हणून  लोकांची क्रयशक्ती घटली.  उत्पादन साधने संपली. आणि महागाई ने उच्चांक गाठला. अगदी खालच्या माणसांनी जगायचं कसं हा पेच अद्याप सुटला नाही. अर्थशास्त्र बिघडलं  . त्यामुळे मानसशास्त्र संकटात आलं.  एकुण काय तर कोरोना ही एक  कपोलकल्पित समस्या सोडविण्याच्या नादात सरकारने अनेक समस्यांना जन्म दीलाय. तरीही सरकार स्वतःची पाठ थोपटून घेतंय.

                       आज टीबी, कॅन्सर साठी वार्ड उभारण्यात आले आहेत. सरकारने ह्याच पद्धतीचा अवलंब करून कोरोना वार्ड उभारायला हवा‌‌. त्यात तज्ञ डॉक्टरांची टीम ठेवायला हवी. असे रुग्णालय किंवा वार्ड प्रत्येक तालुक्यात निर्माण करायला हवे. कोरोना बाधित रुग्ण आले तरच त्यांचा उपचार करायला हवा. पण सरकार राहुन राहुन कोरोना तपासणी चा सपाटा सुरू करतं . मग तपासण्या थांबवतं. त्यानंतर कोरोना कधी येणार तेही सांगतं. कोरोनाला लपवुन ठेवणं आणि बाहेर काढणं हे सरकारच्या लहरीपणावर अवलंबून आहे.  कोरोना हा जणू सरकारचा बाहुला आहे.  सरकारने फक्त  आलेल्या रुग्नांवर उपचार करावा.  खरे तर टीबी आणि कॅन्सरचे रुग्ण शोधण्यासाठी सरकारने तपासणी मोहीम उघडायला हवी.कारण हे जीवघेणे आजार आहेत. आणि त्याचे मोफत उपचार करायला हवेत. कारण त्याचे महागडे उपचार आहेत.  तसे होतांना दिसत नाही....

                   तुम्ही न्याय हक्कासाठी मोर्चा काढु नका कारण कोरोना आहे. तुम्ही शिक्षणासाठी बोलु नका कारण कोरोना आहे.  तुम्ही नोकरी साठी बोलु नका कारण कोरोना आहे.  तुम्ही बेकारीची तक्रार करु नका कारण कोरोना आहे. तुम्ही संप, उपोषण करू नका कारण कोरोना आहे. कोरोनाच्या पडद्याआड सरकारने मुस्कटदाबी केली आहे.तरीही लोक बोलताना दिसत नाही. निरक्षरांचं सोडा पण पुस्तकी कीडेही निवांत पडले आहेत."  शंभर मुर्ख माणसं एकत्र आणून एक शहाणा किंवा सुज्ञ माणूस निर्माण करता येत नाही म्हणून त्या शंभर मुर्खांवर राज्य करण्याचा अधिकार एका  शहाणा आणि सुज्ञ माणसाला आहे. "  हे एका हुकुमशहाचं वाक्य आहे. कोण शहाणा , कोण मुर्ख ?  हे जनतेनं ठरवावं.


राजू बोरकर
लाखांदूर, जिल्हा: भंडारा
७५०७०२५४६७


हे पण वाचा : - भयंकर षडयंत्राचे संचालन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या