Top Post Ad

आंबेडकरवादी विचारांचे राजकारण यशस्वी होऊ शकते

 खैरलांजी घटना # न्याय # पोलिस # वकील # तपास करणारया संस्था # साक्षीदार # आंदोलन # नेते # सपोर्ट # आणि ?

    29 सप्टेंबर 2006 ला भंडारा जिल्हातील खैरलांजी येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या वेगवेगळ्या बाजुने विचार केल्यावर. आज या काळ्या दिवसाला 15 वर्षे झाले आहे. त्यामुळे काहींना ती खैरलांजी मधील अमानुष अत्याचाराची  घटना नक्की माहित आहे कि नाही त्याचप्रमाणे मागील पंधरा वर्षापुर्वी घटना घडली त्यामुळे आताच्या पुढीला ही समजले पाहिजे म्हणुन ,  भंडारा जिल्हातील खैरलांजी या गावात,, 29 सप्टेंबर ची ती  पंधरा वर्षापुर्वीची रात्र होती, शांतता पसरली होती जेवण तयार करुन झाले होते. जेवण कराला बसणार तेवढ्यात आपल्याकडे कोणीतरी येत आहे याचा आवाज आल्यासारखे वाटत होते,

ये भोतमांग्या बाहेर ये तु त्या गजभियेला (पोलिस पाटील )साथ देतो ना. तुला दाखवतोच तुला मारुनच टाकतो तुझ्या घरादारातील सगळ्याना मारुन टाकतो. तु शेती कशी करतो,शेतात जायाला कोणत्या रस्त्याने जातो  ,तुला बघतोच.

आणि अचानक आखा गावा गावातील महिला मुले आणि प्रौढ माणसे घरावर तुटुन पडली घराला आग लावली 

 त्यामध्ये आधी सुरेखा भोतमांगे ला पकडली तिला आडवी पाडली तिची साडी फेडली अंगावर काठ्याने मारमार मारली बेशुध्द पडली आणि मेली. लगेच सुधीर आणि रोशन दोन तरुण मुले होती त्यांना ही एकामागोमाग पकडली त्याला ही मारले हात पाय तोडले काठीने मारले त्यातील एक अंध होता त्याला ही मारले एका जाग्यावर आणले 

त्यात प्रियांका नुकतेच 12 वी पास झालेली NCC मध्ये असताना पुढील वर्षी पोलिस होण्याचे स्वप्न बघणारी काँलेज मध्ये बरोबर असणारया मुलांना भाऊ मानणारी. अभ्यासात हुशार असणारी प्रियांका भोतमांगे तीला ही पकडले अंगावरचे कपडे फाडले बलात्कार केला .अगदी सामुहिक बलात्कार . तिला मारुन टाकले , बलात्कार केल्यानंतर ही तिच्या योनीमध्ये काठ्या घातल्या माती टाकली  सगळ्यांना एका जाग्यावर आणले बरोबर काही ट्रँक्टर होते , त्या ट्रँक्टर मध्ये चारही जनांची मृत्यदेह ठेवले अगदी आंनद साजरा केल्यासारखे गाणी म्हणते आता कशी जिरवली मोठमोठ्याने हसत त्या ट्रँक्टर वरुन त्यांची वरात काढली जवळ एक छोटा तलाव होता त्या तलावावर त्याचे मृतदेह फेकुन दिले . एकमेकांना टाळ्या दिल्या आणि ते सर्व घरी आले. 

त्यामध्ये भैय्यालाल भोतमांगे पळुन गेला म्हणुन तो वाचला, दुसरया दिवशी  कोणीतरी सांगितले ते मृतदेह तळ्यावर टाकण्याऐवजी जमिनीत पुरा.त्यानंतर  इकडे लाखो लोक नागपुरला धम्मदिक्षेचा कार्यक्रम होता त्यासाठी जमा झालेले. पण...
हळुहळु बातमी पसरली
आणि त्या अमानुष घटना वणव्यासारखी पसरली, 

आंदोलने
मग नेहमीप्रमाणे आंदोलने झाली . आणि ठिकाणी श्रध्दाजली सभा वाहण्याचे कार्यक्रम झाले आणि ठिकाणी कँडल मार्च,निषेध मोर्चा झाला, आधी खैरलांजी साठी न्याय मिळावा म्हणुन होणारे आंदोलन होते,
आणि बघता बघता संपुर्ण महाराष्ट्र अगादी उग्र आंदोलन झाली. रेल्वे आडवल्या रस्ते आडवले,
आणि
नंतर आंदोलनात ठिणग्या पडायला सुरवात झाली 

