Top Post Ad

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दहावीचा वर्ग

 ठाणे: ठाण्यातील शाळांचा आज पहिला दिवस खूपच संस्मरणीय ठरला. जिल्हाधिकारीच नव्हे तर महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नौपाड्यातील गोखले रस्त्यावरील सरस्वती मंदीर ट्रस्टच्या शाळेत महापौर नरेश म्हस्के आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्या उपस्थितीत सकाळी पहिल्या दिवसाचा शुभारंभ करण्यात आला. महापौरांच्या हस्ते घंटा वाजवून शाळा सुरू करण्यात आली. यावेळी झालेल्या छोटेखानी समारंभात महापौर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगत अनेक आठवणी सांगितल्या.  जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत याचा आनंद असून शैक्षणिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त, संचालक मंडळ, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

 नव्या शैक्षणिक पर्वाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मुलांना शिकविण्याचा मानस केला होता. त्यानुसार सरस्वती मंदीर ट्रस्टच्या नव्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील दहावी ब च्या वर्गात तास घ्यायला नार्वेकर सरांनी सुरुवात केली. वर्गशिक्षिकेनी नविन सरांची ओळख विद्यार्थीनींना करून दिली. त्यानंतर पुढचा पाऊण तास नार्वेकर या वर्गावर होते. त्यांनी दहावीच्या मराठी पुस्तकातला कर्ते सुधारक कर्वे हा धडा शिकविला. महिलांना शिक्षित केलं तरच भारतीय स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने महत्व मिळेल या उद्देशाने कर्वेंनी महिला शिक्षणासाठी केलेल्या कार्याची शिकवण त्यांनी या धड्याच्या माध्यमातून दिली. 

पुस्तकी ज्ञानासोबतच सभोवतालचे ज्ञान वाढवावे. स्वताला विकसीत करण्यासाठी चौफेर ज्ञान मिळावावे. विश्लेषणात्मक अभ्यास करावा. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला प्राधान्य द्यावे, कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होता. शिक्षकांकडून होणारे संस्कार प्रत्यक्ष शाळेत आल्यावर मिळतात. आता शाळा पुन्हा सुरू झाल्यात. मित्र-मैत्रिणी पुन्हा प्रत्यक्ष भेटतील. पालकांनी तुम्हाला शाळेत पाठवलं आहे. तुम्ही सुदृढ राहीलात तर त्यांच्या मनात भिती राहणार नाही आणि समाजापुढेही मोठा संदेश जाईल. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com