रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या काँक्रीटीकरणामुळे नागरिक हैराण

 

  भातसई येथील कातकरी वाडी येथे नदीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे

शहापूर -  भातसई येथील कातकरीवाडी येथे नदीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे हा रस्ता
ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती एकात्मिक सुधार कार्यक्रम या योजने अंतर्गत करण्यात आला असून सदरील रस्ता ना दुरुस्त झाला असून या रस्त्याला भगदाड पडले असून रस्ता खचला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. 

 भातसई येथील कातकरीवाडी येथे नदीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे हा रस्ता ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती एकात्मिक सुधारणा कार्यक्रम २०१८-१९ या योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला असून या रस्त्याची लांबी शंभर मीटर आहे. कामाची एकूण ७ लाख ३२ हजार ७०२ रुपये  असून कार्यारंभ दिनांक ३१ जानेवारी २०२० होती.  कामाचा कालावधी ३ महिने होता तर दोष दायित्व कालावधी दोन वर्षे आहे. हे कंत्राट ठेकेदार उमेश रघुनाथ जाधव यांना देण्यात आले होते. 

या ठेकेदाराने काम केल्यावर एक सुध्दा नामफलक लावले नाही. तसेच सदरील काम हे पहिल्या थरापासून ते तिसऱ्या थरापर्यं केलेले दिसुन येत नाही असे कातकरी वाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे  सदरील काम उमेश रघुनाथ जाधव यांनी ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत केलेले असून तसे काम ते दिसुन येत नाही. हे काम निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी येथील संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या