Top Post Ad

कान्हेरी बौद्धधम्म परिषदेचे आयोजन

भिक्खू संघ, मुंबई  आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यामाने कान्हेरी बुद्ध लेणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली (पूर्व), मुंबई  येथे  रविवार 19 डिसेंबर रोजी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.   डॉ. भदन्त सत्यपाल महाथेरो (औरंगाबाद) डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा) याच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणाऱ्या धम्म परिषदेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे प्रमुख संयोजक भदन्त शान्तिरत्न यांनी केले आहे. 

 या परिषेदकरिता भदन्त शांतिरत्न, अध्यक्ष - भिक्खू संघ मुंबई तथा राज्य अध्यक्ष (बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क - भिक्खू संघ)  भदन्त लामाजी, महासचिव - भिक्खू संघ, मुंबई , भदन्त बोधीशील थेरो, उपाध्यक्ष - भिक्खू संघ, मुंबई भदन्त किर्तिपियो नागसेन, भदन्त धम्म ज्योती औरंगाबाद , भदन्त संबोधी, भदन्त आर आनंद - कोल्हापुर, भदन्त गौतम रत्न - कल्याण , भदन्त सुगत - नाशिक , भदन्त रत्नदिप - धुळे, भदन्त प्रशिलरत्न गौतम, भदन्त प्रज्ञानंद, भदन्त शिलबोधी, भदन्त संघप्रिय, भदन्त ज्योतिरत्न थेरो, भदन्त महामोगल्यायण - उल्हासनगर, भदन्त गुरूधामो, भदन्त राहुल रत्न -अंबरनाथ, भदन्त राहुलबोधी - बदलापूर, भदन्त रिनचेंन, भिक्खूनी संघमित्रा- नालासोपारा, भदन्त शिलकिर्ति, भदन्त पूर्ण - नवी मुंबई आदी भिक्खूसंघ उपस्थित राहणार आहे. 

तब्बल 40 वर्षे उलटूनही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण  साहित्य सरकारने अजूनही प्रकाशित का केले नाही? आरएसएसने “भारतीय बौध्द संघह्णसारख्या ब्राम्हण प्रायोजित संघटनेची  निर्मिती करून बौध्द धम्माच्या चळवळीस रोकण्याचे व प्रतिक्रांतिला मजबूत  करण्याचे एक व्यापक षडंयंत्र आहे. बौद्ध विरासतला शासक वर्गाकडून धोका आहे अशा विविध विषयांवर उपस्थित मान्यवर यावेळी आपले विचार मांडणार आहेत. 

प्रा. डॉ. विलास खरात (राष्ट्रीय प्रभारी, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, नवी दिल्ली ) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या धम्मपरिषदेचे स्वागताध्यक्ष  दिलीप वाहुळे असतील तर धम्म परिषदेचे उद्घाटन रेखाताई किशोर कांबळे (धम्म उपासिका संघ, खारघर, नवी मुंबई) करणार आहेत. सुमनताई कदम (बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राज्य संयोजिका महिला विंग) मान.कल्पनाताई मुन (एम.ए. पाली अभ्यासक) मान.लक्ष्मणराव भगत (सरचिटणीस - बौध्दजन पंचायत समिती ) मान.डॉ. जी.के. डोंगरगावकर (ज्येष्ठ विचारवंत , प्राचार्य- सत्याग्रह महाविद्यालय, नवी मुंबई ) आदी मान्यवर या परिषदेत आपले विचार मांडणार असल्याची माहिती सुभाष वावळकर 8652765596, वैभव पवार - 9869474620 यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com