आंदोलनात फाटाफुट
सरकारने आंदोलनात फुट पाडण्यास सुरवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री होते आर.आर.पाटील त्यांनी घोषणा केली आंदोलनात नक्षलवादी शिरलेत, नक्षलवादी आंदोलन करतात,
झाले,, आंदोलनात फुट पाडायची असेल तर आंदोलनकर्त्यांना नक्षलवादी बोलायचे , आणि नक्षलवादी म्हणुन त्याच्यावर आरोप करायचे त्यांना अटक करायचे जसे शितल साठे आणि सचिन माळी यांनी नक्षलवाद्यांना सपोर्ट करतात , म्हणुन अटक केली 10 वर्षे तुरुगात काढल्यावर खुप जिकरीचे प्रयत्न केल्यावर निर्दोष सुटले.
असो  

त्यानंतर
 प्रसिध्दी आंदोलनात प्रसिध्दी मुळे ही फुट पडते .
याचे बातमीत नाव आले . या संघटनेचे  या गटाचे नाव आले आपल्या संघटनेचे आपल्या नेत्याचे नाव का नाही आले पेपरमध्ये न्युज चँनलवर
मग एकत्रीत असलेले आंदोलन वेगवेगळा राजकीय पक्ष ,वेगवेगळे गट वेगवेगळ्या ठिकाणी बँनर खाली आंदोलन करायला लागले झाले नेत्याच्या प्रसिध्दीच्या हव्यासापोटी आंदोलनात फुट पडली,

पोलिस
इतर जाती धर्माचे आपल्याला सपोर्ट करत नाही पण आपल्या स्व जातीचे पोलिस असुन ही आपल्याला सपोर्ट करत नाही .
मग आपण त्यांना आपले का म्हणायचे 

खैरलांजी घटना घटल्यावर तेथील पोलिस हवालदार पंचनामा करण्याकरीता आला होता . त्याने जर सविस्तर पणे घटना नमुद केली असती तर घटनेचे गांभीर्य नसणारे आणि पैशासाठी स्वतःची आई बहीण पण दावणीला बांधणारे काही आहेत,
तसेच झाले पोलिस ही आपलाच होता
पीएसआय ही आपलाच होता. आणि त्यानंतर पोलिस अधिक्षक ही  जातीने आपलाच होता.  पण विचाराने आणि भ्रष्टाचारी होता असेच म्हणावे लागेल .
सर्वसामान्यांना गरीबांना न्याय मिळावा म्हणुन बाबासाहेबांनी दिलेल्या संधीचा फायदा घेऊन नोकरया मिळवल्या पण पैशापुढे बाबासाहेबांचे विचार गुंडाळुन ठेवणारे. पैशापुढे,आणि वरिष्ठाना खुश करण्यासाठी आपल्या माणसांवर अन्याय करणारे आपल्या माणसांना किंवा सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही अशी काही नालायक वृत्तीचे अधिकारी कर्मचारी आहेत 

खैरलांजी मध्ये ही अगदी पोलिस शिपाई पासुन ते पोलिस अधिक्षकापर्यत बरेच स्वजातीय होते
तरीही योग्य प्रकारे वकीलाला किंवा तपासी यंत्रणेला पुरावे देऊ शकले नाही.

वकील
या घटनेत सरकारी वकील होता. प्रसिध्द निकम  तो सरकारी वकील सरकारकडुन मिळणारया पैसापेक्षा आरोपीला जबर शिक्षा होऊ नये म्हणुनच प्रयत्न करत होता का असेच वाटते. कारण प्रियांका आणि सुरेखा भोतमांगे वर सामुहिक बलात्कार होऊन ही बलात्कार करुन खुन केला हे सिध्द करु शकला नाही. कारण काय तर पुरावा नाही मिळाला नाही . कारण घटना घडल्यावर तिच्या योनीमार्गात काठ्या घातल्या त्यांनतर माती टाकली नंतर जमिनीत पुरली. ( बलात्कार केला तर 24 तासाच्या आत मेडीकल करावे लागते.
असो . 

कायदा लिहणारा माझा बाप आहे . माझ्या बापाने लिहणारया कायद्यावर देश चालतो   छातीठौक पणे बोलता येते पण आपल्यावरच्या अन्याय अत्याचारावेळी आपला एक वकील नसावा ही मोठी खंत आहे.शोकांतिका आहे आज ही बरयाच घटना क्रिमिनल मध्ये आपले वकील न्याय मिळवु देऊ शकत नाही.

टिपः आंदोलन करणारे हजारो लाखो असतात पण आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणुन कायदेशीर पध्दतीने पुरावे जमा करण्यासाठी टिम असली पाहिजे कारण जे अधिकारी पुरावे जमा करतात त्यावर वकीलाला काय मांडायचे ते अवलंबुन असते,

साक्षीदार
खैरलांजी घटना असो किंवा इतर ठिकाण च्या अन्याय अत्याचाराची घटना असो.
आपण त्या त्या घटनेत जे साक्षीदार असतात त्यांच्याकडे आपण लक्ष देतो का?
त्यांना आपण विश्वास देतो का ?साक्षीदारांना आपले करण्यासाठी किंवा आपण त्याच्यासाठी आहोत अशी आपल्या युवकांची समांतर  टिम असली पाहिजे.
साक्षीदारासाठी आपण काय करतो?

