मुंबई - सीआरपीसी कायद्यात एकच पंच ठिकठिकाणी दिसत असेल तर केसेसमध्ये तथ्य नाही असा निष्कर्ष बऱ्याच केसेसमध्ये कोर्टाने काढला आहे याची आठवण करुन देत तीन केसेसमध्ये एकच व्यक्ती फ्लेचर पटेल पंच कसे झाले असा सवाल राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. यांचं उत्तर समीर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे कुठलं रॅकेट मुंबईत सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करतेय. हे सगळे लोक बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करुन खंडणी उकळण्याचं काम करत आहेत काः, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकीलही आहे. माझ्या पत्रकार परिषदेनंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. त्यामुळे आता उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खुलासा समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन करावा अशी मागणीही मलिक यांनी केली.
फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. तो समीर वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यांचे फोटोही मी ट्रिटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलातून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्रिटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकल्याचे सांगत एनसींबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? अशी प्रश्नांची सरबती केली.
मी गेल्या वर्षभरातील एनसीबीच्या केसेसची माहिती घेतली. त्यात तीन केसेसची माहिती संदिग्ध वाटली. सीआर नंबर ३८/२० सर्च ऑपरेशन करण्यात आलं. २५ नोव्हेंबर २०२० मध्ये छापा मारला. त्यात फ्लेचर पटेल हे अनोळखी पंच करण्यात आले. त्यानंतर सीआर नंबर १६/२० मध्ये ९ डिसेंबर २०२० रोजी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यातही फ्लेचर पटेल पंच आहे. तिसरी केस आहे. सीआर नंबर २/२१ आहे. त्यानुसार २ जानेवारी २१ ला छापेमारी करण्यात आली. त्यातही फ्लेंचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल इंडिपेंडंट पंच आहेत असं सांगता मग ते तुमचे फॅमिली फ्रेंड कसे? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केलीय का? असा सवालही त्यांनी केला.
सीआरपीसी कायद्यात एकच पंच ठिकठिकाणी दिसत असेल तर केसेसमध्ये तथ्य नाही असा निष्कर्ष बऱ्याच केसेसमध्ये कोर्टाने काढला आहे याची आठवणही मलिक यांनी करुन देत तीन केसेसमध्ये एकच व्यक्ती फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर समीर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे कुठलं रॅकेट मुंबईत सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करतेय. हे सगळे लोक बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करुन खंडणी उकळण्याचं काम करत आहेत काः, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकीलही आहे. माझ्या पत्रकार परिषदेनंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. त्यामुळे आता उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खुलासा समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन करावा अशी मागणीही त्यांनी केली.
0 टिप्पण्या