टाळे लावून आंदोलन करताच , शहापूरचे गोठेघर कोविड केअर सेंटर झाले स्थलांतरित

शहापूर  : कोरोना काळात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आदिवासी सेवा मंडळ या संस्थेने सामाजिक जाणिवेतून एप्रिल २०२१ या महिन्यात संस्थेच्या गोठेघर येथील आश्रम शाळेत शासनाला कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी आश्रम शाळेच्या इमारती उपलब्ध करून दिल्या होत्या. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व मुलांच्या शाळा सुरू करण्याचे शासनाचे सांगितल्याप्रमाणे संस्थेने सदर कोविड केअर सेंटर स्थलांतरित करण्यासंदर्भात संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके, शहापूर तहसीलदार निलिमा सुर्यवंशी आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र व्यवहार केला. जुलै महिन्यापासून पत्र व्यवहार सुरू केला परंतु आरोग्य विभागाच्या आडमुठेपणामुळे केंद्र आजूनही स्थलांतरित करण्यात आलेले नाही. त्यामूळे ४०० आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच १०वीच्या बोर्डाचे फॉर्म भरावयाची वेळ आली आहे. परंतु कोविड केअर सेंटर असल्याने मुले व पालक शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळे आदिवासी सेवा मंडळ या संस्थेने संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवारी कोविड केअर सेंटरला टाळे लावले.

शासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून विनंत्या करून देखील शासन दाखल घेत नव्हते, अखेर शुक्रवारी संस्थेने आंदोलनाचा पवित्रा घेत कोविड सेंटरला टाळे ठोकले आणि दिवसभर कोविड सेंटरवर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तालुका आरोग्य विभागाने तातडीने येथील सेंटर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आदिवासी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप खैरकर, मानद सचिव महेश नाईक, सदस्य काकड टोकरे, मंदाताई कोंब व वसंत वनगा आदी उपस्थित होते.

जेव्हा एखादी संस्था शासनाला सामाजिक मदत करते, तेव्हा शासनाचे सुद्धा संस्थेचे म्हणणे ऐकायला पाहिजे होते. परंतु तसे न झाल्यामुळे दुर्दैवाने आम्हाला आंदोलन करून इमारती मोकळ्या करून घ्याव्या लागल्या.- प्रदिप खैरकर, उपाध्यक्ष आदिवासी सेवा मंडळ

"संस्थेचा मुख्य उद्देश आदिवासी मुलांना शिक्षण देणे हा असल्याने,मूळ हेतुला बाधा पोहचू नये म्हणून हे कोविड केअर सेंटर स्थलांतरित करणे आवश्यक होते.- महेश नाईक, सचिव आदिवासी सेवा मंडळ

" दिनांक १ ऑक्टोबर २०२१ रोजी संस्था चालकांनी गोठेघर कोविड केअर सेंटर शाळा सुरू करण्यासाठी ताब्यात घेतले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार गोठेघर कोविड केअर सेंटर येथील सात रुग्ण सिव्हील हॉस्पिटल ठाणे येथे संदर्भित केले आहेत. उद्यापासून ताप उपचार केंद्र, RTPCR  तपासणी गोठेघर येथे होणार नाही आणि कोरोना पॉझिटिव्ह पेशंट गोठेघर येथे ऍडमिट केले जाणार नाहीत."- डॉ. तरुलता सुनील धानके, तालुका आरोग्य अधिकारी शहापूर 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA