भारतीय बौद्ध महासभा ... घोळ विश्वस्तांचा कि धर्मादाय आयुक्तांचा...

 


 आमच्या सर्वांचे मुक्तिदाते बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे स्वातंत्र्य, एकता व अखंडता अबाधित राहावी म्हणून स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आणि न्याय या तत्त्वाचा पुरस्कार करून सामाजजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला व या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 में 1955 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेची स्थापना केली. मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध अनुयायांमध्ये निरनिराळे मतभेद असल्याचे लक्षात आलेले आहे.

१]  बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्या सहा लोकांच्या सोबत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेची नोंदणी केली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर ते सहा लोक कुठेही दिसले नाही व त्यांची कुठलीही प्रतिक्रिया आढळलेली नाहीत.

२]  तसेच १९५७ पासून ते 1977 पर्यंत नियमाप्रमाणे कलम 22 चेअंतर्गत कोणीही बदल अर्ज धर्मदाय आयुक्तांकडे सादर केलेला नाही. या उलट 1957 मध्ये ही संस्था चालवण्यासाठी एक ऍडव्हायझरी कौन्सिल बनवण्यात आली. ती नियमाप्रमाण बोर्ड ऑफ ट्रस्टी नव्हती तर संस्थेचा कारभार चालवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था होती असे हाय कोर्टाने सांगितले आहे.

३] ज्या उपासकांनी विधिवत बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे अशा बौद्ध लोकांची ही संस्था आहे 

४] विधिवत् बौद्ध धम्म स्वीकारल्याचं प्रमाणपत्र ज्या लोकांकडे त्यांना संस्थेचे सभासद होता येते

५] भैयासाहेबांच्या निधना नंतर धर्मदाय आयुक्त, वरळी मुंबई यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट 1950 चे अंतर्गत कलम क्रमांक 50 अ चे अन्वये दिनांक 24 जुलाई 1981 मध्ये संस्था चालवण्यासाठी एक स्किम नं. 192/80 तयार केलेली आहे. व या स्किम प्रमाणे संस्थेचा सध्या कारभार चालवण्यात येत आहे.

६] या संस्थेचा कारभार कारभार बोर्ड ऑफ ट्रस्टी चालवतात व या बोर्ड ऑफ ट्स्टी मधून एक वर्षासाठी चेअरमनची निवड करण्यात येते.

७] वरील योजनेनुसार या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आवश्यक ती पात्रता असलेल्या विस्वताना घेतल्या जाते, या गोष्टीचा पुनरुच्चार मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दि. 9/5/2021 रोजी केलेला आहे. योग्यता व पात्र असल्याशिवाय व हयात असलेल्या सर्व विस्वस्तांची मिटिंगमध्ये उपस्थिति असल्याशिवाय नेमणूक करू नये असा या खंडपीठाचा आदेश आहे. या आदेशाचे उल्लंघन बरेच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते.

८] तसेच पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी ज्या वास्तू मध्ये आहेत या वास्तूला चैत्यभूमी म्हणतात ही चैत्यभूमीची जागा मुंबई महानगरपालिकेने 99 वर्षाच्या लिस करारावर दिनांक 23/3/1960 रोजी संस्थेला दिलेली आहे शेडूल वन वर असलेल्या नोंदीप्रमाणे चैत्यभूमी हि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची प्रॉपर्टी आहे. ती विस्वस्तांच्याच नियंत्रनात असावी. पण आज तेथे विस्वस्थानाच येऊ दिल्या जात नाही ही शोकांतिका आहे 

९] नंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांचे 17 सप्टेंबर 1977 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 6 ऑक्टोबर 1977 ला आदरणीय मीराताई आंबेडकर यांनी चेंज रिपोर्ट माननीय धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात सादर केला. व हा चेंज रिपोर्ट दिनांक 14 ऑक्टोबर 1977 रोजी माननीय धर्मदाय आयुक्त यांनी अमान्य केला फेटाळला

१०] आणि तेव्हापासून या या संस्थेला कोर्टा चा सामना करावा लागला. हा वाद आहे तो दोन आंबेडकरांचा आहे. अशोक आंबेडकर विरुध्द मीराताई आंबेडकर. तो सामना जवळजवळ 1977 ते 2013 पर्यंत चालला आणि अजूनही 2021 मध्ये ही चालू आहे. तब्बल 44 वर्षाचा हा विवाद आमच्या बौद्ध समाजामध्ये झाला आहे. परिणामता धम्मकार्य पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. याचं कारण म्हणजे या संस्थेचं कामकाज करत असताना संबंधित लोकांनी योग्य ती कायदेशीर पद्धत व बंधुभाव दाखवला नाही. कायदेशीर काम केलं असतं तर हा वाद झाला नसता. काही लोक चर्चा न करता कोर्टात गेले. समाजाने त्याचा सामना केला परंतु त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. धर्मदाय आयुक्तांनी ज्या सात विस्वस्तांची नियुक्ती 24 जुलाई 1981 रोजी केली होती, त्या सर्व विस्वस्तांचे निधन झालेले आहे अजूनही सात बदल अर्ज मा. धर्मदाय आयुक्त कडे निर्णयासाठी पेंडींग पडून आहेत.

११] 2001 चा बदल अर्ज अजूनही वीस वर्ष होऊन सुद्धा धर्मदाय आयुक्तांकडे प्रलंबित असून अशा प्रकारे जर धर्मदाय त्यांना हे अर्ज निकाली काढायचे असतील तर शंभर वर्षे पेक्षा जास्त वेळ लागेल. आम्ही कोणीही जिवंत राहणार नाही. म्हणून आम्ही कायदेशीर व सनदशीर वाटेनं जाऊन इलाज करावा लागेल. पण अजूनही आपण योग्य त्या वाटेने जात नाही . एक खालील घटनांवरून सिद्ध होते.

१२] दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी नागपुर लोकमतमध्ये बातमी आलेली आहे ही बातमी आदरणीय चंद्रबोधी पाटील व आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांनी दिलेली आहे. भारतीय बौद्ध महासभा एक झाली हे त्यांचं म्हणणं आहे परंतु त्या म्हणण्याला व्यापक अर्थ नाही. एक झाले असं म्हणता येणार नाही. एक झाले याचा अर्थ इथे निराळे गट आहेत. आणि हे गट कोणते आहेत तर हे गट जवळजवळ सात ते आठ गट आहेत. ज्या वेळेला ह्या आठ गटांचा एकत्रीकरण होईल तेव्हा बौद्ध महासभेचे ऐक्य झालं असं म्हणावं लागेल अन्यथा नाही. केवल दोघांच्या भेटीला ऐक्य म्हणता येणार नाही आणि हे ऐक्य पाहिजे असेल तर केवळ दोन माणसांचा काही उपयोगाचं नाही... बौद्ध महासभेची सध्याची जी परिस्थिती आहे. ह्या वादाला तीन प्रकारचे वादी प्रतिवादी आहेत.

  • 1)- काही बाहेरची लोक आहे. ज्यांचा नावाची धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये या नोंद नाही ते बाहेरचे आहेत. त्यांच्या धडपडीचा काही उपयोग नाही. ते लाभार्थी [beneficiary ] नाहीत
  • 2). काही लोक असे आहेत ज्यांनी आपल्या नावाचे चेंज रिपोर्ट पदाचा दावा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे दिलेले आहेत. ते प्रलंबित आहेत. मात्र ते संस्थेचे लाभार्थी आहेत आणि
  • (3)- अजून एक पार्टी आहे ज्यांना धर्मदाय आयुक्तांनी संस्थेला चेअरमन नसल्यामुळे संस्थेचा कारभार सांभाळण्याची इंटरेस्टेड पर्सन व पार्टी म्हणून दिनांक 16/7 /2018 रोजी परवानगी दिलेली आहे अशा प्रकारची ऑर्डर पास केली आहे. तेव्हा या संस्थेच्या कारभारामध्ये दखल देत असताना खालील गोष्टींची आपल्याला दखल घ्यावी लागेल. व प्रक्रिया समजून घ्या लागेल.

