जहांगीर हॉस्पिटलमध्ये गंभीर रीतीची यशस्वीरीत्या हृदय शस्त्रक्रिया

 मुंबई- जहांगीर रुग्णालय पुणे, या रुग्णालयात प्रथमच  खूपच  गुंतागुंतीची लहान मुलांची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. ऑपरेशनचा खर्च ?. 5,50,000/- होता. परंतु रुग्णाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची  असल्यामुळे ते फक्त जेमतेम औषधांचा खर्च करू शकले. विराज सातपुते 2 वर्षांचा होता, त्याला कॉम्प्लेक्स कॉन्जेनिटल हार्ट प्रॉब्लेम होता, जो तो 2 महिन्यांच्या वयात असताना त्याची शंटने ह्र्दय शस्त्रक्रिया करून  कमी झाला होता. जेव्हा डॉ. श्रीनिवास किनीनी,या बालकाचे निदान केले तेव्हा हा शन्ट काही प्रमाणातच काम करत होता, टेट्रालॉजी ऑफ फॅलोटचे त्याचे निदान,ओपन हार्ट सर्जरी,संपूर्ण दुरुस्तीसह, खूप आधी उपचार करणे आवश्यक होते. तो आजारी अवस्थेतच जहांगीर रुग्णालयात आला. सायनोसिससह, विलंबाने विकासात्मक टप्पे घेऊन त्याचे वजन कमी होते (2 वर्षात 8 किलो). तो आधारा शिवाय उभा राहू शकत नव्हता आणि त्याने पहिले पाऊल उचलणे अद्याप सुरू केले नव्हते. ही एक उच्च जोखमीची दुबार ओपन हार्ट शस्त्रक्रिया होती, कारण ती लहान मुलामध्ये करायची होती.   

  ही शस्त्रक्रिया 6 तास चालली त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये आणि नंतर वॉर्डमध्ये हलवण्यात आले. 5 व्या पोस्टऑपरेटिव्ह दिवशी त्याला  डिस्चार्जही देण्यात आला. तो आता इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन जगेल कारण त्याच्या हृदयाचा दोष दूर झाला आहे. ही गंभीर हृदयाची शस्त्रक्रिया आमचे बालरोग कार्डिअक सर्जन डॉ.श्रीनिवास किणी व जहांगीर रुग्णालय मधील बाल रोग तज्ञ डॉक्टर सागर लाड, ऑपरेशन थियटर, रिकव्हरी मधील निष्णात भूल देणारे तज्ञ डॉक्टर सी एस कुलकर्णी पोस्ट ऑपरेटिव वैदिक, व्यवस्थापन व स्टाफ नर्सेस, ह्या सर्वांच्या सहयोगाने यशस्वी झाली.  ह्या ऑपरेशन साठी रुग्णालयाचा खर्च सुमारे, ? 5,50,000/-होता, परंतु त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत गरीब, हलाखीची होती. या बाळासाठी सर्व खर्च डॉ.अशोक घोणे यांनी हॉस्पिटलच्या सामाजिक विभागातून, विविध संस्थांच्या  माध्यमातून, त्यांच्या मदतीने केला, जेणेकरून हे कठीण ऑपरेशन सहज आणि यशस्वीपणे पार पडेल.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या