धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मदीक्षा कार्यक्रम

 बुद्धविहार-संघटना समन्वय समिती, ठाणे जिल्हा व बुद्धभूमी फाउंडेशन, कल्याण यांच्या विद्यमाने   समितीच्या मार्फत म्हारळ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड कल्याणमध्ये समाज संघटन व धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक कृतिशील कार्य मागील चार वर्षात करण्यात आले. दोन वर्षाच्या लॉक डाऊन मध्ये सुद्धा एक हात मदतीचा व विविध विषयावर परीक्षा घेऊन धम्माचा प्रचार प्रसार करण्यात आला आहे. अनेक संघटना व विहार समितीच्या एकसंघ कार्याशी निगडित असल्यामुळे समितीचे कार्य सर्वांसाठीच उपयोगी ठरले आहे. 

पुन्हा एकदा समितीची संपूर्ण कार्यकारणी धम्म प्रचारासाठी सज्ज झाली आहे. सध्याची परिस्थिती बघता वयात आलेल्या युवकांपर्यंत धम्म पुरेसा पोहोचलेला दिसत नाही त्याच उद्देशाने समाजातील अठरा वर्षाच्या पुढील मुलं व मुलींची धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित करण्यात येत आहे, तरी तुम्ही तुमच्या मुलांना सहभागी करून या एक संघ धम्म प्रचार-प्रसार कार्याला सहकार्य करा तुमच्या मुलासहित तुमचा सहभाग हाच धम्माचा प्रचार आणि प्रसार

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्स धम्मदीक्षा  दिनांक :- १५ आक्टोंबर २०२१  वेळ:- सकाळी ९.०० ते सायं. ७.०० वाजे पर्यंत  वार:- शुक्रवार   ठिकाण:- बुद्धभूमी फाउंडेशन, अशोक नगर, कल्याण  सकाळी ९.०० वाजता पंचशील ध्वजारोहण, प्रतिमापूजन, त्रिसरण पंचशील व बुद्धपूजा-धम्मसंस्कार विषयावर भन्ते गौतमरत्न थेरो यांचा धम्मदेशना  १०.३० वाजता अल्पोपहार  ११.०० वाजता ध्यान साधना व ध्यान साधना का करावी या विषयावर भन्ते गौतमरत्न यांचा धम्मदेशना  दुपारी  १.०० भोजन  दुपारी २.०० वाजता "धम्म माणसासाठी योग्य का आहे" या विषयावर आदरणीय भन्ते मोग्गलान यांचा धम्मदेशना  दुपारी ३.०० वाजता : समिती कोअर कमिटीचे मनोगत  दुपारी ४.०० चहा बिस्किट वेळ  दुपारी ४.३० उपासकांना शील आवश्यक का आहे या विषयावर धम्मदेशना आदरणीय भन्ते राहुल बोधी  संध्याकाळी ५.०० वाजता लेणी संवर्धन टीम कडून संपूर्ण लेणींची माहिती व्हिडिओ ग्राफी च्या माध्यमातून सादरीकरण  संध्याकाळी  ६.३० वाजता सर्व युवकांची धम्मदीक्षा भंत्ते गौतमरत्न थेरो यांच्याकडून.  दान पारमिता आभार प्रदर्शन व कार्यक्रमाची सांगता 

 सूचना:- धम्मदीक्षेचे साठी उपस्थित असणाऱ्या युवकांनी सफेद वस्त्र परिधान करून घ्यायचे आहे. धम्मात वेळेला अधिक महत्त्व दिले आहे म्हणून सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे. अल्पोहार व चहा पाणी व्यवस्था समितीकडून करण्यात आलेली आहे. संध्याकाळी मुलांच्या धम्मदीक्षा साठी पालकांची उपस्थिती अनिवार्य आहे. नाव नोंदणी चालु आहे.

पाण्याची बॉटल व दुपारचे भोजन सोबत घेऊन यायचे आहे. समितीच्या प्रतिनिधीकडे किंवा पदाधिकाऱ्यांकडे आपले नाव नोंद करावे

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
9223451420, 8308271107,
7900095827, 7020903866
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA