एसटी अधिकाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

ठाणे:  कोरोना लाँकडाउन संपुर्ण राज्यात सुरु असताना ठाणे विभागातील एसटी मात्र सुरू होती जीवाची पर्वा न करता ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने आण केलेली आहे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आपत्कालीन परिस्थितीत काम केले याकरिता महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकच्या  वतीने ठाणे विभागातील एसटी अधिकार्यांचा  "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान पत्र देउन विभागीय कार्यालयात सन्मान करण्यात आला.


 या  कार्यक्रमात विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव वाहतुक अधिकारी,रमेश बांदल कर्मचारीवर्ग अधिकारी अमोल गुप्ते, नितिन आयरे या अधिका-या बरोबरीनेच ठाणे जिल्ह्यातील आगार व्यवस्थापक,वाहतुक शाखेतील अधिकाऱ्यांनाही जिल्हा इंटक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्याध्यक्ष विजय तारमळे,सचिव शामराव भोईर,सहसचिव मनेश सोनकांबळे,खजिनदार सुभाष पवार ,प्रसिद्धी प्रमुख रत्नपाल जाधव,पंढरीनाथ मुरकर हे ईंटकचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी कोरोना काळात काम केलेल्या अधिकारी वर्गाचे व कर्मचाऱ्यांचे आपल्या भाषणात कौतुक केले एसटी चे ठाणे विभाग नियंंत्रक विनोद भालेराव यांनी इंटकच्या या उपक्रमाचं कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या