मुंबई - नवाब मलिक यांनी मुस्लीम वक्फ बोर्डावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर पत्रकार परिषद घेतली. वक्फ बोर्ड आणि हिंदू मंदिरांच्या एकूण 213 एकर जमिनीवर आतापर्यंत घोटाळा करण्यात आला आहे. भाजपच्या माध्यमातून विविध ठिकाणी जमिनी लाटण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. एकूण 10 देवस्थानाच्या जमिनींमध्ये 3 मुस्लीम समाजाची देवस्थानं आहेत. तर 7 हिंदूंची आहेत. त्याच्या जागा लाटण्याचा घाट भाजपच्या काही नेत्यांनी घातल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून राज्यात एकूण 11 तक्रारी दाखल कऱण्यात आल्याची माहिती मलिकांनी दिली. काही ठिकाणी धार्मिक स्थळांच्या जमिनी स्थानिक अधिकाऱ्यांनी बळकावल्या आहेत. तर, हिंदू देवस्थानाची एकूण 300 एकर जमीन खालसा करण्याचा डाव भाजपचा असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
आष्टी मध्ये 3 दर्गा आणि मज्जीद जागेवर बेकायदेशीर नोंद करत विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आष्टी मधील 10 देवस्थान घोटाळा समोर आणला आहे. 2017 ला डेप्युटी कलेक्टर एन आर शेळके असतांना हा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात मंदिर-मस्जिद जमीन घोटाळ्याचे मोठे रॅकेट पुढे येत आहे. दोन FIR दाखल करण्यात आल्यावर SIT ची नेमणूक करण्यात आली होती. SIT ने वक्फ च्या जमिनीच्या प्रकरणाची ही चौकशी करावी अशी मागणी आम्ही केली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचे ईडीकडे झालेल्या तक्रारीत नाव आहे. आष्टी येथील एका माजी आमदाराचे नावही ईडीकडे केलेल्या तक्रारीत आहे. रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी जमीन घोटाळा केला आहे. वक्फ बोर्डाच्या बाबतीत तक्रारी दाखल होत आहेत त्यांची चौकशी व्हावी गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे.
0 टिप्पण्या