नवी दिल्ली : आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे. तीचे तत्कालीन सहकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. संघाने आजवर अनेक अतिरेक्यांना जन्म दिला आहे. देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला, असा खळबळजनक खुलासा आंध्रप्रदेशातील संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी केला आहे.
विजय शंकर यांच्या वक्तव्याचा मराठीत अनुवाद भारत वाघमारे यांनी केला. मी बारा वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले. यादरम्यान अनेक अनुचित गोष्टी घडल्या. ज्या चुकीच्या होत्या याची जाणीव मला झाली आणि मी संघाला रामराम ठोकला असल्याचे विजय शंकर यांनी म्हटले. बॉम्बस्फोटासारखे कृत्य संघाने केले असून मी देखील त्याचा एक भाग होतो. माझ्याजवळ या संदर्भातील सर्व पुरावे आहेत. असा दावा रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला केला आहे. संघाचा काळा चेहरा समोर आण्यासाठी मी 'देशभक्त के नाम पर आरएसएसके काले कारनामे' हे पुस्तक काढले आहे. संघाचे काम असहाय्य झाल्याने काहींनी विष घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या देखील केली आहे. असे निराश झालेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन मी लवकरच दिल्ली येथे संघातील बढ्या नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार असल्याचेही विजय शंकर यांनी सांगितले.
आरएसएसने आजवर अनेक अतिरेकी जन्मास घातले, माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे आहेत, असा दावाही त्यांनी केला. पी. विजय शंकर रेट्टी हे तब्बल 12 वर्षे आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक होते. त्यांच्या तेलगू भाषेतील निवेदनाचा मराठी अनुवाद भारत वाघमारे यांनी केला आहे. 12 वर्षे प्राचरक म्हणून काम केल्याच्या काळात अनेक अनुचित गोष्टी घडल्या. त्या गोष्टी चुकीच्या असल्याची मला जाणीव होताच मी आरएसएसला रामराम ठोकला. आरएसएसने बॉम्बस्फोट घडवण्यासारखी कृत्ये केली. त्या कृत्याचा मी देखील एक भाग होतो. माझ्याजवळ याबाबतचे सर्व पुरावे आहेत. या संदर्भात मी सरसंघचालक यांच्याशी आमोरा-समोर चर्चा करायला तयार असल्याचेही विजय शंकर यांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, दै.प्रभात, नागपूर टुडे आदी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
0 टिप्पण्या