केवळ महाबोधि विहारच नव्हे तर आजुबाजूचा परिसरही बौद्ध संस्कृतीला मारक ठरत आहे. विषमतावादी व्यवस्थेने इथल्या बहुजनांना अंधश्रद्धेत इतके अडकून ठेवले आहे की, बुद्ध आणि इतर देव यांच्यातला फरकच या लोकांना कळत नाही. संत रविदास रेल बुट पॉलिश संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.बी.सिंग, भारतीय लेणी संवर्धन समितीचे संस्थापक डॉ. परम आनंद यांच्यासह बिहारमधील काही कार्यकर्त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या. बुद्धमुर्तीची होणारी विटंबना पाहिली. गया जिल्हा बरौनी गाव महादेव व गौरेया येथील बुद्ध स्तूपावर आजही लोक कोंबडा, बकरी बळी देतात. तेथील पुजारी राजकिशार मांझी यांना याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, हे आमचे देव असून त्यांना बळी देणे ही आमची पूर्वापार परंपरा आहे. नरसे गावांत बुद्ध मुकूटधारी भव्य मुर्ती आहे. त्या परिसरातील हिंदु लोक ब्रह्मबाबा समजून हिंदु देवी देवतांप्रमाणे त्यांची पुजा करतात. दुब्बा गाव भगवती येथे बुद्धांची लाल वस्त्रातील आशिष मुद्रा भव्यमुर्ती गर्भगृहात स्थापित केली आहे. मूल होण्यासाठी महिला याला नवस करतात. या मंदिरांच्या बाहेर विष्णु व हनुमान म्हणून ज्या मुर्त्यांची महिला पुजा करतात त्या देखील बुद्धमुर्त्या आहेत. बुद्धमुर्तीला सिंदूर लावून महिला पुजा करतात, देवीचा महिमा गात असतात.
हेच काय पण बुद्धगया महाबोधी महाविराच्या प्रांगणात असलेल्या पाच बुद्ध मुर्त्यांची पाच पांडव म्हणून बौद्धांच्या नाकावर टिच्चून हिन्दु पध्दतीने पुजा केली जाते. काही पंडांशी याविषयी विचारण केली तेव्हा ते म्हणतात आम्ही बुद्धाला विष्णुचा नववा अवतार मानून त्यांच्या मुर्तींची देवी देवता म्हणून पुजा करीत असल्यानेच बुद्धमुर्तीचे अस्तित्व राहिले, नाहीतर बुद्धमुर्ती केव्हाच नष्ट झाल्या असत्या. महाबोधी सोसायटीचे सचिव नंदजी दोरजे यांना बिहारमधील काही भागात बुद्धमुर्ती, स्तूप, स्तंभ अस्ताव्यस्त पडण्याबद्दल विचारले तेव्हा एन. दोरजे म्हणाले की, हमे सिर्फ महाबोधी मंदिर की देखभाल करना है, बाहर क्या हो रहा है, इससे हमे कोई लेना देना नही है । एन.दोरजे सारखी माणसं हीच मुळी आरएसएसची माणसं आहेत. बिहारची बुद्धमुर्ती, बुद्धगया, सारनाथ, नालंदा ही जागतिक किर्तीची पवित्र स्थळे असली तरी येथील बुद्धमुर्तीची मंदिरात स्थापना करुन बौद्ध संस्कृतीची विटंबना करीत आहेत.
मगध देशाला बौद्धकालीन मोठा इतिहास असला तरी बिहार मधील दुब्बा, भुरहा, नसेर, गुनेरी, देवकुली, नरौनी, कुकीटार, मंडा, तारापूर, पत्थरकट्टी, जेठियन, औंगारी, कौआडोल, बिहाटा, उमगा पहाड, शेहर तेलबी, तेलहाडा आणि गैरलौरी घाटी येथील बुद्धमुर्ती, स्तूप, स्तंभ यांची मोठ्या प्रमाणात विटंबना सुरु आहे. भव्य अशा बुद्धमुर्तींना तेलिया मशान संबोधून देवी देवतांच्या नावाने सिंदूर लावणे, तेल चढविणे; गौरेया बाबाच्या नावाने दारु चढविणे, कोंबडी, बकरी आणि कबुतरांचा बळी दिला जात आहे. भैरोबाबा, भगवान विष्णु आणि बजरंग बलीच्या नावाने काही बुद्धमुर्तीची पुजाअर्जा सुरु आहे. नालंदा वडगांव तेलिया भंडार भैरो मंदिरात बुद्धांची भव्यमुर्ती असून `सच्चे दिल से मांगी हर मन्नत पुरी होती है।' असा अपप्रचार केल्याने इथे नवस करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. लहान मुले आजारातून बरी होण्यासाठी राईचे तेल व सात धान्य चढविले जाते. अशा प्रकारे आजही भारतात बुद्धांची विटंबना मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही की संस्था नाही.
महाबोधि विहार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात आले तर काहीप्रमाणात का होईना या अंधश्रद्धेमधून लोकांना बाहेर काढण्याचे कार्य भिक्खूसंघ करेल. पण आज आठ ते दहा टप्प्यातून सुरु असलेले हे आंदोलन अद्यापही यशस्वी झाले नाही. आजही जपान देशामधून आलेले भदन्त सुरई ससाई आंदोलन करीत आहेत. मात्र आपल्dया देशातील कोणताही नेता अथवा भिक्षू याबाबतीत आवाज उठवतांना दिसत नाही. आज महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न त्यांनी युनो-युनोस्कोत मांडला. महाविहारात बौद्धभिक्खूंवर झालेल्dया अत्याचाराबाबत देखील भंते ससाई यांनी युनो-युनोस्कोत निवेदन पाठविले होते. या निवेदनानंतर भंतेना त्यांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन युनेस्कोने जिनिवा येथील परिषदेसाठी आमंत्रित केले होते. हा प्रश्न केवळ देशांतर्गत राहिला नसून त्याने जागतिक स्वरुप धारण केले आहे. तरिही आज देखील आम्हाला महाविहार कोणत्या राज्यात आहे हे माहित नाही हि आमची शोकांतिका आहे. श्रीलंकेहून येऊन अनागारिक धम्मपाल यांनी जगाला महाविहार दाखविले आणि आपल्या जीवनाच्या शेवटी काषायवस्त्र परिधान करून याच भूमीत आपला देह ठेवला. मात्र आम्ही भारतीय याचे ऋण फेडण्यास असमर्थ ठरलो,
अनागरिक धम्म पाल जेंव्हा शिकागोमध्ये बौद्ध पक्ष मांडतात व परिषदेच मन जिंकतात तो भारतीय संस्कृतीचा गौरव नसतो? त्याच धम्म पालाने विवेकानंदावर अनुकंपा करत परिषदेला ओळख करुन दिली व आपल्या भाषणातला अर्धा तास वेळ विवेकानंदाला दिला अन्यथा विवेकानंद कधिच तेथे बोलु शकले नसते .तरीही अनागरिक धम्म पाल चे योगदान अनुल्लेखाने टाळले जातात . बोधगया मुक्ती लढ्याचे आद्य सेनानी , धम्मध्वजाची रचना करणारांपैकी एक ,बौद्ध जगताच्या एकतेकरता आंदोलन चालवणारे अनागरिक धम्मपाल यांना वंदन
0 टिप्पण्या