उत्सवाच्या काळात ठाण्यातील वाहतूक मार्गात होणार हे बदल

 ठाणे पोलीस आयुक्तालयात सालाबादप्रमाणे यावर्षी 7 ते 15  ऑक्टोबर या कालावधीत माता भवानी नवरात्रोत्सव व दसरा, विजयादशमी सण साजरा होणार असुन त्या दरम्यान कळवा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत  विटावा घाट, शिवाजी चौक गणेश घाट.  खारेगाव तलाव, पारसिक रेतिबंदर गणेश घाट येथे भवानीदेवी मुर्तीचे विसर्जनाचे दिवशी म्हणजे 15  ऑक्टोबर रोजी परिसरात वाहतूक कोंडी होवू नये त्या करिता सदर भागात वाहतूक सुरळीत रहावी वाहतूक मार्गात बदल बाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 •             प्रवेश बंद नवी मुंबई बेलापूर रोडने तसेच ऐरोली-पटणी मार्गे विटावा जकात नाका कळवा शिवाजी चौकातून ठाण्याचे दिशेने येणाऱ्या जड अवजड वाहनांना व टी.एम.टी./ एन.एन.एम.टी./एस.टी. व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसना विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. 
 •             पर्यायी मार्ग सदरची जड अवजड वाहने ही ऐरोली मुलूड-आनंदनगर जकात नाका पूर्व दूतगती महामार्गावरून इच्छित स्थळी जातील. टी.एम.टी./ एन.एन.एम.टी./एस.टी. व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस हया विटावा जकात नाका येथे प्रवासी उतरवून तेथूनच प्रवासी भरून परत नवी मुंबई कडे इच्छित स्थळी जातील.
 •             प्रवेश बंद पूर्व द्रुतगती महामार्ग ( रा.म.क. ३) वरील गोल्डन डाईज नाका येथून ठाणे शहरातून मिनाताई ठाकरे चौक- जी.पी.ओ. नाका - किक नाका - कळवा मार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणान्या जड - अवजड वाहनाना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
 •             पर्यायी मार्ग सदरची वाहने ही गोल्डन डाईज नाका येथूनच पूर्व द्रुतगती महामार्गवरून कॅडबरी जंक्शन-नितीन जंक्शन-तीनहातनाका-कोपरी ब्रिज वरून आनंदनगर नाका-मुलूंड मार्गे इच्छित स्थळी जातील.
 •             प्रवेश बंद रा.म.क. ३ खारेगांव टोल नाका येथून मुंब्रा बायपास मार्गे नवी मुंबईच्या दिशेने गॅमन नाका (गणेश विसर्जन घाट) रेतिबंदर पारसिक सर्कल मुंबा बायपास मार्गे जाणाऱ्या जड - अवजड वाहनांना खारेगांव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
 •             पर्यायी मार्ग सदरची वाहने ही रा.म.क.३ खारेगाव टोल नाका येथून सरळ-गोल्डन डाईज नाका-कॅडबरी नाका- नितीन कंपनी नाका तीनहात नाका कोपरी ब्रिज वरून आनंदनगर जकात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
 •             प्रवेश बंद बाळकुम नाका - साकेत - किक नाका येथून शिवाजी चौक -कळवा च्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड वाहनाना बाळकुम नाका येथे 'प्रवेश बंद करण्यात येत आहे.
 •              पर्यायी मार्ग सदरची वाहने ही बाळकुम - कापूरबावडी नाका-गोल्डन डाईज नाका - कॅडबरी नाका- नितीन कंपनी नाका-तीनहान नाका - कोपरी ब्रिज वरून आनंदनगर जकात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
 •             प्रवेश बंद नवी मुंबई - पनवेल बाजूकडून तसेच कल्याण - मानपाडा - बदलापूर - अंबरनाथ कडून - मुंब्रा ठाणेच्या दिशेने येणाऱ्या
 • जड अवजड वाहनांना शिळ फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
 •             पर्यायी मार्ग सदरची वाहने शिळ फाटा येथून महापे रोडने- रबाले-ऐरोली ब्रिज-मुलूड-आनंदनगर चेका- पूर्व द्रुतगती महामार्गावरून इच्छित स्थळी जातील.
 •             प्रवेश बंद शिळ फाटा येथून मुंबा बायपास मार्गे घोडबंदर रोड-नाशिक बाजूच्या दिशेने येणाऱ्या जड अवजड वाहनाना शिळ फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
 •             पर्यायी मार्ग सदरची वाहने शिळ फाटा येथेच यु टर्न घेवून परत महापे रोडने रबाले-ऐरोली ब्रिज-आनंदनगर चेक नाका पूर्व द्रुतगती महामार्गवरून इच्छित स्थळी जातील.
 •             प्रवेश बंद मुंबा बाजूकडून पारसिक नाका मार्गे खारेगांव टोल नाका व ठाण्याचे दिशेने येणाऱ्या टी.एम.टी. व खाजगी बसेसना पारसिक सर्कल येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे.
 •             पर्यायी मार्ग सदरच्या बसेस हया पारसिक सर्कल येथे प्रवासी उतरवून तेथूनच प्रवासी घेवून परत मुंबा बाजूकडे इच्छित स्थळी जातील.

            सदरची वाहतूक अधिसूचना ही भवानीदेवी मुर्ती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे दि.15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.00 वाजे पासुन ते सार्वजनीक तसेच खाजगी भवानीदेवी मूर्ती घट आणि फोटो / प्रतिमा यांचे विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत अमलात राहिल. सदरची वाहतुक अधिसुचना हो पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, भवानीदेवी मुर्ती विसर्जनातील वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. असे बाळासाहेब पाटील, पोलीस उप आयुक्त, वाहतुक विभाग ठाणे शहर यांनी कळविले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA