Top Post Ad

ठाणे महानगर पालिकेचा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा दिखावा

 

 ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत दोन महिन्यापूर्वी प्रभाग समितीनिहाय   धडक कारवाई सुरु करण्यात आली. या कारवाईत प्रत्येक प्रभाग समितीमधील अनेक अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. मात्र महानगर पालिकेची ही कारवाई केवळ दिखावा असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सुमारे तीन वेळा कारवाई होऊन देखील आज सदर बांधकाम नव्याने पुन्हा उभे राहिल्याने परिसरातील नागरीक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिमे अंतर्गत कळवा प्रभाग समितीमधील अनेक अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.  सप्टेंबर महिन्यात झालेल्या या कारवाईत कळवा प्रभाग समितीमधील जामा मशिद, कळवा नाका येथील तळ अधिक ४ मजली अनधिकृत इमारतीवर  निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त फारुख शेख, प्रणाली घोंगे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली. 

सदर कारवाई सुमारे दोन ते तीन दिवस सुरु होती. यासाठी लाखो रुपये खर्च झाला. हा पैसा सर्वसामान्य नागरिकांनी दिेलेल्या करामधून खर्च होत आहे. मात्र केवळ दोन महिन्याच्या कालावधीनंतर सदर बांधकाम पुन्हा नव्याने उभे राहिले आहे. अशा तकलादु कारवाईमधून महापालिका काय दाखवते असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी कर भरला नाही तर दंडात्मक कारवाई, व्याज वसुली किंवा मालमत्ता जप्तीची कारवाई तात्काळ करण्यात येते. मात्र नागरिक भरत असलेल्या कर रुपी पैशाचा अशा तऱ्हेने महानगर पालिका गैरवापर करीत असल्याचेही काही नागरिकांनी आपले मत व्यक्त केले.

 कोरोना महामारीत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत अनधिकृत  बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले. सहा-सहा महिन्यात आठ-आठ मजली अनधिकृत टॉवर उभे रहात होते. कळवा प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून प्रणाली घोंगे यांनी स्विकारल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात घडक कारवाई करण्यास सुरूवात केली. आधी वर्तकनगर  प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली 'घोंगे यांना कळवा प्रभाग समितीचा कार्यभार स्विकारल्यानंतर अनेक बांधकामांवर कारवाई केली. त्यांच्या या कारवाईने ठाण्यातील राजकीय वरदहस्त असलेल्या बांधकामधारकांचे धाबे दणाणले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com