Top Post Ad

झुनझुनवाला शेअरमार्केटचे बीगबुल... हे आहेत त्यांचे खास शेअर्स

 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे अनेकजण राकेश झुनझुनवाला ज्या कंपनीचे शेअरमध्ये गुंतवणूक करत असतात, त्यामध्ये गुंतवणूक करतात. या 5 कंपनींच्या शेअर्सनी  गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.  घसरत्या बाजारात स्टॉक खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. ज्यांनी गुंतवणूकदारांना फक्त एका वर्षात २५१ टक्‍के पर्यंत परतावा दिला आहे. यामध्ये स्मॉलकॅप आणि लार्जकॅप या दोन्ही श्रेणीतील शेअर्सचा समावेश आहे


१) मॅन इन्फ्राकंस्ट्रक्शन- या अभियांत्रिकी कंपनीचे सुमारे ३० लाख शेअर्स राकेश झुनझुनवाला यांनी खरेदी केले आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या सुमारे १,२ टक्के आहे. जर  या स्टॉकच्या चार्टवर नजर  टाकली तर त्यात फक्त एका वर्षात २१५ टक्के परतावा दिसेल. हा शेअर ३४.२५ रुपयांवरून १०८  रुपयांच्या वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे बंपर रिटर्न स्टॉक जोडू शकतात.

२) अनंत राज- हा झुनझुनवालाच्या मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. या स्मॉलकॅप शेअरची किंमत २६.८५ वरून  ७०.७० रुपये झाली आहे. म्हणजेच या शेअरमध्ये दुप्पटपेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १६६५ टक्के परतावा दिला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचा सुमारे १ कोटी स्टॉक आहे. त्यांच्याकडे या कंपनीतील सुमारे ३.३९ टक्‍के भागीदारी आहे. 

३) टाटा मोटर्स - राकेश झुनझुनवाला यांनी टाटाचे अनेक स्टॉक खरेदी केले आहेत. टाटा समूहाचे शेअर्स झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आहेत. झुनझुनवाला यांची या कंपनीमध्ये सुमारे १.१४ टक्के हिस्सेदारी आहे म्हणजेच त्याच्याकडे सुमारे ३ कोटी ७७ लाखांपेक्षा जास्त शेअर्स आहेत. जर फक्त या वर्षाच्या चार्ट पॅटर्नवर नजर टाकली तर २०२१ मध्ये या शेअरची किंमत २९० रुपये होती,  जी आता वाढून ४७७ रुपये झाली आहे. टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना सुमारे १५५ टक्के परतावा दिला आहे.

४) टायटन कंपनी- टायटनने अलीकडेच राकेश झुनझुनवालाला मोठा नफा दिला आहे. रेखा आणि राकेश या दोघांनी या कंपनीत भाग खरेदी केला आहे. रेखाकडे या कंपनीचे सुमारे ९६ लाखांपेक्षा शेअर्स आहेत. त्याचबरोबर राकेशकडे सुमारे ३ कोटींपेक्षा जास्त शेअर्स आहेत. या कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात ६० टक्के परतावा दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या शेअरची किंमत १५६० रुपये होती, ती आता वाढून २४८५ रुपये झाली आहे.

५) डेल्टा कॉर्प- याचे झुनझुनवाला यांच्याकडे १ कोटींपेक्षा शेअर्स आहेत म्हणजेच या कंपनीमध्ये झुनझुनवाला यांचे सुमारे ४.३१ टक्के भागभांडवल आहे. त्याच वेळी, त्यांच्या पत्नीकडे ८५ लाख शेअर्स आहेत. वर्ष २०२१ मध्ये या शेअरची किंमत सुमारे १६२ रुपये होती जी वाढून २७५ रुपये प्रति शेअर झाली. या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे ७० टक्के परतावा दिला आहे.

याव्यतिरिक्त Aptech Ltd . मध्ये राकेश झुनझुनवाला यांची सुमारे 23.7 टक्के हिस्सेदारी आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीच्या शेअर्सची संख्या 9,668,840 वर आली आहे. सप्टेंबर तिमाहीनुसार फोर्टिस हेल्थकेअरमध्ये राकेश झुनझुनवालाचा हिस्सा 4.3 टक्के होता.  त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे 31,950,000 शेअर्स आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत रेखा आणि राकेश झुनझुनवाला यांनी मिळून ऍग्रो टेक फूड्समध्ये 2 टक्के भागभांडवल ठेवले होते. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन, ल्युपिन लिमिटेड, ल्युपिन, कॅनरा बँक, नाल्को, फर्स्टसोर्स सोल्युशन्स, प्रकाश पाईप्स, ओरिएंट सिमेंट, टार्क लिमिटेड, अनंत राज, एनसीसी, वोक्हार्ट, ऑटोलिन इंडस्ट्रीज लि., बिलकेअर लिमिटेड, क्रिसिल लिमिटेड, डीबी रियल्टी लि. , डेल्टा कॉर्प लिमिटेड एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड समाविष्ट आहेत .

तसेच एस्कॉर्ट्स लिमिटेड, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, आयन एक्सचेंज (इंडिया) लिमिटेड, जुबिलेंट फार्मोवा लिमिटेड, करूर वैश्य बँक लिमिटेड, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज लिमिटेड, रॅलिस इंडिया लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड आणि द मंधाना रिटेल व्हेंचर्स लिमिटेड मध्ये गुंतवणूक आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 46 स्टॉक आहेत. ज्यामध्ये नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, जुबिलेंट इंग्रेविया लिमिटेड, व्हीए टेक वाबाग लिमिटेड, इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, दिशमन कार्बोजेन अॅम्सीस लिमिटेड, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेड आणि टीव्ही 18 ब्रॉडकास्ट लिमिटेड मध्ये मोठी गुंतवणूक आहे. याशिवाय इतर अनेक ठिकाणी त्यांची गुंतवणूक असल्याची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com