दलित विकासाचे ८७५ कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याला परत करा- प्रा.डोंगरगावकर

 बुद्धाचा धर्म वैश्विक आणि सर्वांसाठी खुला 

मुंबई--   अनुसूचित जाति आणि जमाती यांचे पूर्वज बुद्ध धर्मीय होते. देशभरातील लेण्यांची निर्मिती त्यांनीच केली आहे .  बुद्धाचा धर्म हा वैश्विक आणि सर्वांसाठी खुला असून संविधातील मूल्याशी सुसंगत आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी मांडले . ते बुद्ध धम्म आणि शासक या विषयावर बोरिवली   कान्हेरी लेणी  येथे आयोजित धम्म परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .    
   
    या परिषदेचे आयोजन  बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि मुंबई भिक्खू संघ यांनी संयुक्तरित्या केले होते. कान्हेरी लेणीत गेली २५ वर्षे धम्म परिषदेचे  आयोजन केले जाते. यंदाच्या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक भदंत शांतिरत्न हे होते. तर निमंत्रक भदंत लामाजी, सुभाष वाव्हलकर होते. यावेळी  एकूण ११ ठराव शिक्षण तज्ञ प्रा. डॉ. जी.के. डोंगरगावकर यांनी मांडले . त्याला भदंत लामा यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी पद्धतीने उपस्थित हजारो बौद्ध बांधवांनी एकमुखाने समर्थन दिल्यानंतर सर्व ठराव संमत झाल्याची घोषणा करण्यात आली.

            राज्यातील बौद्ध लेणींचे जतन,रक्षण आणि संवर्धनाबाबत पुरातत्व विभाग हा कमालीचा उदासीन आणि निष्क्रिय आहे.  असा आरोप करतानाच बोरीवली येथील कान्हेरी लेणीचा ताबा भिक्खू संघाकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी  धम्म परिषदेत एका ठरावाद्वारे करण्यात आली तसेच   केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बौद्ध, हिंदू, जैन पर्यटकांच्या सोयीसाठी नवा सर्किट महामार्ग उभारण्याची मागणी ठरावात  करण्यात आली आहे. महाड- रायगड, कान्हेरी लेणी, ग्लोबल विपश्यना पॅगोडा, चैत्यभूमी, नाशिक, अजिंठा या स्थळांना कवेत घेणारा हा सर्किट महामार्ग असला पाहिजे असे  ठरावात म्हटले आहे. 

 तर    नागपूरच्या रुग्णालयासाठी वळवलेले दलित विकासाचे ८७५ कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याला परत करावेत  या मागणी सहित आंबेडकरी संग्रामने केलेल्या २७ मागण्यांना या धम्म परीषदेत पाठिंबा देण्यात आला. तसा ठरावच  ११ ठरावांमध्ये समाविष्ट करून मंजूर करण्यात आला . 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. बौध्दांनी स्वतःला दलित म्हणवून घेणे बंद करावे.बौध्द म्हणून स्वाभिमानी व सदाचारी जीवन जगण्यासाठी सज्ज व्हावे.एकमेकांना समांतर आणण्यासाठी दानपारमिताचे पालन करावे.

    उत्तर द्याहटवा