मुंबई- एच. जे. दोशी घाटकोपर हिंदूसभा हॉस्पिटल व सिद्धी महिला कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व रुग्णालयाचे ट्रस्टी प्रमुख,मगनभाई दोशी यांच्या मार्गदर्शनानुसार भिक्खूसंघाकरिता “मोफत विशेष आरोग्य शिबीर, औषध वाटप व संघदानाचा” कार्यक्रम संपन्न झाला. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहिद स्मारक सभागृह, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. डॉ. वैभव देवगिरकर ( वैद्यकीय संचालक ) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमास “विपश्यनाचार्य पूज्य भदन्त संघकिर्तिजी महाथेरो” ( प्रमुख, भारतीय भिक्खू संघ ) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुंबई सहित यवतमाळ, नांदेड, आसाम, कानपुर, त्रिपुरा येथून सुमारे ७० पेक्षा अधिक भिक्खू यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली व पुढील उपचारांसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रक्ततपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, ई. सी. जी., तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या इतर प्रकारच्या आजारांचे निदान करून मोफत औषधे यावेळी देण्यात आली. तसेच भिक्खूसंघाला भोजनदान व संघदानही करण्यात आले. रुग्णालयातील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांनी बौद्ध धम्मगुरूंना संघदान करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
भदन्त संघकिर्तिजी महाथेरो यांनी सर्वाना मार्गदर्शन करत असताना सदर रुग्णालय कोरोना काळात व आताही कशाप्रकारे सेवा देत आहे याचा स्वतःचा अनुभव सांगितला. या सर्वानी खूप सेवा करून मला नवीन आयुष्य दिल्याचे सांगितले. आजही त्यांनी भिक्खूसंघासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले असून रुग्णालय करत असलेल्या सेवेचे व्रत असेच अखंड चालत राहू दे या साठी सर्व भिक्खूसंघाच्या वतीने शुभाशीर्वाद दिले.
सदरच्या कार्यक्रमास “भिक्खू विरत्न थेरो” (कार्याध्यक्ष, भारतीय भिक्खू संघ ) विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन डॉ. रवींद्र कांबळे व आनंद सावते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र कांबळे यांनी केले. तसेच कार्यक्रमास सिद्धी कल्याणकारी महिला संस्था व त्याच्या प्रमुख स्मिता कवाडे , सूर्यकांत गायकवाड, विष्णू कांबळे, तसेच विजय गोरे, ऍड. विनोद जाधव, नामदेव उबाळे ( माजी नगरसेवक ), बापू धुमाळे, डॉ. रजनीकांत मिश्र. डॉ. ओमप्रकाश गजरे, डॉ. राहुल कोल्हे, डॉ. शबनम कराणी, डॉ. स्नेहा भट्टे, डॉ. निलक्षी धुरी , डॉ. संजय पाल , डॉ. विनायक अवकीरकर , डॉ. अक्षया वाघ, सौ. सुचिता मांजरेकर, सौ. राजश्री डुंबरे, चंद्रकांत गावडे, संजीवजी भावसार व रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या