Top Post Ad

शहापूरात असंघटित कामगार मेळावा संपन्न

 

  शहापूर.सत्यशोधक कामगार संघटना तसेच नवजीत कम्युनिटी हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार नेते सागर तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा जांभूळ पाडा, आवाळे माहुली रोड शहापूर येथे शनिवारी असंघटित कामगार मेळावा संपन्न झाला.  या मेळाव्यासाठी शिवराज्य वाहतूक संघटना अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, स्वतंत्र मुन्सिपल कामगार युनियन अध्यक्ष गीतेश पवार, घरेलू कामगार संघटना समन्वयक कालिदास रोटे,  महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष रविराज गायकवाड, आरोग्य विभाग संतोष घरत, एलआयसी विभाग भरत भोजने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


 यावेळी असंघटित कामगार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी रविंद्र सूर्यवंशी, गीतेश पवार, कालिदास रोटे तसेच प्रमुख मार्गदर्शक कामगार नेते सागर तायडे यांनी असंघटित इमारत बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनाची माहिती दिले एकूण २८ कल्याणकारी योजना आहेत, १) सामाजीक सुरक्षा योजना ०९,२) शैक्षणिक योजना ०७३) आरोग्य विषयक योजना ०६४) आर्थिक योजना ०६ ह्या २८ कल्याणकारी योजना असंघटित कामगारांना लाभ देऊ शकतात.अनेकांना माहिती नसल्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत व या योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटीत इमारत बांधकाम कामगारांनी संघटीत झाले पाहिजे. त्यासाठी संघटने शिवाय पर्याय नाही. तो मिळवून देण्यासाठी संघटनाच प्रयत्न करू शकते असे सागर तायडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नवजीत कम्युनिटी हेल्थ सेंटरचे माधव वाघमारे यांनी केले.


संजय बन्सी भालेराव यांची नियुक्ती
  असंघटित कष्टकरी कामगारांच्या न्याय, हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेच्या शहापुर तालुका अध्यक्ष पदी संजय बन्सी भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  बांधकाम व्यावसायासाठी लागणारा कामगार तसेच  शहरातील चौका चौकात कामाच्या प्रतीक्षेत उभा राहणारा नाका कामगार, घर कामगार आणि शेतमजूर अशा सर्व क्षेत्रातील 142  असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
त्यामुळे त्यांच्या समस्याही वाढल्या आहेत.  संघटनेच्या वतीने आतापर्यंत कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व समस्या सोडवण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे या संघटनेच्या वाढीसाठी व कामगारांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सत्यशोधक कामगार संघटनेच्या शहापुर तालुका अध्यक्ष पदी संजय बन्सी भालेराव यांची नियुक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सागर तायडे यांनी केली आहे. या नियुक्ती बद्दल संजय भालेराव यांचे सर्वथरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com