नेते
खैंरलांजी मध्ये जी घटना घडली त्याठिकाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खुप मोठे जाळे आहे. त्या मतदार संघातला भाजप चा आमदार होता त्याचे काही नातेवाईक त्या गावात होते.
आणि त्यामुळे साध्या घटनेसाठी घरातील चार व्यक्तीना अमानुष पणे मारण्याची जी शक्ती येते ते ते त्याच्या विचारामुळे आणि तो RSS चा विचार खरे आंबेडकरी विचारांचे मानणारे कधीच स्वीकारत नाही. आणि त्यांचा आडोशाला पण जात नाही
त्याचप्रमाणे घटनेनंतर दोन वर्षातच त्या गावाला आदर्श गाव पुरस्कार दिला , आर.आर,पाटील, राष्ट्रवादीच्या सुपीक डोक्यातुन
एक कट्टर जातीयवादी तर दुसरा मित्रत्व करुन जातीयवाद करणारा
एकाने तर विधानपरिषदेत .. यांनी  आमदारकीचा राजीनामा दिला . राष्ट्रवादी न्याय देत नाही म्हणुन परत पुढील वर्षी त्यांच्याबरोबर युती केली.
तर एक हे दोन  राजकीय पक्ष मला निवडुण आणत नाही मग मी जातो दुसरीकडे,,
मग जैथे जातात  ते राजकीय पक्ष खरे  बाबासाहेबांच्या विचाराचे मारेकरी आहे,
असो नेते त्याच्या पध्दतीने जेथे मिळेल तेथे ... खातात 

आपण बाबासाहेबांनापेक्षा नेत्यालाच महत्व देत आहे. 

सपोर्ट
भैय्यालाल भोतमांगे न्याय मिळावा  म्हणुन लढत राहीला नंतरच्या काळात त्याच्याकडे चळवळीचे काम करणारया कोणी लक्ष पण दिले नाही.
शेवटी न्याय मागता मागता भैय्यालाल भोतमांगे चा मृत्यु झाला
(भिमा कोरेगाव घडवणारी आमची जात ,आज ही भिमाकोरेगाव मध्ये हल्ला करणारया आरोपील सरकार अटक करत नाही.). 

बाबासाहेबांचा वारसा असणारे आम्ही
खरच आपण भोतमांगे परिवाराला न्याय देऊ शकलो का?
आणि त्यामुळे पुढे काही वर्षानंतर नितीन आगे नगर मधील घटना
शाळेत बसल्यावर गावातील मुली संगे बोलला म्हणुन गावातील दोन युवकांनी त्याला शाळेतुन सरांच्या समोर गाडीवर बसवुन बाहेर घेऊन गेले
मार मार मारले अंगावर वळा उठल्या त्याच्या गुदद्वारात लोंखडी सळया घातल्या , तरी कोर्टाने पुराव्या अभावी आरोपींना  निर्दोष सोडले होते,
या सर्वाचे मुख्य कारण आहे 

[आपण संघटित नाही ]

आपल्यावर अन्याय अत्याचाराच्या वेळी राजकीय पक्ष बाजुला ठेऊन एकत्र आले पाहिजे
प्रसिध्दीकरीता हापालले नाही पाहिजे
ज्यांना आंदोलनासाठी सपोर्ट करायाचा ते केलाच पाहिजे
अत्याचारग्रस्तांना आणि साक्षीदारांना  आर्थिक सपोर्ट करण्यासाठी असले पाहिजे
कायदेशीर बाबीत आणि उणीवा राहिल्यात का त्यासाठी टिम असली पाहिजे
सरकारी कर्मचारी आणि अधिकारी जो रिपोर्ट देतात त्यावर ही देखरेख असली पाहिजे
मुळ मुद्यावर घाव घालता आला पाहिजे .
सेंटर प्लेस वर आंदोलन असले पाहिजे
उग्र पध्दतीने ही आंदोलन असले पाहिजे
डाँक्टरांची टिम असली पाहिजे
क्रिमिनल केसेस मध्ये एक्सपर्ट असणारी टिम असली पाहिजे 
 मिडियावर बातम्या देण्यासाठी टिम असली पाहिजे (योग्य पध्दतीने बातम्या दिल्या तर कोणी प्रसिध्दीमुळे बाहेर पडु शकत नाही .

कारण नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्या आत्याचारग्रस्तांना न्याय मिळवण्यासाठीची संघटना
असो
पण यापेक्षा मुळ
आपली राजकीय सत्ता, आपली सरकारी अधिकारी 
पण हे सर्व करण्यासाठी ठामपणे वैचारिक बांधिलकी असणारे पाहिजे
कायद्याचा अभ्यास असला पाहिजे, भारतीय संविधानाचा अभ्यास असला पाहिजे.

RSS आणि भाजप बरोबर राहुन आंबेडकरवादी विचारांचे राजकारण  यशस्वी होऊ शकते का? 

बाबासाहेब म्हणाले होते शहराकडे चला


आपलाच
यश भालेराव
9067047333

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com