Top Post Ad

मदरशातूनही संविधानाचा गौरव


 देवनार डंपिंग ग्राउंडवर वसलेली शिवाजीनगर वस्तीत मौलाना मोहमत हूसेन उर्दूतून मुलांना शिकवत होते. आम्ही भारताचे लोक... २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान स्वीकारले. आज हे संविधान आपल्या देशाचा रूह आहे.. आत्मा आहे. संविधान प्रचारक म्हणून काम करणारे मौलानाजी त्यांना झालेल्या विरोधाबद्दल सांगत होते. “लोग मजाक उडाते थे.’ आज संविधान जागर करणाऱ्या मौलवींची टीमच हे मौलानाजी तयार करत आहेत. संविधान संवर्धन समितीतर्फे देण्यात येणाऱ्या समता फेलोशिपचे ते फेलो आहेत. त्यांच्यामागोमाग मदरशातील चिमुकली मुले  स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता याच्या व्याख्या उर्दूतून पाठ करत होते.

शिवाजीनगरपासून काही अंतरावर भारतनगर येथील पंचशील बुद्धविहारात संविधानाच्या उद्देशिकेचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सविता पंडित समजावून सांगत होत्या. संविधान हा आपला सर्व भारतीयांचा ग्रंथ आहे. या संविधानामुळे आपण बोलू शकतो, शिकू शकतो, काम करू शकतो, सन्मानाने व समानतेने जगू शकतो. त्यामुळे आपण संविधान समजून घेतले पाहिजे. त्यांच्या संविधान शाखेत वस्तीतल्या बच्चे कंपनीपासून तरुण, महिला साऱ्या येतात. सर्व धर्मांचे लोक जमतात. नागरिक म्हणून आपले घटनात्मक अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून घेत होते. “संविधान साक्षरता पुरेशी नाही तर त्यातून लोकांचे सामूहिक नेतृत्व तयार होते.
या मूल्यांच्या आधारे लोकानी त्यांचे सामजिक-राजकीय प्रश्न तडीस नेणे व सजग नागरिक म्हणून जगणे अभिप्रेत आहे’. वाराणसीहून संविधान प्रशिक्षण कार्यशाळेतून आलेले सुरेश सावंत सांगत होते. बारा वर्षापूर्वी त्यांनी काही मित्रांसोबत सुरू केलेला संविधान जागराचा वृक्ष आज चेंबूर, गोवंडी, मालाडच्या वस्त्यांमध्ये फळू लागला आहे.

संविधान शिकता शिकता त्यातील समतेच्या मूल्यासाठी मुलींची छेडछाड थांबत आहे, वस्तीत सामजिक सलोखा व संवाद राखत धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जगत आहेत. या जागरातून तयार झालेले ३ हजार संविधान प्रचारक राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. कुणी संविधान कफेच्या माध्यमातून, कुणी कलापथकातून, कुणी सोशल मीडियावरून तर कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर होणाऱ्या संविधान यात्रेच्या तयारीत गुंतले होते... त्यात घरेलू कामगार होत्या, तरुण होते, नोकरदार होते, दुकानदार होते, शिक्षक होते, भिक्कू होते आणि मौलवीही होते. - मुमताज शेख, संविधान प्रचारक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com