Top Post Ad

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन






ठाणे : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी ठाणे महानगरपालिका व ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या ठाणे फ्रिडम सायक्लोथॉनचे उदघाटन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान हाजुरी येथे उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँन्ड कंट्रोल सेंटरच्या वॅार रूम व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रात्याक्षिकाचे सादरीकरण सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, अभिनेते, जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी यांच्यासमोर करण्यात आले.     ठाणे महापालिका भवन येथे आज सकाळी ७.३० वाजता महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून ३ किमीच्या ठाणे फ्रिडम सायक्लोथॉनला सुरुवात झाली. या सायक्लोथॉनमध्ये शहरातील इपिक राईडर्स, सायकल युग, ग्रोईंग किड्स व आम्ही सायकल प्रेमी आदी संस्थांनी सहभाग घेतला. ठाणे सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्वाना मान्यवरांच्या हस्ते मेडल्स देण्यात आले. 

      या कार्यक्रमास  स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, उप महापौर सौ. पल्लवी कदम, नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेविका सौ. मिनल संख्ये, अतिरिक्त आयुक्त(१)  तथा ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, नगर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, नोडल अधिकारी सुधीर गायकवाड, दिग्दर्शक विजू माने, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अदिती सारंगधर, अभिनेते मंगेश देसाई, प्रथमेश परब, वैभव तत्ववादी, निखिल राऊत तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

   ठाणे स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणे अशा भागांत एकूण १५०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सोनसाखळी चोरांचा मार्ग काढणे, वाहनचोरीच्या घटनांना पायबंद घालणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, विविध रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची तात्काळ माहिती, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे आदी कामे करणे सीसीटीव्हीच्या झाल्यामुळे सहज शक्य झाले आहे. हाजुरी येथील अदययावत नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सीसीटीव्हीचे नियंत्रण केले जाते. या कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या आधारे काही गुन्हेगारांना शोधण्यात ठाणे तसेच मुंबई पोलिसांना मदत झाली आहे. या सर्व यंत्रणांचे आज सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, अभिनेते, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ठाणे महानगरपालिका व ठाणे स्मार्ट सिटी यांच्या या कामाचे महापौर नरेश गणपत म्हस्के व इतर पदाधिकारी यांनी कौतुक केले.

        कोव्हीड- १९चा सामना करण्यासाठी शहरात प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या असून कोव्हीड -१९च्या अनुषंगाने आवश्यक आणि मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी हाजूरी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड वॅारच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.  यामध्ये वॅार रूमच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या सर्व तक्रारींचे समाधानकारक निराकरण करणे, तक्रारीच्या अनुषंगाने महापलिकेच्या संबंधित विभागाशी अथवा शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय ठेवणे, मंत्रालय कोव्हीड 19 वॅार रूमशी समन्वय ठेवणे, कोरोना बाधित रूग्णांना आवश्यकता पडल्यास रूग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करणे, रूग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने समन्वय ठेवणे आदी कामे प्रभावीपणे करण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com