राज्यातील ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर शहरी भागात ८ वदी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार असून यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने ७ जुलै २०२१ रोजी जीआर काढला होता. त्या शासन निर्णयानुसार ज्या ग्रामीण भागात कोविडमुक्त झाला आहे, तिथे ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून त्या शाळांना परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार एसओंपीही दिल्या होत्या. नंतर ग्रामीण भागात ५वी ते ८वी आणि शहरी भागात ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १० ऑगस्ट रोजी त्याच्या एसओपी देखील जाहीर केल्या होत्या. त्यानंतर यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या एसओपींमध्ये अजून काही सूचनांचा समावेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा निर्णय निवासी शाळांना लागू असणार नसून, नियमित भरणाऱ्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असेल, असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या