Top Post Ad

100 कोटीचं लसीकरण; राष्ट्रीय इव्हेन्ट तर नाही ना - संजय राऊत

देशात 100 कोटी जनतेचं लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सवाल केला आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 100 कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे. जगामध्ये आपला देश लसीकरणात 19 व्या स्थानावर आहे. या संदर्भात वेगवेगळे आकडे बाहेर येत असतात. काही लोकं म्हणतात 33 कोटीच दोन डोस झाले आहे. काही लोक म्हणत आहेत आम्हाला दुसरा डोस मिळत नाहीये. पण शेवटी एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं म्हटलं. उत्सव करायचा म्हटलं तर या देशात नवीन प्रथा पायंडा पडला आहे. मोदींच्या उत्सवात सर्वांनी सामिल होऊ या. देशात सध्या इव्हेंट सुरू आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.


 यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी घोटाळ्यावरूनही भाजपला घेरलं. घोटाळ्यांचं सत्रं अजिबात सुरू नाही. जे घोटाळे आधीच्या सरकारने करून ठेवले आहेत. ते घोटाळे आता हळूहळू बाहेर निघत आहेत. कालच पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी योजनेतला भ्रष्टाचार बाहेर आला. पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या योजनेतील हा घोटाळा आहे. त्यातील साधारण 700 कोटींचा गैरव्यवहार आहे. टेंडर देण्यासाठी कसे नियम मोडले तोडले हे बाहेर आलं आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला नख लावणारे लोक कोण आहेत? कुणासोबत फिरत आहेत? कसे फिरत आहेत. कुणाच्या आजूबाजुला असतात. हे एकदा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी ऐकून त्यावर अॅक्शन घ्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

, देशातील, राज्यातील भ्रष्टाचार संपावा असं ज्यांना वाटतं जे लोकं सतत भ्रष्टाचारावर बोलतात त्यांच्याकडे आम्ही हे प्रकरण पाठवलं आहे. त्यांनी अभ्यास करावा. ही क्रिस्टल कंपनी कोणाची आहे ते आधी त्यांनी जाहीर करावं. मग त्या कंपनीचे इतर घोटाळे आम्ही जाहीर करू. आम्ही करणार ते. भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, धर्माचा आणि जातीचा नसतो. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. जे भ्रष्टाचाराविरोधात लढत असतात. त्याचं नेतृत्व करतात त्यांनीही राजकीय पक्षाकडे पाहायचं नसतं. जरी माझ्या घरात भ्रष्टाचार असेल तर त्यावरही मी बोलले पाहिजे. म्हणून मी योग्य ठिकाणी पाठवलं आहे. कंपलेट कुठे करायची, कशा पद्धतीने करायची हे आम्हाला माहीत आहे. कोणते कागद लावायचे हे आम्हाला माहीत आहे, ते आम्ही करणारच आहोत. पण तरीही तुमची काय एक्सपर्ट कॉमेंट आहे ती आम्हाला समजून घ्यायची आहे, असा टोलाही त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नाव न घेता लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com