कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा

राज्यातील विविध ठिकाणी महाराष्ट्र बंदची तयारी होत आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही बंद राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा देखील बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे. दरम्यान, उद्याच्या बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत  नाही. बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करुन राज्य सरकारच्या निर्णयाचे उल्लंघन करत आहे, असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा अधिकार बेस्ट कामगार सेनेला कुणी दिला. कामगारांच्या अधिकारांसाठी बंद पुकारला तर कारवाई होते. मग आता बंद केला तर कारवाई होणार नाही, याची खात्री सुहास सामंत देणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रुर पद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या  शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११  तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली आहे. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तांलींबानी राजवट सुरु आहे. निष्पाप लोकांना दिवसाढवळ्या गाडीखाली चिरडून मारले जात आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या नरसंहारचा निषेध करत शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडतण्यात आले. त्यांना बेकायदेशीर ताब्यात ठेवले नंतर अटक केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री धपेश बघेल यांनाही शेतकर्‍यांना भेटण्यास जाऊ दिले नाही. काँग्रेसच्या खासदाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली. लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटल्याचा आरोप त्यानी केला. भारतीय जनता पक्षे हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या भाजपा विरोधात आवाज बुलंद  करण्यासाठी व लखीमपुर खेरी येथील पीडित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. शेतकरी जगला तरच हा देश जगेल त्यामुळे राज्यातील जनतेने त व्यापा-यांनीही अन्नदाता बव्ठीराजाच्या हक्कासाठी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केली.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद मुंबई – महाराष्ट्रातही उमटत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत या हिंचाराबद्दल खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, हा बंद १०० टक्के यशस्वी होणार असल्याचे बोलून दाखवले. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची देखील उपस्थिती होती.

केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनतेला जागे करण्यासाठी, शेतकरी एकाकी नाही आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, महाराष्ट्रामधून याची सुरूवात व्हावी, यासाठी महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. तिन्ही पक्ष या बंदमध्ये सहभागी होतील. स्वत: शरद पवार यांनी देखील काल सांगितले आहे की बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, हे देशाला दाखवून द्यावे.  एकदा बंदचा पुकार केल्यावर आणि मुख्यमंत्री व शरद पवार यांनी देखील त्या बंदबाबत भूमिका जाहीर केल्यावर, लोक स्वयंस्फुर्तीने हा बंद पाळतील. कोणतीही ताकद लावावी लागणार नाही. कारण, लखीमपूर खेरीमध्ये जे घडले त्याची जखम या देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर झालेली आहे आणि प्रत्येकजण हळहळतो आहे. त्याने ते डोळ्याने पाहिले आहे, की कायदा कसा चिरडला जातो. गुन्हेगारांना कसे मोकाट सोडले जाते? चार शेतकऱ्यांचे खून करून देखील, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा कसा मोकाट फिरतो. हे देशातील जनतेने पाहिले आहे आणि त्याचा धिक्कार म्हणून ११ ऑक्टोबरचा हा बंद आम्ही पुकारला. हा बंद १०० टक्के यशस्वी होईल, असे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मांडले.

मागील आठ ते दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचं  आंदोलन, ट्रॅक्‍टर रॅलीच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून, दिल्लीत लाल किल्ल्यावर पोहचण्यापर्यंत. लोकांची सहनशीलता आता संपलेली आहे. शेतकरी विरोधी जे कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत, त्याबाबत खप लोकांच्या मनात रोष आहे, नाराजी आहे आणि कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकार अजिबात तयार नाही. त्यामुळे अशाप्रकारचे जे कायदे आहेत, ते तत्काळ थांबवले पाहिजे. चर्चेतून मार्ग काढता आला पाहिजे, त्या ऐवजी लोकाभिमृख नेतृत्व कसं असलं पाहिजे? लोकाभिमख निर्णय कसे असले पाहिजे? याबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज होती. परंतु हे करण्याऐवजी केंद्र सरकाच्या राज्यमंत्र्यांची मूलं लोकांवर गाड्या चालवतात,
अनेक लोक त्यामध्ये मारल्या गेल्याचे काँग्रेस नेते तथा राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगत याप्रश्नी महाराष्ट्र बंद हि तर सुरुवात असून तोडगा निघेपर्यंत पुढेही आंदोलन सुरुच राहणार. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष  आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपर्‍यात शेतकरी आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम जर होत  असेल, तर ते कदापी लोकांना सहन होणार नाही. याचा प्रतिकार वेगळ्या पद्धतीने केल्याशिवाय लोक राहणार नाहीत असा सूचक इशाराही चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे. 

लखीनपूर उत्तर प्रदेश येथील शेतकरी आंदोलकावर भाजपा चे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलाने व समर्थकांनी शांतता मय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवावर भरधाव गाड्या चढवून शेतकर्यांची  चिरडून हत्या केली आणि अनेक आंदोलकाना गंभीर दुखापती केल्या. याच्या निषेधार्थ संपुर्ण देशामध्ये लोकशाही प्रेमी जनतेच्या मनात असंतोष आहे. याबाबत   केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांचा शांततामय मार्गाने निषेध  नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बंद मध्ये बहुजन असंघटीत मजदूर युनियनचे महाराष्ट्रातील सर्व युनिट आणि कार्यकर्ते यानी सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन BAMU चे संस्थापक  आणि कामगार नेते प्रा चंद्रभान  यानी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या