लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्र पती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मध्ये गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गण पती म्हणत. या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले. आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेऊया...
काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी खर्या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला. बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत. पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे. चित्त आणि मल्ल. चित्त म्हणजे शरीर, मल्ल म्हणजे मळ. तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दु;खा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे. पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला. तसेच, बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे. याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!! उंदराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??
जगामध्ये दु:ख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता आणि दु:ख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दु:ख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दु:खा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला. म्हणजे दु:खाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत. मग ब्राम्हण समाजाने स्वरचीत काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले. बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे. मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुखहर्ता होऊ शकतो काय...???
काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करुन दु:खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही. मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...? बुद्धाने दु:ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत. मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, गणपती हा दुसरातिसरा कोणी नसून बुद्धच आहे...! पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवुन बुद्धाचे अस्तित्वच नष्ट केले आणि देवांची निर्मिती करुन स्वत:ला देवासमान मानून स्वत्:चे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले आणि बहुजन समाजाला गुलाम केले..
पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मणांनी "गणपती बाप्पा मोर्या" अशा घोषणा दिल्या. मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामधे संभ्रम आहे....!!! कर्नाटक मध्ये चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वत:च्या नावापुढे मोर्या शब्द लावायचे. महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!! १४ व्या शतकात एक मोर्या गोसावीच्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली. ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्यानंतर बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरु केले. कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामायेलाच ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले. जुन्नरच्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले. शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले. कारण... खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता.पण, ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला. या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपती होऊन गेले, त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करुन समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला. आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुन ब्राह्मण धन दौलत मिळवतात. प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो.
- - प्रबोधनकार ठाकरे
- सन: ७/२/१९५८
गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गजाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते. दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही एकमेव गणपतिची मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे. मानवी रुपात असल्यामुळे याला आदी गणपति संबोधले जाते.


0 टिप्पण्या