बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच धोकादायक झाला मुंब्रा उड्डाणपूल

 


  •  सुरक्षासाधनांची वानवा
  • अनेक ठिकाणी पुलाला तडे
  •  कोटींगशिवाय सळईंचा वापर
  • विरोधी पक्षनेत्यांच्या पाहणीदौर्‍यात उघडकीस आले सत्य

ठाणे -  मुंबई-ठाणेला जोडणारा कोपरी उड्डाण पुलाला गेलेले तडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच उघडकीस आणले. या बांधकामात झालेला भ्रष्टाचार मिडीयात प्रसिद्ध केला. तसेच या काँन्ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता राष्ट्रवादीचे महापालिका विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी मुंब्रा जक्शन येथील पुलाचे निकृष्ठ झालेले बांधकामाबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

 मुंब्रा- शिळ-कल्याण आणि ऐरोलीला परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्याच्या उद्देशाने मुंब्रा वाय जंक्शन येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.   या उड्डाणपुलाचे बांधकाम 50 टक्क्यांच्या आसपास पूर्ण होत आलेले आहे. मात्र, आताच हा पूल धोकादायक झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामाची शानू पठाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, साकिब दाते यांनी आज सकाळीच पाहणी केली. या पाहणीमध्ये या पुलाच्या निकृष्ठ कामाचा प्रकार उघडकीस आला. 

या पुलाच्या बांधकामात वापरण्यात येत असलेल्या सळई अत्यंत कमकुवत असून त्यांना रसायनांचा लेप लावला जात नाही. त्यामुळे या सळईंना गंज लागून त्या आतच तुटण्याची शक्यता आहे त्याशिवाय, वापरण्यात आलेले बांधकाम साहित्यही अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याने हा पूल पूर्ण होण्याआधीच धोकादायक झाला आहे. या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे नुकतीच मुंबईत जशी पूल कोसळण्याची घटना घडली आहे. तशी घटना येथेही घडण्याची दाट शक्यता  शानू पठाण यांनी व्यक्त केली.

 आज जर बांधकाम सुरु होत असतानाच पुलाची अशी अवस्था असेल तर हा पूल दहा वर्षे तरी टिकेल का? या पुलावरुन अवजड वाहतूक होणार आहे. मात्र, स्वत:च्या फायद्यासाठी ठेकेदाराने जाणीवपूर्वक निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे. या संदर्भात आपण एमएमआयडीए, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लेखी तक्रार करुन असून  एसएनसी या ठेकेदारावर कारवाई  करण्याची मागणी करणार आहोत, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA