पालघर जिल्हातील आदिवासी समाज कामगार, कर्मचारी, अधिकारीवर्गाची संघटनात्मक सभा संपन्न

   पालघर जिल्हातील आदिवासी समाज कामगार,कर्मचारी,अधिकारी यांच्या वतीने जव्हार येथे संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र मजदूर युनियन (I.L.U) Reg.no.NGP/4745 - Registered under Trade Union Act -1926 चे ध्येय,उद्धिष्ट आणि संकल्प समजून घेण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी संघटनात्मक सभा संपन्न झाली.  त्यावेळी विचारपीठावर  जे.एस पाटील नागपूर (राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन) सागर तायडे (स्वतंत्र मजदूर युनियन अध्यक्ष महाराष्ट्र), गणेश उके (संघटक सचिव स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य),गितेश पवार (अध्यक्ष स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य)भावनाताई पवार उपस्थित होते. 

समस्या निर्माण झाल्यावर संघटना बांधणी केल्या समस्या सुटणार नाहीत त्यासाठी विचारधारेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन संघटित झाले पाहिजे, संघटित होऊन संघटना बांधणी केली तर समस्या निर्माण होत नाही असे मत संघटनात्मक सभेचे मुख्य मार्गदर्शक जे.एस पाटील यांनी व्यक्त केले.  देशामध्ये कामगार चळवळीचे कार्य व महात्मा जोतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज,बिरसा मुंडा यांच्या विचारांचा  आदर्श  डोळ्यासमोर ठेऊन स्वतंत्र मजदूर युनियन काम करते.पण अनेक लोक या महापुरुषाचे नांव घेऊन वर्ण,जाती व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या संघटनेत काम करीत असतील तर आपल्या समस्या कशा सुटतील?. म्हणूनच आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याच महापुरुषांच्या विचारधारा मानणाऱ्या संघटनेत काम करावे असे आवाहन जे.एस पाटील यांनी केले. 
सागर तायडेगणेश उके,गितेश पवार यांनी स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्यात विविध कामगार क्षेत्रातील कामगारांना कशा पद्धतीने संघटीत करण्याचे कार्य करते यांची माहिती दिली.

या संघटनात्मक सभेसाठी पालघर जिल्ह्यातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.त्यात मधुकर कावजी भोये सर (शिक्षण क्षेत्र आणि कवीराज),यशवंत सखाराम देशमुख (अध्यक्ष - पालघर जिल्हा बांधकाम मजूर व जनरल कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य),राजेश उत्तम मदने सर (परिवाहन महामंडळ महाराष्ट्र राज्य),प्रशांत पाढुरंग तेजे (व्यवसाय क्षेत्र),वसंत आनंद धांडे सर (आंबेडकरी विचारधारा व शिक्षण क्षेत्र),रवी लक्ष्मण बुधर सर (कविराज आणि शिक्षण क्षेत्र),चंद्रकांत पवार साहेब (नायब तहसिलदार),भारती भला मॅडम (आशावर्कर जव्हार तालुका प्रतिनिधी),मंदा संतोष सिसव (आशावर्कर जव्हार तालुका प्रतिनिधी ),यदुनाथ सिताराम भोये सर (आदिवासी कोकणा समाज अध्यक्ष) सेलवास आणि दादरा नगर हवेली चे अनेक कार्यकर्ता नानासाहेब शिंदे साहेब,विनय भाई ,सोनियाजी,प्रभू भाई टोकिया (आदिवासी एकता परिषद सचिव आणि अध्यक्ष),शेतकरी बांधव आणि हामजूरी करणारे मजूर व माथाडी कामगार सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भावनाताई करण पवार (सामाजिक कार्यकर्त्या तसेच संघटक भूमिसेना,आदिवासी एकता परिषद),करणभाऊ जनार्दन पवार (अध्यक्ष - आदिवासी मित्र मंडळ आणि आयोजक तसेच संघटक भूमिसेना,आदिवासी एकता परिषद),मिलींदभाऊ सोमनाथ बरफ (संघटक आदिवासी एकता परिषद),यांनी केले होते.सूत्रसंचालन भावनाताई करण पवार यांनी तर करणभाऊ जनार्दन पवार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA