मूलनिवासी भारत देश हा उच्च संस्कृतीने जगात प्रसिध्द आहे.येथील उत्सव,संस्कार,येथील मातृसत्ताक पद्धती,लढवय्या महिला,निसर्गाची पूजा म्हणजे येथील दैवत हे अग्नी, वायू,जल,पृथ्वी, आकाश हेच होते.आर्यांनी अतिक्रमण करून येथील संस्कृती ला बोट लावण्याचे काम सर्वप्रथम केले.हजारो वर्ष जर या भूमीवर राज्य करायचे असेल तर येथील महिलांना बौद्धिक गुलाम केले पाहिजे ही त्यांची रणनीती त्यांनी आजही यशस्वी करून दाखविली.मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक खोट्या चाली रीती हद्दपार करण्यात सेवा संघाला यश आले,स्त्रियांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या मनू कायद्याला पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी होळी करीत जाळून टाकले.मात्र,आजही आमच्या माता बहिणी मनुवादी विचारांच्या गुलामीत अडकल्या आहेत,हे प्रचंड दुःख ही सल मनात घर करून वेदना देत राहते.
वाचक मित्रांनो!
दरवर्षीप्रमाणे येणारा दुर्गाउत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो.अष्टभुजाधारी, शक्तिशाली माँ दुर्गेची पूजा अर्चना करतो.काही हरकत नाही.श्रद्धा-भक्तिभाव हा सर्वांचा स्वतंत्र अधिकार आहे.मात्र,ज्या देवीच्या वस्त्रांवर आजकाल नवीन फॅशन आली आहे ती योग्य की अयोग्य? काल पर्यंत स्त्रियांना आम्ही कोणत्या रंगाची साडी आज नवरात्रीला आहे त्या प्रमाणे नटतांना बघितले.त्यात गंमत म्हणणे आजकाल पुरुष सुद्धा नवरात्रीच्या दिवसात नऊ रंगाचे कपडे (वस्त्र) वापरतांना बघत आहोत,तेव्हा मात्र हसायला कमी त्यांची कीव ज्यास्त येत असते.माझ्या माता-बहिणींनी देवीच्या अंगावरील वस्त्र कोणत्या रंगाचे आहे हे बघतांना तिच्या हातात कोण कोणते शस्त्र आहे हे सुद्धा बघायला शिका.काळ हा भयावह स्थितीतून जात आहे.आपल्या मुलींना वस्त्रांची फॅशन दाखविण्या पेक्षा देवीने स्वतःचे रक्षणासाठी शस्त्र कसे उचलले हे शिकविणे काळाची गरज आहे.
महिला अबला नसून सबला आहे हे सिद्ध करा.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्व अधिकार घटनादत्त दिलेत,तुम्ही नौकरी करीत घराच्या बाहेर पडता,पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता किंबहुना पुरुषांच्या पेक्षा ज्यास्त काम तुम्ही करता हे आम्ही 56 इंचाची छाती नसली तरी गर्वाने सांगतो, त्यात पुरुष म्हणून लाज बाळगण्याचे काम नाही.दुर्गा देवीच्या शस्त्राचा अभ्यास करा,ती चालविण्याचा प्रसंग तुम्हाला स्वरक्षण करतांना कामा पडेल.नऊ दिवस नऊ साड्या हा हौसेचा भाग असला तरी अस्त्र,शस्त्र हीच काळाची गरज राहणार आहे. भूतकाळात असलेला येथील महिलांचा इतिहास खूप मोठा आहे.राजमाता जिजाऊ साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी ते हजरो इतिहासाच्या पानात नसलेल्या स्त्रियांची शैर्यगाथा तुम्हला मनुवाद्यांनी वाचायला येऊ दिली नाही.
मुळात आम्हाला शिकविणारा वर्ग हा खोटा होता.आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता.आर्यांनी मूलनिवासी लोकांना राक्षस,भस्मासुर ही जी पत्रे रंगविली ती मुळात आपल्या मूलनिवासी बापजाद्याची आहेत.आर्य म्हणजे देव राक्षस म्हणजे येथील रानटी मूलनिवासी ही खरी संकल्पना त्यांनी मांडून ठेवली.देवांनी राक्षसांवर विजय मिळविला म्हणजे आर्यांनी मूलनिवासी लोकांवर विजय मिळविला हा खरा इतिहास आहे.मात्र,डोकी गुलाम करण्यात मनुवादी जगात अग्रेसर आहेत.त्यामुळे आजही आपण आपल्याच लोकांना राक्षस म्हणवितो व आर्यांची पूजा करतो. असो..!
विषय खूप गहन आहे.तुम्ही वाचून आम्हाला दोन शिव्या घालून शांत बसला तरी आम्हाला काही हरकत नाही,कारण क्रांती ही मोठ्या काळाने जन्म घेत असते.ती बीजारोपण करण्याची कामे आम्ही करतोय. भलेही याच कामी आम्हला मृत्यू बघावा लागला तरी हरकत नाही,असण्याचे कारण नाही.शेवटी एकच.माझ्या बहुजन माता-बहिणींनो दुर्गेच्या अंगावरील वस्त्र महत्त्वाचे नसून तिच्या हातातील शस्त्र महत्वाचे जेव्हा तुम्हा-आम्हाला कळेल तेव्हा माझ्या बहिणीच्या कडे वाकडी नजर करण्याची कोणत्याच हारामखोरा कडे हिम्मत राहणार नाही.
माझ्या बांधवांना एक सांगायचे आहे.पायात चप्पल न घालता ज्या श्रद्धेने तुम्ही मातेची आराधना करता त्याच श्रद्धेने राजमाता जिजाऊ साहेबानी दाखविलेल्या स्त्री आदर या मार्गाने गेल्यास प्रत्येक स्त्री तुम्हला माता जेव्हा दिसेल तेव्हा दुर्गेची पूजा पावन झाली समजा. असो..!
शेवटी निर्णय आपला शस्त्र शिकायचे की वस्त्रांची फॅशन करायची.
तूर्त थांबतो.
विजय विमल सहादेवराव पोहनकर
,.....९५७९१४१६१८जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ)
0 टिप्पण्या