गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावी अशी मागणी विविध कर्मचारी व कर्मचारी संघटनांकडून होत होती. या संदर्भात अनेक अधिकारी कर्मचारी यांनी महापौर नरेश म्हस्के यांची प्रत्यक्ष भेट घेवून सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार महापौरांनी प्रशासनासोबत चर्चा करुन याबाबत नगरविकास विभागाकडे सतत पाठपुरावा केला होती, तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत विनंती केली होती.
त्यानुसार आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ना. एकनाथ शिंदे यांनी कोविड कालावधीत ठाणे महापालिका/ कर्मचारी यांनी केलेल्या कामाची दखल घेवून सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. राज्यातील सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग यापूर्वीच लागू झाला होता. आज ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा ना. एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयामुळे ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहेत.
0 टिप्पण्या