१३] चेंज रिपोर्ट केव्हा देता येतो. ? ज्या लोकांची नावे कलम 17 चे अंतर्गत धर्मदाय आयुक्ता कडे जे रजिस्टर आहे जो शेडूल वन आहे. त्यामध्ये जर काही बदल असेल तर बदल अर्ज सादर करता येतो : व तो अधिकार चेअरमनला हे आम्ही समजून घेणे गरजेचे आहे. हे न समजतात काही लोकांनी बदल अर्ज सादर केलेली आहेत. काही लोक या संस्थेचे स्वयघोशित चेअरमन म्हणून काम करत आहेत.

चेअरमन निवडण्याची प्रक्रिया काय आहे ? 

  • 1)- नियमाप्रमाणे बोर्ड ऑफ ट्रस्टी ला धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता मिळाली पाहिजे. 
  • 2) यांची नावे शेडुल वन वर गेली पाहिजेत. 
  • 3)- या लोकांमधून एक वर्षासाठी एक चेअरमन निवडण्यात येतो 

ही प्रक्रिया स्कीम मधल्या कलम आठ पासून तर कलम 12 पर्यत सांगितलेली आहे . या प्रक्रियेतून जो कोणी गेलेला नाही तो या संस्थेचे चेअरमन अस होऊ शकत नाही. पण इथे असं काही झालं नाही मग हे लोक चेअरमन कसे ? हे या लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

दुसरे असे आहे की ज्या लोकांचा नाव धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात नाही ज्यांना धर्मदाय आयुक्तांनी कुठल्याही प्रकारचे अधिकार दिलेले नाहीत, ते स्वतःला चेअरमन म्हणत आहेत. व हे लोकच एकमेकांना संस्थेतून बडतर्फी केल्याच्या नोटीस देत आहेत .ही फार दुःखद गोष्ट आहे. एकदा बदल अर्ज सादर केल्यानंतर कोणालाही विस्वस्ताना काढता येत नाही तो फक्त धर्मादाय आयुक्तांचा अधिकार आहे. चंद्रबोधी पाटिल किंवा विश्वनाथ मोखले यांना धर्मादाय आयुक्त शिवाय कोणीही काढू शकत नाही. त्यातही त्यांच्या noc ची आवश्कता आहे. अशा गोष्टी होता कामा नये

14] अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय बौद्ध महासभा हे नाव वापरण्यास आदरणीय मीराताई आंबेडकर यांना धर्मदाय आयुक्तांनी 2 मार्च 1987 रोजी मनाई केली आहे. तसा मनाई हुकुम जाहीर केला आहे. परंतु आजही ते लोक भारतीय बौद्ध महासभा चे नाव वापरत आहेत याची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.

१५] या संस्थेच्या स्कीम कलाव्ज 9 प्रमाणे ट्रस्टी ची पात्रता म्हणजे तो बौद्ध असला पाहिजे. ज्याला फीट आणि प्रॉपर पर्सन धर्मदाय आयुक्तांनी म्हटलेले आहे .तो व्यक्ती म्हणजे कोण तर तो धर्माचा प्रचार करणारा, प्रबोधन करणारा, बौद्धाचार्य असला पाहिजे. त्याने विधिवत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. धम्मात प्रबोधन त्याला करता आलं पाहिजे. या पात्रतेची जे लोक आहेत तेच लोक या संस्थेचे विश्वस्त होण्यास पात्र आहेत एक गोष्ट आमच्या लोकांना समजून घेणे गरजेचे आहे.

१६] राष्ट्रीय अध्यक्ष हा प्रकार काय आहे ?
मुलता राष्ट्रीय हा शब्द स्कीम मधे मुलीच नाही हे आम्ही समजून घेणे गरजेचे आहे. कारण धर्मदाय आयुक्तांनी जी बोर्ड ट्स्टी नियुक्त केलेली असते. त्या बोर्डाला त्यांच्या अंतर्गत काम करणारी एक सब कमिती सेक्शन 56 ज च्या अंतर्गत स्थापन करण्याचा अधिकार आहे. व अश्या कमिटीची नोंदणी किंवा माहिती धर्मदाय आयुक्तांकडे असायला पाहिजे. या कमिटीच्या लोकांना मताचा अधिकार नाही.

१७] डॉक्टर ज्योतीकर यांचे सुप्रीम कोर्ट निकाला मध्ये कोठेही नाव नाही. ही जी केस आहे केस आदरणीय. मीराताई आंबेडकर वर्सेस अशोक मुकुंदराव आंबेडकर अशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे तो अशोक आंबेडकर यांच्या बाजूने, ज्योतीकर या केस मध्ये respondance म्हणून तेरा नंबर वर आहेत व मीराताईच्या पक्षाचे आहेत मीराताई यांच्या विरोधात निर्णय गेला म्हणजे ज्योतीकरांच्या विरोधात निर्णय गेला असं म्हणता येईल. डॉक्टर ज्योतीकर है या संस्थेचे चेअरमन केव्हाही नव्हते. या संस्थेचे चेअरमन होते अशोक मुकुंदराव आंबेडकर त्यांची नियुक्ती 22 मार्च 1982 मध्ये झाली होती व तेव्हापासून तर  2017 पर्यंत या संस्थेचे चेअरमन होते.त्यांच्या निधनानंतर सध्या संस्थेला कोणीही चेअरमन नाही. आमच्या लोकांनी समजून घेणे गरजेचे आहे. 

चेअरमनलाच मीटिंग बोलावन्याचे करण्याचे अधिकार आहे. चेअरमन नसेल तर संस्था चालू शकत नाही म्हणून आम्ही धर्मदाय आयुक्तांकडे कर्ज करून विनंती केली होती की ही संस्था चालवण्याची काही अधिकार आम्हाला या त्याप्रमाण 16 जुलाई 2018 रोजी धर्मदाय आयुक्तांनी सेक्शन (10) व व सेक्शन 73 अ चे अंतर्गत मला इंटरेस्टेड पर्सन पार्टी म्हणून घोषित केलेले आहे. माझ्याकडे ची ऑर्डर आहे तशी ऑर्डर आजच्या तारखेत कोणाच्या कडे जर असेल तर त्यांनी कृपया निदर्शनास आणून द्यावी. त्या अधिकारांमध्ये आम्ही आज संस्थेचं काम करत आहोत.

१८] संस्थेचा ऑडिट रिपोर्ट 2020 पर्यंत आम्ही सादर केलेला आहे. धर्माचा प्रचार आणि संस्कार शिबिर सारखे सुरू आहेत. आजही आमची धम्म यात्रा बुद्धगया या ठिकाणी आहे. तेव्हा याद्वारे मी संबंधितांना एक विनंती करू इच्छितो जर तुम्हाला ऐक्य पाहिजे असेल तर दोन माणस एकत्रीत येऊन काही होणार नाही. आठ लोकांचा विचार करावा लागेल आणि या लोकांनी आपले बदल अर्ज धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात दिलेले आहेत त्यांनी ते बदल अर्ज जर वापस घेतले तर या संस्थेत ऐक्य शक्य होणार आहे. अन्यथा नाही म्हणून या आपल्या माध्यमातून मी आपणास संबंधित सर्वांना विनंती करू इच्छितो की. ज्या प्रकारचे मी काम करत आहे त्या माझ्या कामाला आपण सहकार्य करावं. आमच्यामध्ये सामील व्हावे .आज मी 1987 पासून मी या संस्थेमध्ये निरनिराळ्या पदावर काम करत आहोत. अशी पावती मला धर्मदाय आयुक्तांनी दिलेली आहे. 

तेव्हा माझी विनंती आहे की संबंधितांनी, मी ज्या पद्धतीने जात आहे त्या पद्धतीला सहकार्य करावं . माझ्या सोबत यावं आम्ही आमची कंडीशन एकच राहील कि आपल्याला या पदावर या संस्थेच्या पदावर येण्याची पात्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. योग्य तो माणूस असेल तरच धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो 

धन्यवाद
जय भिम

विश्वनाथ मोखले-  ७९०००३१४१४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या