Top Post Ad

यामुळे रिअल इस्टेट डेव्हलपर्स नवीन प्रकल्प लाँच करू शकतील

रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.  अदृष्य शत्रू असलेल्या कोव्हिडच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपण आता चांगले तयार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत जीडीपी हा 13.7 टक्क्यांनी वाढला आहे. महागाई दरदेखील चार टक्क्यांच्या आसपास राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. मागील 2020-21 मधील पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता. आता या धक्क्यातून आपली अर्थव्यवस्था चांगलीच सावरली असल्याचे त्यांनी नमूद केले. आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवल्याने सध्या वर्षाला ६.५० टक्क्यांपर्यंत असलेले गृह कर्जाचे व्याज दर कायम राहण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त कर्जे मिळवण्यासाठी ग्राहकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे

    याबाबत ठाण्यातील क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता म्हणतात,  ठाण्यातील घर शोधणार्‍यांसाठी, गेल्या काही महिन्यांत ऐतिहासिक कमी गृहकर्ज व्याजदरावर वाढलेली गृहखरेदी आणि अर्थव्यवस्थेतही सकारात्मक भावना दिसून आली आहे. कमी व्याजदरांना समर्थन देणाऱ्या RBI च्या आर्थिक धोरणामुळे हे शक्य झाले.  भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने, ओमिक्रॉन प्रकार लक्षात घेऊन तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा त्याचा परिणाम आणि भारतातील चालू आर्थिक सुधारणा 9व्यांदा रेपो आणि रिव्हर्स रेपोच्या संदर्भात 'स्थिती' कायम ठेवली आहे.  आरबीआयनेही आपली ‘अनुकूल’ भूमिका सुरू ठेवली आहे,” यामुळे रिअल इस्टेट डेव्हलपर्स नवीन प्रकल्प लाँच करू शकतील असे वातावरण तयार केले पाहिजे आणि घर खरेदीदारांनी गेल्या काही महिन्यांत दिसून आलेला ट्रेंड चालू ठेवण्याचे आवाहन मेहता यांनी प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com