Top Post Ad

रस्त्यावरील खड्डे प्रकरणी चार अधिकारी निलंबित तर मे.बिटकॉन ठेकेदाराला नोटीस

    ठाणे: शहरातील रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या चार अभियंत्यांना शनिवारी  निलंबित करण्यात आले, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्या आदेशान्वये     अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय हेरवाडे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले   कनिष्ठ अभियंता संदीप गायकवाड (लोकमान्य-सावरकर नगर), कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे (वर्तक नगर ), उपअभियंता संदीप सावंत (लोकमान्य-सावरकर नगर) आणि कार्यकारी अभियंता चेतन पटेल (उथळसर ) अशी निलंबित केलेल्या अभियंत्यांची नावे आहेत. ,        

 जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांचा दौरा करून रस्त्याच्या खराब परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  अभियंत्यांची जबाबदारी होती रस्त्यांची योग्य देखभाल करणे आणि दुरुस्तीच्या कामाची गुणवत्ता तपासणे, जे त्यांनी केले नव्हते, परिणामी रस्ते खराब होण्याची समस्या निर्माण झाली. रस्ते दुरुस्तीला योग्य अर्थसंकल्पाने मंजुरी देण्यात आली असली तरी, केलेले काम निकृष्ट दर्जाचे होते आणि या अभियंत्यांनी त्याची योग्य देखरेख केली नव्हती, असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या  मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारांस नोटीस बजावण्यात आली असून रस्ते दुरूस्तूची कामे तात्काळ व गुणवत्तापूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करून कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा ईशारा देण्यात आला आहे. सदरची कारवाई महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

    संबंधित ठेकेदारास शक्तिपीठ मानपाडा ते नागलाबंदर मलप्रक्रिया केंद्र व युनी ॲपेक्स कंपनी ते शिवमंदीर गायमुख दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेला आहे.  या भागातील डांबरीकरण पुर्ण न झालेल्या भागाचे (रस्त्याची डावी बाजू ) सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय , कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल व गायमुख ते भाईदरपाडा गाव , वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक ( रस्त्याची उजवी बाजू ) या भागात पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरुन व तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीयोग्य ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. परंतु संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सुचना देवूनही या रस्त्याच्या सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय, कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल व तसेच गायमुख ते भाईंदरपाडा गाव, वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक या भागात काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे या सर्विसरोडचा वापर नागरिकांना करता येत नसून हायवेवर टॅफिक होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 

            तसेच या रस्त्यावर केलेले काम काही ठिकाणी काही दिवसातच नादुरुस्त झाले आहे. यामुळे यापूर्वी केलेले काम योग्य दर्जाचे न झाल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदाराने केलेल्या व नादुरुस्त झालेल्या कामांचे देयक महापालिकेच्यावतीने अदा करण्यात येणार नसल्याचे  नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे.बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये याचा खुलासा ३ दिवसात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत. तसेच सदर कामासोबतच या ३ दिवसाच्या कालावधीत  कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखुन काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान सर्व कामे तात्काळ न केल्यास नागरिकांना गैरसोय निर्माण केल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल करून संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा ईशाराही महापालिकेने दिला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com