घरी राहूनच बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करा- सरकारचे आवाहन


 मुंबई - ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता सर्व अनुयायांनी घरी राहूनच बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याच आवाहन सरकारने केले आहे. सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वात ते नमूद करण्यात आले आहे कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे. ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक असल्याचे सरकारने नमूद केले आहे. यामध्ये महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ/पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्जने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत.असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे. महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दुःखाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्‍यक आहे. तसेच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्‍ती परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच औष्णिक पटेक्षण (1081118। 5088179) च्या तपासणीअंती ज्यांचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच सदर कार्यक्रमास उपस्थित रहाण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोडल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे/तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक/ जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्‍यक ते सनियंत्रण व उपाययोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत. शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरुन आणखी काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असे निर्देश शासनाने दिले आहेत.

येत्या ६ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथील दादर परिसरातील चैत्यभूमीवर पार पडणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीत व्हीसीद्वारे उपस्थित राहून महापरिनिर्वाण दिनाचे नियोजन आणि तयारी याबाबत उपस्थित मान्यवरांसोबत साधक बाधक चर्चेत सहभाग घेत आढावा घेतला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, गृह विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर तसेच आंबेडकरी चळवळीतील प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या