अकोला येथे दुसरी आरक्षण परिषद

शासन सेवेतील पदोन्नती आरक्षण शासन निर्णयाद्वारे रद्द केले असल्यामुळे आरक्षण लाभार्थी कर्मचारी अधिकारी वर्गात प्रचंड असंतोष आहे. त्या सर्वाना एकजुटीने लढण्यासाठी अनु.जाती/जमाती,/विजा-भज/ इमाव / विमाप्र शासकीय / निमशासकीय मंत्रालयीन संघटनेच्या वतीने सहा महसुली विभागात प्रत्येक एक याप्रमाणे आरक्षण परिषदा आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार ३१ जुलै २०२१ रोजी नागोरावजी नरवाडे मंगल कार्यालय, नांदेड येथे पहिली आरक्षण परिषद संपन्न झाली होती. दुसरी आरक्षण परिषद अकोला येथे शनिवार ११ सप्टेबर २०२१ रोजी दुपारी ११ वाजता प्रभूपार्वती सभागृह,तहशील कार्यालायच्या मागे बर्शिटाकळी जिल्हा अकोला आयोजित करण्यात आली आहे.

त्याचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक मान.नामदार डॉ नितीन राऊत,ऊर्जामंत्री,मान.ना.संजय बनसोडे राज्यमंत्री पर्यावरण,पाणी पुरवठा हे असणार आहेत.भारत वानखेडे आरक्षण परिषदेचे अध्यक्ष व संघटनेचे अध्यक्ष राहतील.काकासाहेब खंबाळकर ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते,मान.डॉ राजू वाघमारे विचारवंत,व्याख्याते,मान जे.एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन,मा.रामचंद्र येईलवाड, ओबीसी नेते महाराष्ट्र राज्य.मा.दिनेश डिंगळे सह सचिव सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई.मा.समीर भाटकर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघ श अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ही दुसरी आरक्षण परिषद संपन्न होणार आहे 

समस्त बहुजन कर्मचारी अधिकारी बंधू भगिनींना परिषद ला उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. आरक्षण परिषदेची सुरुवात सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रमाने होणार आहे. यात सुप्रसिद्ध गायक संगीतकार  जोली दादा मोरे,  प्रसिद्ध शाहीर सीमा पाटील हे प्रबोधनात्मक गायन होणार आहे.करिता सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. असे डॉ उत्तम सोनकांबळे  राज्य महासचिव यांनी आवाहन केले आहे. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या