कामगार,कर्मचारी अधिकारी सगळेच सरकारी नोकरी करून सेवानिवृत्त होतात.त्याचा सत्कार कार्यालयात आणि नातेवाईका यापलीकडे होत नाही.परंतु सागर तायडे यांनी जग प्रसिद्ध उद्योग क्षेत्राचे जनक जमशेदजी टाटा यांच्या ग्रुप मधील टाटा पॉवर कंपनीत अनेक लक्षवेधी प्रकल्पात नोकरी करीत असतांना कामगार क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यासह देशभर फिरून कामगारांना न्यायहक्क व अधिकार मिळवून दिला आहे.अनेक युनियन सोबत काम करीत असताना त्यांनी धार्मिक क्षेत्रात देखील मोठे लक्षवेधी कार्य केले आहे.
ऑल इंडिया रेल्वे शुशाहीन युनियनचे ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत.मी राष्ट्रीय सचिव असल्याने सागर तायडे.आनंद म्हस्के राम इकबाल आम्ही "संत रविदास की विचार धरासे चलो बुद्ध की ओर" "संत रविदास की वाणी बुद्ध की दिवाणी" हे स्लोगन घेऊन बिहार च्या बारा जिल्ह्यात धम्म प्रचार व प्रसार केला. त्यामुळेच आम्ही बुद्धगया कालचक्र मैदान येथे हजारो रविदासी लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.त्याच प्रमाणे पाटन, नालंदा, सारनाथ, रोहतास,चेन्नरी,भभूवा,भागलपूर,येथे कित्येक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. रविदासी लोकांना बौद्ध धम्मात येण्यासाठी प्रथम त्यांची युनियन बांधणी केली,
कारण देशातील कोणत्याही रेल्वे स्टेशन वर शु शाहीन करणारा कामगार हा बिहारचा रविदासी चर्मकार समाजाचा आहे,त्याच्यावर रेल्वे स्थानकात स्टेशन मास्टर, रेल्वे पोलीस, जी आर पी,मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार करीत होते.त्या अन्यायाला वाचा फोडून न्याय दिला.आणि त्यांना जागृत करण्यासाठी आम्ही उतर प्रदेश ,बिहार,झारखंड ,येथे जावून लोकजागृतीचे कार्य केले आहे. नोकरी सांभाळून प्रपंच करून भारतभर भ्रमण करू कामगार युनियन आणि धार्मिक कार्य करणे मोठी तारेवरची कसरत होती.परंतु आंबेडकरी चळवळीचे आपण काहीतरी देणं लागतो या जाणिवेतून आम्ही कार्य करीत राहिलो.असे कार्य करीत असताना कामगार नेते सागर तायडे सेवानिवृत्त होणे.आणि त्यांना शुभेच्छा देणे. यावर मी हेच म्हणेन की,
गुलाब की मै क्या तारीफ करु खुशबू ही उसकी पहाचान है !
कामगार नेते सागर तायडे याना सेवानिवृत्ती शुभेच्छा देताना म्हणेन आंबेडकरी विचाराचा भीमसैनिक केव्हाच सेवा निवृत्त होत नसतो. आता तर आपण सरकारी नोकरीच्या बंधनातून मुक्त झाला आहात.शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधन करून परिवर्तन चळवळीचे कार्य अश्वगतीने करणार यात शंकाच नाही, ते यशस्वी रित्या घडो हीच शुभ कामना त्यासाठी सागर तायडे यांना उदंड आयुष्य लाभो.ही मनो कामना.
आपला धम्म संघ बंधू
आनंद म्हस्के 86523 25032,
बौद्ध साहित्यिक, चेंबूर मुंबई,
0 टिप्पण्या