Top Post Ad

चपलाचा हार घालून जातीवादी गावगुंडानी केला नवनिर्वाचित सरपंचांचा अपमान

 अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यात कसारे गावच्या सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ करत अमानवीय कृत्य करत चपलेचा हार घातल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. ही धक्कादायक घटना मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी  दुपारी १२:५० वाजता पुरोगामी महाराष्ट्रात घडली.  इतकेच नव्हे तर महेश बोराडे यांनी पोलिस स्टेशनला गेले असता तिथे त्यांना ५ तास बसवून ठेवण्यात आलं. महेश बोराडे दुपारी गेलेले असताना त्यांना आरोपी येईपर्यंत बसवून ठेवण्यात आले. आरोपी आल्यानंतर त्यांना पोलिस स्टेशन मधून हुसकावून देण्यात आले. आणि अखेर सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली.

काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्याच्या कसारे गावात ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. यात आरक्षण सोडतमध्ये सरपंचपद अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव होते. यात महेश अण्णासाहेब बोराडे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु सरपंचपद मिळल्यापासून त्यांना गावातील गांव गुंडांकडून जातीयवाद सुरू झाला. नवनिर्वाचित सरपंचाचा चपलांचा हार घालून अपमान करत जातीवाचक शिवीगाळ करत  सरपंचांच्या मानवी हक्कांचे अवमूल्यन करण्यात आले.


  नवनिर्वाचित सरपंच काही कामासाठी तालुक्‍याला जात असताना रस्त्यातच त्यांची गाडी थांबवून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच चपलांचा हार घालून अपमान जातीवाचक शिवीगाळ करत सरपंचाचा असाच सत्कार झाला पाहिजे, असं म्हटल्याचा आरोप सरपंच बोराडे यांनी केलाय. सरपंच महेश बोराडे हे आपल्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी निघाले होते.  त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि तिची लहान मुलगी होती. शिंगोटे ते लोणी मार्गावरील जांभूळवाडी फाट्यावरून तळेगाव कडे जाताना , वडझरी येथे १:०० वाजेच्या  आसपास आरोपी कृष्णाची सूर्यभान कार्ले आणि मच्छिंद्र हिरामण कार्ले यांनी बाईकवरून येवून रस्ता अडवला,बा ईक आडवी घातली.आणि महेश बोराडे यांच्या गळ्यात अगोदरच सोबत आणलेली चपलांची माळ घातली. यावेळी महेश बोराडे यांच्या बहिणीने प्रतिकार केला असता जातीयवादी गांव गुंडांनी त्यांना दमदाटी करत ढकलून दिले.आणि महारांचा सत्कार आम्ही असाच करतो असे म्हणत त्यांना दमदाटी केली. तू सरपंच झालास म्हणून तुझा असा सत्कार केला आहे. जा काय केस करायची ती कर असे म्हणून तिथून निघून गेले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com