उथळसर प्रभाग समितीमधील कॅडबरी जंक्शन ते आंबेडकर रोड, खोपट रोडवरील अनधिकृत फेरीवाले हटविण्यात आले व हातगाड्या ५ जप्त करून दुकानासमोरील वाढीव प्लास्टिक शेड निष्कासित करण्यात आले. यासोबतच माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीमधील कापूरबावडी नाका ते कोलशेत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर व पदपथावर असलेले फेरीवाले, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्याचे कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईतंर्गत १ लोखंडी बाकडे, ४ ताडपत्री शेड, ५ हातगाड्या, १ लाकडी बाकडे २ पान टपऱ्या निष्कसित करण्यात आल्या तर १ लोखंडी कपाट, १ जाळी काउंटर, १ शेगडी, २ सिलेंडर, २ स्टील काउंटर व १ शोरमा मशीन जप्त करण्यात आले. तसेच दिवा प्रभाग समितीमधील शीळ मुख्य रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये ०७ हातगाड्या, ०३ लाकडी टेबल व ०२ लोखंडी स्टॉल जप्त करण्यात आले तर ०३ अनधिकृत शेड तोडण्यात आले.
सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, महेश आहेर, विजयकुमार जाधव, संतोष वझरकर आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
0 टिप्पण्या