तीन वर्षापासून महात्मा गांधीजींचा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत

शहापुर -   भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यसेनानी  महात्मा गांधीजींची २ ऑक्टोबर रोजी १५२ वी जयंती सर्वत्र साजरी केली जाणार आहे. मात्र  गोठेघर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा तब्बल तीन वर्षांपासून परवानगी नसल्याने अनावरणाच्या प्रतीक्षेत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.  शहापूर तालुक्यातील गोठेघर येथील आदिवासी सेवा मंडळाच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेतील राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा तब्बल तीन वर्षांपासून परवानगीच्या प्रतिक्षेत ऊन, पाऊस झेलत येथे उभा आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी  तीन वर्षा पूर्वीच्या शनिवारी १३ ऑक्टोबर २०१८ रोजी  येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेला मुलांचे- मुलींचे वसतीगृह व भोजनालय समर्पित  कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली होती. त्यावेळी परवानगी देण्यात आलेली नसतांना या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. 

राज्यपालांच्या प्रमुख कार्यक्रमात महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या अनावरणाचा देखील समावेश होता. परंतू प्रशासकीय कधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर कार्यक्रम पत्रिकेतील इतर कार्यक्रमांव्यतिरिक्त महात्मा गांधींच्या पुतळ्यास प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने राज्यपाल राव यांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचे त्यावेळी टाळले होते. मात्र त्यानंतर  तब्बल १३ ऑक्टोबरला २०२१ ला तीन वर्षे पूर्ण होतील. ३६ महीने उलटले तरी आश्रमशाळेतील सुशोभित केलेल्या चबुतऱ्यावर उभा करण्यात आलेला हा पुतळा परवानगीची प्रतिक्षा करीत उभा आहे. 

महात्मा गांधींचा पुतळा येथील आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा आणि नवचेतना प्रेरीत ठरणार असला तरी, राज्य शासनाच्या गृहखात्याने तीन वर्षांपासून  परवानगीच दिली नसल्याने चबुतऱ्यावर उभा केलेला गांधींचा पुतळा पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. हा पुतळा आधीपासूनच चबुतऱ्यावर कायमस्वरूपी बांधकाम करुन उभा करण्यात आल्याने परवानगी मंजूर होईपर्यंत तो सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था देखील आश्रमशाळा व्यवस्थापनाला करता आलेली नाही. तसेच परवानगी मिळाल्यानंतर त्याची उभारणी करता येऊ शकली असती. परंतु आधीच बांधकाम करुन उभा केलेला पुतळा फक्त कपड्यात गुंडाळून ठेवला असल्याने या पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. ऐन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५२ व्या जयंतीच्या तोंडावर पुतळा अनावरण राखडल्याने शहापूर तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

. "प्रशासकीय परवानगी तातडीने देण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सन २०१८ पासून राज्य शासनाची परवानगी रखडल्याने आश्रम शाळेतील पुतळ्याचे अनावरण केलेले नाही. तसेच त्याला कपड्याने आच्छादले आहे.  - हिराजी घरत, मुख्याध्यापक, आदिवासी विकास मंडळ संचालित आश्रम शाळा गोठेघर, त. शहापूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA