भारतीय विषम व्यवस्थेच्या मूळाशी पुरोहितशाही

    पेरियार रामस्वामींचा जन्म 1879 झालेला असला तरी त्यांच्या कार्याचा प्रारंभ अशा काळात झाला ज्या काळात महाराष्ट्रात क्रांतिबा फुले यांच्यानंतरची समाजसुधारकांची पिढी कार्यरत झालेली होती. राजर्षि शाहू महाराज, कर्मविर विट्ठल रामजी शिंदे, कर्मविर भाऊराव पाटील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समाजात एक नवे चैतन्य निर्माण करीत होते. या कार्याच्या दिशाही वेगवेगळ्या होत्या. अस्पृश्यतेच्या प्रश्नापासून शिक्षणाच्या प्रश्नापर्यंत अनेक प्रश्न कवेत घेऊ पाहणारे कार्य या महापुरुषांनी आरंभिलेले होते.  सर्वच समाज सुधारकांचा एकच ध्यास होता तो म्हणजे सर्वकश सामाजिक समतेचा. सामाजिक समतेच्या दृष्टीने दोन महत्वाचे प्रश्न होते. 

एक म्हणजे अस्पृश्यतेचा आणि दुसरा म्हणजे स्त्रियांच्या गुलामगिरीचा, अर्थात या दोन्ही प्रश्नांच्या सोडवणूकीचा मार्ग सार्वत्रिक शिक्षणातच आहे हे सत्यही या सुधारकांच्या लक्षात आलेले होते. म्हणूनच या तिन्हा दिशांनी परिवर्तनाचा लढा नेण्याचा झुंजार प्रयत्न या क्रांतिकारकांनी आरंभिलेला होता. वस्तुत हे तिन्ही प्रश्न इथल्dया व्यवस्थेतूनच निर्माण झाले  होते आणि आहेत. इथली व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था. ही व्यवस्था श्रेणीबद्ध आहे आणि त्यामुळेच ती परस्परांचा द्वेष करावयास शिकविते. म्हणून आज अस्पृश्यतेचा प्रश्न काही प्रमाणात सुटत आलेला आहे असे वाटत असतांनाच जातीयता मात्र अधिकाधिक खोलवर रुजत चाललेली आहे. ती अधिकाधिक गुंतागुंतीचे रुप घेत असलेली दिसते.  

या सामाजिक अस्थिरतेविरुद्ध पेरियार स्वामींनी अनेक प्रकारचे लढे दिले. भारतीय विषम व्यवस्थेच्या मूळाशी पुरोहितशाही आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांचा पहिला लढा हा या पुरोहितशाहीच्या वर्चस्वाविरुद्ध होता. पुरोहितशाहीचे दुसरे अंग म्हणजे अस्पृश्यतेचा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न म्हणजे भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे असे मानून त्यांनी संघर्ष आरंभिला. या संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती वायकोम येथे. येथील मंदिराच्या परिसरात काही सरकारी कार्यालये होती. आणि तेथे अस्पृश्यांना जाण्यास तर मज्जाव होता. अशा परिस्थितीत एका शिकलेल्dया अस्पृश्य वकीलास अडविण्यात आले आणि त्या प्रश्नाने उग्र रुप धारण केले. या प्रश्नावर पेरीयार स्वामींनी अनेक वर्ष संघर्ष केला. सत्याग्रह केले. कदाचित या प्रश्नावर करण्यात आलेला हा भारतातील पहिलाच सत्याग्रह असेल! वायकोमचा प्रश्न तर पेरियार स्वामींनी सोडविलाच, पण त्या पाठोपाठ त्यांनी अनेक सामाजिक लढे उभे केले. गुरुकुलम्चा प्रश्नही त्यांनी असाच धसास लावला. गुरुकुलम्च्या आश्रमात ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर यांना वेगळी वागणूक देण्यात येत होती. त्याविरुद्धही त्यांनी आवाज उठविला. 

1951 मध्ये आरक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्ययालयाने दिल्dयानंतर प्रचंड आंदोलन छेडले. नंतर भारतीय राज्यघटनेत पहिली दुरुस्तीकरुन 150 या कलमामध्ये पोटकलम क्र 4 जोडून मागासवर्गीयांना आरक्षण प्राप्त झाले.त्याचप्रमाणे 1953 साली प्रचड जनसमूदायासमोर गणपतीची मुर्ती फोडून मूर्तीमध्ये देव नसतो हे  दाखवून दिले. त्याचवर्षी मलेशीया व बर्मा येथे सपत्निक भेट देऊन जागतिक बौद्ध अधिवेशनात सहभाग घेतला. याच वेळेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. त्यानंतर 1955 साली दसऱयाच्या दिवशी रावणाच्या ठिकाणी रामाची प्रतिमा दहन केल्dयामुळे त्यांना अटक करण्यात आली. तरीही त्यांनी आपल्dया लोकांना उद्देशून सांगितले की रावणदहन करण्यापेक्षा रामाचे दहन करा.  

आपल्dया प्रत्येक भाषणातून इथल्dया अंधश्रद्धेवरआणि देवधर्मावर कडाडून हलल करणारे, तसेच रामायणाचे वास्तव रुप जगासमोर आणून त्यातील भटांचे कुटील कारस्थान लोकांना पटवून देण्याचे महत्कार्य करणारे पेरियार स्वामी दक्षिण भारतातील आंबेडकरी चळवळीची धुरा वाहणारे म्हणून समजले जात होते. त्यांचा 17 सप्टेंबर रोजी जंयतीदिन त्यानिमीत्त त्यांना भावपूर्ण अभिवादन! 

-- सुबोध शाक्यरत्न

     
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या