Top Post Ad

प्रकल्पग्रस्तांचा आदारस्तंभ - विजय घोगरे


 सरकारी अधिकारी- कर्मचारी म्हटला की ज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नतीच्या पाय्रया चढत एक दिवस सेवानिवृत्त होणार हे ठरलेलेच असते.त्यात विशेष काही नसतेच. पण काही अधिक्रायांच्या बाबतीत बढती वा कौतुक सोहळ्याचा आनंद हा त्यांच्या पुरता सीमित राहत नसतो.त्यांनी यशाचा शिखर गाठल्याचा आनंद सार्वजनिक होत असतो.त्यांचा आनंदोत्सव हा त्यांचा खात्याच्या सीमा भेदून सर्वदूर पोहचत असतो.कारण त्या अधिक्रायाची प्रगती काही घटकांना, समूहांना हरखुन टाकत असते.अर्थातच हे भाग्य फारच मोजक्या सरकारी अधिकाऱ्याना लाभत असते. विजय घोगरे हे तशा विरळ अधिक्रायांपैकी एक आहेत.जलसंपदा विभागात त्यांची ओळख प्रकल्पग्रस्तांचा दयावान अशीच आहे.मात्र त्यांची ही ओळख-ख्याती जलसंपदा विभागातील झाली.घोगरे ह्यांची ती ख्याती ओळख परिपूर्ण नाही.त्यांचे कार्य आणि सेवाभावी वृत्तीचा लौकिक सामाजिक पातळीवर राज्यभरात पोहचलेला आहे. 

पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.त्यांचे हे कार्य सरकारी सेवेतील मराठा समाजाचे कर्मचारी अधिक्रायांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीपूरते मर्यादित नाही.मराठा आरक्षण, पदोन्नती या प्रश्नांच्या पलीकडे समाजाच्या सर्वंकष अभ्यूदयासाठी विजय घोगरे हे अहोरात्र झटताना दिसतात.त्याची प्रचिती दिवसभर भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या लोकांच्या ओघावरून येते.हे चित्र त्यांची नेमणूक कुठेही असली तरी बदलत नाही.घोगरे हे कार्यालयात असताना कामकाजातील व्यग्रतेमुळे कुणाला भेटू शकत नाहीत असे घडणे असंभव आहे.कारण पुरुषोत्तम खेडेकर यांचा कित्ता गिरवत त्यांनी आपल्या दालनाचे दार सतत उघडे ठेवलेले असते. आपल्याकडे येण्राया सर्व थरांतील लोकांना भेटून त्यांची ग्राहाणी ऐकून घेत आवश्यक ते मार्गदर्शन आणि शक्य ती मदत करण्यावर घोगरे यांचा भर असतो.घोगरे यांनी जलसंपदा खात्यात जळगाव,सातारा,ठाणे आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.प्रत्येक ठिकाणी त्यांनी सेवेतील सचोटी आणि कर्तव्यनिष्ठेतून आपल्या कामाचा अमीट ठसा उमटविला आहे. त्याबद्दल त्यांच्या कौतुकाच्या कहाण्या त्या भागात हमखास कानी पडतात. औरंगाबाद विभागात मुख्य अभियंता पदाचा कार्यभार हाती असतानाच राज्य सरकारने मुंबईच्या मुख्य अभियंता पदाचीही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्या शिरावर टाकली आहे. विजय घोगरे यांच्या अफाट कार्यक्षमतेवरील विश्वासाची ही पोचपावतीच मानली जाते.ते 'इंडियन इंजिनिरिंग इन्स्टिट्यूट'च्या महाराष्ट्र शाखेचेही प्रेसिडेंट आहेत.ती इंजिनिरिंग क्षेत्रातील देशामधील नामांकित संस्था आहे.  

घोगरे यांना प्रकल्पग्रस्तांचा दयावान ही ओळख सातारा जिल्यातील कार्यकाळात मिळाली. धरणासारखे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्णत्वास नेताना विस्थापित होण्राया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाजूला मुळीच पडता कामा नये यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला आहे.मग त्यांची नेमणूक कुठेही असो.अनेक छोटी-मोठी-मध्यम धरणे, उपसा सिंचन योजनांचे बांधकाम, 500 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे कालवे, पुणे पिंपरी- चिंचवड येथील पाणीपुरवठा योजनेचे नियोजन, नीरा देवधर व उरमोडी या मोठ्या धरणांमधील पाण्याचा साठा अश्या ब्रयाच यशस्वी कामाचा दांडगा अनुभव विजय घोगरे यांच्या गाठीशी आहे. त्या जोरावर सध्या ते औरंगाबाद विभागात मुख्य अभियंता म्हणून आठ जिल्हाच्या मराठवाड्याचे लीलया नेतृत्व करत आहे.  

विजय घोगरे हे पश्चिम महाराष्ट्रातले. इंदापूर तालुक्यातील बावडा वकील वस्ती हे त्यांचे मूळ गाव. पण त्यांच्या सरकारी सेवेचा प्रारंभ हा आमच्या जळगाव जिल्हयातुन झाला.त्या समान दुव्यातून आणि बहुजनवादी समविचारातुन आमची मैत्री जुळली व गेल्या दोन दशकाहुन अधिक बहरली. शिवरायांच्या महाराष्ट्राची जडणघडण महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर व्हावी.त्यातून समाजसुधारकांची मोठी परंपरा असलेल्या आपल्या राज्याचा पुरोगामीत्वाचा लौकिक कायम राहावा.वृद्धिंगत व्हावा हाच घोगरे यांचा ध्यास आहे. ठाणे जलसंपदा विभागातून मुख्य अभियंतापदी बढती मिळाल्यानंतर औरंगाबाद विभागाचा कार्यभार त्यांनी अलीकडेच स्वीकारला आहे. त्यांना पुढील कार्यकाळात यशस्वी होण्यासाठी अमाप शुभेच्छा!  

लेखक- भीमराव चिलगावकर 
(  प्रदेशाध्यक्ष-  बहुजन संग्राम )  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com